बलात्कारला फाशी = अन्याय

बलात्कार साठीतला नराधमही करतो आणि ज्याला संभोग क्रियेविषयी फार  काही माहित नसतं असा ऐन पंधरा सोळा वर्षाचा तरुणही. बात्कार पन्नाशीतल्या षोडशेवर होतो आणि चार वर्षाच्या निष्पाप कोवळ्या निरागस जीवावरही. लैंगिक शोषण केवळ तरूणींचंच होतं असं नाही तर अनेकदा मुलंही लैंगिक शोषणाची बळी ठरतात.

दिल्ली बलात्कारातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली. अनेकांनी विजयोउत्सव साजरा केला. आरोपीच्या  वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. समाजातील विविध थरातून आरोपींना दिलेल्या कठोर शिक्षेबद्दल समाधान व्यक्त करण्यात आलं. सुशीलकुमार शिंदे यांच्यासारख्या जबाबदार धुरीनानही आरोपींना सुनावण्यात आलेल्या शिक्षेबद्दल समाधान व्यक्त केलं. पण खरंच बलात्कारातील त्या आरोपींना सुनावण्यात आलेली शिक्षा योग्य आहे ?

माझ्या मते नाही. कारण rape4पहिल्या परिच्छेदात मी जे मुद्दे मांडलेत त्यावरून एखाद्यानं एखाद्या मुलीवर अथवा महिलेवर बलात्कार करणं हि वृत्ती नसून विकृती किंवा भावना आहे. पण चोरी करणं , लुटमार करणं, एखाद्याला जीवे मारणं या मात्र विकृती नसून वृत्ती आहेत आणि म्हणूनच कायद्यानुसार त्या त्या वृत्तीला केलेलं शासन हे योग्यच आहे. पण बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला फाशी हि अन्याय कारक बाब आहे असेच म्हणावे लागेल.

कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. मी त्या आरोपींच, त्यांच्या कृत्याचं समर्थन नाही करू इच्छित. पण माणुसकीच्या नात्यातून विचार केला तर हि शिक्षा योग्य वाटत नाही. ‘ जान के बदले जान ‘ या न्यायानुसार एखाद्या व्यक्तीचा खून करणाऱ्या, एखाद्या व्यक्तीचा जीव घेणाऱ्या, एखाद्या व्यक्तीची निर्घुण हत्या करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा योग्यच आहे. पण बलात्कार करणाऱ्याला फाशी हे अधिक नाही होत का ?

एखाद्याचा खून  केल्यानंतर फाशीची शिक्षा होते हे ठाऊक असूनही जसे खून होतंच राहिले आहेत तसेच बलात्कारही होत रहातील.

खरंतर बलात्कारातील त्या पाच आरोपींना फाशीपेक्षाही त्यांचं लैंगिक खच्चीकरण करणं ही शिक्षा अधिक योग्य ठरू शकली असती. ‘ ना रहेगा बास, ना बजेगी बासुरी ‘ या म्हणीनुसार त्या तरूणांच वैद्यकीय निष्कर्षांवर आधारित लैगिक खच्चीकरण केलं असतं तर उद्या एखाद्या तरुणी जवळ जाऊनही त्यांच्या लैगिक भावना उद्यापित झाल्या नसत्या आणि इच्छा होऊनही किंवा मनात तशी भावना निर्माण होऊनही केवळ शरीर उद्यापित न झाल्यामुळे त्या व्यक्तीला हतबल व्हावं लागलं असतं आणि तीच त्याच्यासाठी सर्वाधिक योग्य शिक्षा ठरली असती.

एक मात्र नक्की कि बलात्कार ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s