सचिननं भारतरत्न किताब परत करावा

bharatrtnaसचिनला भारतरत्न म्हणून गौरविण्यात आलं. सचिनच्या लाखो चाहत्यांना सचिनच्या खेळात स्वारस्य होतं. सचिनला भारतरत्न दिला जावा असं खरंच त्याच्या चाहत्यांना खरंच वाटत नसावं . कारण सचिनला भारतरत्न दिल्यांनतर मी प्रवासात अनेकांची मतं घेण्याचा प्रयत्न केला आणि सचिनला देशातला हा सर्वोच दिला गेला हे कुणालाच फारसं पटलं नाही हे माझ्या लक्षात आलं.

मी ही पोस्ट लिहितोय म्हणून मी किंवा प्रवासात मला भेटलेले क्रिकेट प्रेमी सचिनचे वैरी नाही आहोत. माझ्यासह तमाम भारतीयांचं  सचिनवर निस्सीम प्रेम आहे. तो भारतात जन्मला आणि भारतासाठी खेळला याचा आम्हाला गर्व आहे. भारतीय संघाच्या अनेक विजयात त्याच्या खेळाचा मोलाचा वाट आहे याची आम्हाला जाणीव आहे.पण तरीही सचिनला भारतरत्न पुरस्कार द्यायला नको होता असं आम्हाला मनापासून वाटत.

सचिनला भारतरत्न का देऊ नये या विषयी मी माझ्या सचिनला भारतरत्न ??? या पोस्ट मधे  विस्तारानं लिहिलं आहे. पण आता अनेकांनी कोर्टात धाव घेतली आहे, अनेकजण न्यायदेवतेकडे दाद मागताहेत. सचिनला भारतरत्न द्यायला हवा हे सर्वमान्य असतं तर आज असा दिवस पहावा लागला नसता.

मग प्रश्न पडतो सचिनला भारतरत्न हा पुरस्कार दिला जावा हि इच्छा कुणाची ?

अर्थात आमच्या राजकारण्यांची.

आपल्या सत्तेला घरघर लागलीय हे आता कॉंग्रेसला पुरतं कळून चुकलंय. कॉंग्रेसच्या पुढील राजकारणात सचिन कॉंग्रसच्या प्रचाराची धुरा सांभाळणार आहे. प्रचाराच्या धामधुमीतून वेळ काढून राहुलबाबा सामना पहायला आले. सामना संपला. दुसऱ्या  दिवशी लगेच सचिनला भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला. तरुणांची सहानभूती मिळवायची. हा यामागचा हेतू.

शास्त्रज्ञ सी एन आर राव यांचं नाव तर मागच्या चार सहा महिन्यात कधी चर्चेतही आलं नव्हतं. मग अगदी सचिन बरोबरच त्यांनाही पुरस्कार कसा दिला गेला ? तर सचिनला पुरस्कार देताना काही पार्सलिटी झाली अशी शंका कुणाला येवू नये केवळ एवढ्यासाठीच सचिनच्या नावासोबत सी एन आर राव यांचं नाव पुढे केलं गेलं.

कुणीतरी कोर्टात जाणार ………कुणीतरी आडूनआडून कुजबुजणार………… कुणीतरी निषेध नोंदवणार. याआधी अनेकांना भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आला. पण त्याबत कधी कोणी आक्षेप घेतल्याचं माझ्या ऐकिवात नाही. आधीचं जावू द्या सचिनच्यासोबत ज्या सी एन आर राव यांना पुरस्कार दिला त्यासंदर्भात तरी कोणी आक्षेप घेतलाय का हो ?
आणि सचिनला भारतरत्न जाहीर केल्यानंतर त्याविरोधात न्यायालयात धाव घेणारी मंडळी  न्यायालयात गेलीत ती ते सचिनचा दुस्वास करतात म्हणून नव्हे तर आमच्या सत्ताधाऱ्यांनी घटनेची जी मोडतोड चालवली आहे ती थांबावी म्हणून. बघू या काय करते न्यायदेवता.  

परवा लतादीदींनी नरेंद्र मोदींची खुशामत करताच पित्त खवळलेल्या कॉंग्रेस नेत्यांनी कसा लगेच त्यांचा भारतरत्न पुरस्कार काढून घेण्याचा फतवा काढला होता तसंच उद्या सचिनने कॉंग्रेसचा प्रचार करण्यास नकार दिला तर त्याचाही पुरस्कार काढून घेतला जाईल. अशी मानहानी होण्यापेक्षा सचिननं स्वतःच पुरस्कार परत केला तर ते त्याच्या कर्तुत्वाला शोभूनच दिसेल.

सचिनला खेलरत्न पुरस्कार देत आला असताना. त्याविषयी कुणीच आक्षेप घेतला नसता. पण सचिनला भारत रत्न पुरस्कार मुळीच द्यायला नको होता. कारण सचिनचे रेकॉर्ड हे माईलस्टोन मानले तर या पुढे सचिनचे हे रेकॉर्ड मोडणाऱ्या प्रत्येक क्रिकेटपटूला भारतरत्न पुरस्कार द्यायला हवा. आणि ते योग्य असेल का ?

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s