सेव्हिंग आणि मार्केट बेस पॉलिसी

bank, economi

मी काही अर्थतज्ञ नाही. त्यामुळे सेव्हिंग कुठे आणि कसं करावं यावर भाष्य करण्याचा मला अधिकार नाही. परंतु मला आलेल्या काही अनुभवातून इतरांची फसवणूक होऊ नये म्हणून

माझे अनुभव माझ्यासारख्या सामान्य गुंतवणूकदारांसमोर मांडण्याची माझी मनापासून इच्छा आहे म्हणून हे लेखन.

पोटाला चिमटा घेऊन आपल्याकडे थोडाफार पैसा उरतो. भविष्याची तरतूद करावी म्हणून तो पैसा आपण बँकांच्या किंवा विमा कंपन्यांच्या विविध पॉलिस्यांमध्ये गुंतवू पहातो. संबंधित एजंट घरपोच सेवा देतात. आमची पॉलिसी कशी फायद्याची आहे हे पटवून देतात. आपण खुश होतो. त्या पॉलिसीमध्ये पैसे गुंतवण्याचा निश्चित करतो. एजंट लगेच चार सहा पानांचं एक पुपुडकं आपल्यापुढं धरतो. इथं इथं सह्या करा म्हणून खुणा करून कागद आपल्यापुढे करतो. आणि काहीही न वाचता आपण त्या कागदावर खुणा केलेल्या ठिकाणी लफ्फेबाज सह्या मारून मोकळे होतो. मस्त मासा गळाला लागला

 

म्हणून समोर बसलेला एजंट मनोमन मांडे खातो आनिआनि अधिकाधिक रकमेचा चेक घेऊन दोनचार दिवसात पोलिसी तुम्हाला मिळेल म्हणून समाधानानं निघून जातो. आपणही आपल्या दूरदृष्टीवर आणि आपल्या धोरणीपणावर खुश होऊन मोठ्या छाती काढून मोठ्या ऐटबाज नजरेने बायका मुलांकडे पाहतो.

 

पण सह्या करण्यापूर्वी कुणीही आपण सह्या करण्यापूर्वी आपण कशाखाली सह्या करतोय ते पाहत नाही. त्याची पुढील कारणं असतात –

 

१)  भाषा बहुदा इंग्रजी असते. त्यामुळे वाचलं तरी सारं काही कळेलच याची काही शाश्वती नसते.

 

२) अक्षरे बरीच लहान असतात.  त्यामुळे डोळेफोड करून घेण्याची तसदी नको वाटते.

 

३) आणखी महत्वाचा म्हणजे लाखाचे दीडलाख होणार म्हणून आपण हरखुन गेलेलो असतो.

 

४) एजंटच्या बोलण्याने आणि त्याने दाखविलेल्या अमिधाने आपण हरखून गेलेलो असतो.

 

५) किंवा आपल्याकडून पॉलिसी करून घेणारी व्यक्ती आपल्या परिचयाची असल्यामुळे आपला तिच्यावर दृढ ( आंधळा )
विश्वास असतो.

 

पॉलिसीची इनस्टोलमेंट टर्म बऱ्याचदा तीन महिन्याची असते तर पोलिसी कमीतकमी तीन वर्ष सरू ठेवावी लागणार असते.  आपण नेमानं पैसे भरत रहातो. तीन वर्षानंतर मोठी रक्कम हातात येईल असं स्वप्न पहात पॉलिसी थांबवून रक्कम हातात येईल असा पहातो. तेव्हा संबंधित एजंट सांगतो कि , ” आता मार्केट डाऊन आहे. थोडं थांबू या. “
आपण पुन्हा चार सहा महिने वाट पाहतो. एजंटचं  पुन्हा तेच उत्तर. आपण हताश.

 

पुन्हा चार सहा महिने जातात. आपण एजंटच्यामागे घाई करतो.

 

तो थंडपणे सांगतो, ” मार्केट वाढतच नाही. मी तरी काय करणार ना ? खूपच घाई असेल तर आपण येतील तेवढे पैसे घेवून टाकू या.”

 

“किती येतील ? ” आपण काळजीत.

 

” कदाचित आपण गुंतवलेत तेवढेच. किंवा त्यापेक्षाही कमी. ” एजंट.

 

आपण पुन्हा चार सहा महिने वाट पहातो. एजंटचं पुन्हा तेच उत्तर. शेवटी नाईलाजास्तव आपण पैसे काढून घेतो. आणि आपण गुंतवली तेवढी रक्कमही आपल्या हाती येत नाही.

 

वाटतं एवढी रक्कम आपल्या बचत खात्यात असती तरीही आपल्याला ५ % नं व्याज मिळालं असतं. काय फायदा झाला आपला ?

 

माझी अशी फसवणूक इसीसी च्या प्ृदेंतिओल या कंपनीकडून  जशी झालीय तशीच लिक या शासकीय अधिपत्याखाली असलेल्या कंपनीकडूनही झालीय.  इतर कंपन्यांच्या मी वाट्यालाच गेलो नाही पण अनुभव खूप काही वेगळा येईल याची सुतराम शक्यता नाही.  इसीसी च्या दोन वेगवेगळ्या पॉलिसीत तीन वर्षात प्रत्येकी ७५००० रुपये गुंवले होते परत  आले प्रत्येकी ६३००० रुपये. म्हणजे एकूण तोटा २४००० रुपये.

 

लिक च्या मार्केट प्लस पॉलिसीत तीन वर्षात एकूण १५०००० ( दीड लाख ) गुंतवले. एजंट म्हणाला, ” आत्ता मार्केट डाऊन आहे. आणखी एक हप्ता भरा म्हणजे तोपर्यंत मार्केट वाढेल. “

 

मी मोठ्या आशेने हप्ता भरला. पण मार्केट काही वाढलं नाही. शेवटी हाती आले १६६०००. म्हणजे मुद्दलात नुकसान झालं १४००० रुपयांचं. गुंतवलेली रक्कम माझ्या बचत खात्यात ठेवली असती तरी ५ टक्क्यांनी साधारणतः १५ हजार रुपये व्याज मिळालं असतं. म्हणजे एकूण नुकसान २९ हजार रुपये.

 

प्रश्न पडतो तो हा कि माझ्याप्रमाणे अशी आणखी किती ग्राहकांची फसवणूक होत असेल ? गुंतवणूकदारांची होणारी हि

LIC , ICICI makes man poor

फसवणूक भारतीय अर्थ व्यवस्थ्येवर अंकुश ठेवणाऱ्या रिझर्व ब्यांकेच्या लक्षात येत नाही का ?

 

पण सामान्य माणसाच्या पाठीशी उभी राहील अशी यंत्रणाच आपल्या देशात नाही. त्यामुळे खूप काळजीपूर्वक गुंतवणूक करा. गुंतणूक करताना कमीतकमी काय काळजी घ्यावी याविषयी वाचा पुढच्या पोस्टमध्ये.

Advertisements

2 Comments

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s