सेव्हिंग आणि मार्केट बेस पॉलिसी : भाग २

LIC , ICICI makes man poorकाल  लिहिलेल्या लेखावर मला सचिन या वाचक मित्राची  आली ती अशी –

It seems you have invested in Market linked policies(ULIP).
Aho hya 3 varshat market kharech farse vadhale nahi tar tyala LIC tari kay karna. ‘

होय मी मार्केट लिंक पॉलिसी विषयीच बोलतोय.

पण मार्केट वाढलं नाही या म्हणण्यात काय अर्थ आहे. मी LIC मध्ये गुंतवलेले पैसे LIC नं कुठ गुंतवलेत हे मला माहित नसतं.  ठिकाणी गुंतवलेत तिथलं मार्केट वाढलंय कि कमी झालंय हे कळण्याचं कोणतंच साधन माझ्यासारख्या सामान्य गुंतवणूकदाराकडं नसतं. मग मी काय करायचं ? ICICI हि कंपनी सुरवातीला गुंतवणूकदाराच्या पैशाची मार्केट पोझिशन काय आहे हे गुंतवणूकदाराला SMS पाठवून कळवायची. परंतु त्यांनीही नंतर ती पद्धत बंद केली.

मागील तीन वर्षात मार्केट फारसं वाढलं नाही हे काही अंशी खरं असेलही. पण पूर्णतः खरं नाही. आणि मार्केट वाढलंच नाही असं  म्हणण्याला तरी काय अर्थ आहे ? कारण सगळ्याच गोष्टींचे भाव वाढताहेत. कोणतीही कंपनी स्वतःच्या नफ्याला गालबोट लागू देत नाही. आणि गुंतवणूदाराचा मात्र गुंतवलेला पैसाही परत येत नाही हे कसं पटावं ?
मार्केट वाढलं नाही हे खरं मानलं तरी आपली मुद्दलही परत येऊ नये हे कुणाला पटेल ? आहे तेवढी मुद्दल तर सोडाच पण सोनं गेल्यानंतर सोनारानं घट वजा करावी तसं गुंतवलेले पैसे कमी होतात हे कसं पटेल ?

माझं म्हणनं आहे ते एवढंच सामान्य माणसाचे पैसे घेऊन मोठी अमिषं दाखवत ते पैसे मार्केटमधे गुंतवणाऱ्या कंपन्यांनी ज्या कालावधीसाठी पैसे गुंतवले आहेत त्या कालावधीसाठी कमीतकमी बचत खात्याला मिळणाऱ्या व्याजान तरी मुद्दलीचा मोबदला द्यावा. नव्हे तसं करायला सदर कंपन्यांना शासनानं आणि रिझर्व ब्यांकेनं भाग पाडावं आणि सामान्य माणसाची फसवणूक थांबवावी.

त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे घरी येणारा एजंट तुम्ही गुंतवलेले पैसे दामदुप्पट कसे होतील हेच सांगतो. मार्केट कमी झालं  तर तुम्ही तोट्यातही जाऊ शकता आणि तुम्ही गुंतवलेल्या पैशापेक्षा कमी पैसेही तुमच्या पदरी पडू शकतात हे तुम्हाला कधीच सांगत नाही. त्या कंपनीला धंदाच मिळणार नाही. पण धंदा मिळावा म्हणून स्वतः च्या पोटाला चिमटा घेऊन पै-पै जमवणाऱ्या सामान्य माणसाची अशी फसवणूक करायची हि कुठली पद्धत ?

त्यामुळेच एखाद्या गुंतवणुकीत थोडं जरी नुकसान होणार असेल किंवा तसं होण्याची धुसर शक्यता असेल तरी संबंधित  गुंतवणूकदाराला तसं सांगणं किंवा त्याच्या निदर्शनास आणून देणं हे सदर कंपन्यांना बंधनकारक करायला हवं. तसं केलं नाही तर सामान्य माणूस भिकेला लागेल हे निश्चित.

तसं सांगणं असायला हवं. असंच होत राहिलं तर सामान्य माणूस भिकेला लागेल हे निश्चित.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s