मोदी , आडवाणी आणि मी

cartoon advaniआज खूप दिवसांनी लिहितोय.  पुण्यातच खूप दिवसांनी आणि खूप दिवसांसाठी आलोय. खूप खूप म्हणजे अगदीच खूप नव्हे काही. पण नेहमी केवळ एखाद्या दिवसासाठी पुण्यात येणारा मी चक्कं चार दिवसांसाठी पुण्यात आलोय. सहाजिकच गणपतीची धामधूम असूनही मला पोस्ट लिहायला वेळ मिळालाय.

मोदी आणि आडवाणी यांचं नाव ओठावर येण्याचेच दिवस आहेत हे. पण मला काल त्यांची आठवण झाली ती वेगळ्या कारणामुळे.

झालं काय ? गेली दहा दिवस आमच्या सोसायटीत गणेशोउत्सवाची धूम सुरु आहे ( Dhoom 2  नव्हे धूम म्हणजे धामधूम ) मला येऊन दोन दिवस झाले. मीही त्या वातावरणात रमून गेलो. पण तरीही मागच्या काही दिवसाच्या आठवणी मनात तरळत राहिल्या.

एप्रिल २००० साली मी या सोसायटीत रहायला आलो. चार सहा बिर्हाड माझ्या आधी तर काही माझ्या नंतर खुराडत विसावली. ओळखी पाळखी वाढल्या. संदेशवहन वाढलं. संस्कृती विचार जुळले. श्रावण आला. सण उत्सवांची रणधुमाळी सुरु झाली. आमच्या सोसायटीतले निम्म्याहून अधिक फ्ल्याट अद्यापही  होते. पण जी मंडळी विसावली होती त्यांच्या नसानसातून उत्सवाचं वारं भिनू लागलं. गणपती आले. एकमुखानं गणेशोउत्सव साजरा करण्याचं ठरलं. प्रत्येक दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रत्येक दिवशी दोन कार्यक्रमाच्या मधली कडी सांधण्याच, सूत्रंसंचालनाच, निवेदनाच थोडं हाय प्रोफाईल भाषेत सांगायचं झालं तर एकंरिंगच काम आम्ही करायचो.

दिवस बदलले. कालच्या दोन चार दिवसांच्या कार्यक्रमात मला जाणवलं कि आपल्या हाती क्षणभरही माईक आला नाही. त्याचा कब्जा सर्वस्वी आमचे मित्र देवकर यांच्याकडे होता. ते खूप सुरेख सूत्रंसंचालन करत होते. मला खूप बरं वाटत होतं. आम्ही व्यासपीठावर बसलो होतो. आमच्या हस्ते बक्षीस वितरण केला जात होतं.
आम्हाला एकदम मोदी आणि आडवाणींची आठवण झाली. मोदींच्या हाती सूत्रं देताना आडवाणींचा सुकलेला चेहरा आठवला.   आठवला. आडवाणींची नाराजी आठवली. आम्हाला वाटलं आडवाणीं पेक्षा आम्ही बरे. स्वतःच पूर्वीच गतवैभव आठवत न बसता देवकरांच्या हाती गेलेली सूत्र पाहून आम्हाला आजीबात वाईट वाटत नव्हतं.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s