मिडिया अतिरंजित होतोय

midiya 1मिडिया कशा रितीने कोणत्याही गोष्टी अतिरंजित करतात याचं  एक फार बोलकं  चित्रं  मला नेटवर पहायला मिळालं                  

६ नोव्हेंबर रोजी मी सचिनविषयी मी अत्यंत आत्मविश्वासानं पोस्ट लिहिली होती. पहिल्या सामन्यात सचिन पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा  ठरला  आपण आपल्या मनाची समजूत घालायची.  त्याच सामन्यात रोहित तर सोडाच पण अश्विनसारखा गोलंदाजही पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा बळी न ठरता शतक करून गेला. पण सचिनला पाठीशी घालायची आपल्याला सवय लागलीय.

दुसऱ्या सामन्यात सचिननं नाही केलं तरी ७४ धावांची खेळी त्याच्या लौकिकाला साजेशीच होती.

पण त्या सात-आठ दिवसात विविध माध्यमात जे काही चाललं होतं ते अतिरेकी होतं. चार राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचं रसभरीत वर्णन करणाऱ्या माध्यमांना त्या निवडणुकांचा विसर पडला होता. सचिनचा किती उदोउदो चालला होता याचं हे एक उदाहरण –

त्या काळात मी गावीच शेतावर होतो. दिवसभर वीज नव्हती. दुपारी गावात गेलो होतो तेव्हा रस्त्यावरून जाताना दुपारी बाराच्या आधीच भारतानं सामना जिंकल्याच कळालं होतं. पण सविस्तर वृतांत कळला नव्हता म्हणून संध्याकाळी सहा वाजता वीज आल्यावर टिव्हीं सुरु केला. भारतानं सामना कशा रितीनं जिंकला याचा इति वृतांत पहाण्यासाठी तीन तास सगळे न्यूज च्यानल पालथे घातले पण सगळ्याच च्यानलवर फक्त सचिन एके सचिन. भारताने सामना कसा जिंकला कुणी किती गडी बाद केले हे मला कळालं ते दुसऱ्या दिवशी वर्तमान पत्रातून. काय म्हणायचं याला ? अतिरेकच ना ?

आणखी एक उदाहरण –

सचिन संबंधात त्या पाच दिवसात विविध वाहिन्यांवर चर्चासत्रांची झुंबड उडाली होती. सचिनचा भाऊ अजित तेंडूलकर तर घरचा पाहुणाच होता.  पण एका कुणाला चर्चासत्रात सहभागी करून घ्यावं तर चक्क सचिन त्याच्या कुटुंबासह आधी ज्या फ्ल्याट मध्ये रहायचा तो फ्ल्याट ज्या कुटुंबांनी विकत घेतला त्या कुटुंबाला. काय म्हणायचं याला ? 

सचिन महान होता……… महान आहे ……… आणि महान राहील ………. याबद्दल कोणालाच शंका नाही. पण तय सामन्यात रोहितनं पुन्हा केलेलं शतक…… प्रग्यान ओझा , आश्विन , शमी, भुवनेश्वरकुमार यांनी आणि संपूर्ण संघानं एकत्रित कामगिरी करून सचिनला विजयी निरोप नक्कीच दुर्लक्षिण्याजोगा नव्हता. पण माध्यमं ( मिडिया ) माहितीप्रधान होण्याबरोबरच अतिरंजित होतोय हे ही  कुणीच नाकारू शकत नाही. आणि घराघरात पोहोचलेलं हे माध्यम अशा रितीनं अतिरंजित होणं हे केव्हाही धोकादायकच.                      

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s