‘ आप ‘ चं यश

 

aam aadmi parti

aam aadmi parti

आम आदमी पार्टीनं दिल्लीत अपेक्षेपेक्षा घवघवीत यश मिळवलं. केजरीवालांच्या यशाची मुळं रोवली गेली ती आण्णांच्या जंतरमंतरवरील लोकपालच्या अंमलबजावणीसाठी केलेल्या आंदोलनात आणि उपोषणात. त्यापूर्वी कोण ओळखत होतं केजरीवालांना ? पण सुतावरून स्वर्ग गाठण्याची किमया मात्र केजरीवालांची.

केजरीवालांनी आपल्या पक्षाला आम आदमी पार्टी हे नाव दिलं खरं. पण खरंच केजरीवालांच्या भोवतीची आणि निवडणूक जिंकणारी सगळीच मंडळी आम आदमी आहेत ? विधानसभेची निवडणूक जिंकण्याची कुवत असते का आम आदमीची ? निवडणुकीतील यशानंतर आम आदमी पार्टीच्या मुख्य कार्यालय समोर जमलेल्या समुदायापैकी शंभर टक्के सोडाच पण ८० % तरी मंडळी आम आदमी असतील का हो ? मुळात आम आदमीची व्याख्या काय ? मी जर उद्या केजरीवालांचं नाव घेऊन विधानसभेच्या सोडा साध्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला उभा राहिलो तर निवडून येईल का हो ? कुणीही सांगेल……….. नाही. कारण मी आम आदमी आहे. जो रोजच्या जगण्यासाठी धडपडतो तो आम आदमी.

केजरीवाल सांगतात कि, ” हमारे पार्टी के कई लोग अपनी नौकरी छोड के आये है. क्यो ? ओ केजरीवालसे प्यार नही करते ……ना तो ओ आम आदमी पार्टीसे प्यार करते है. ओ प्यार करते है अपने देशसे.’

टाळ्यांसाठी आणि जनतेची सहानभूती मिळवण्यासाठी हे स्टेटमेंट नंबरवन. ते खरंही असेल पण नोकरी सोडून केजरीवालांच्या पाठीशी उभं रहाणाऱ्या मंडळींना उद्याची चिंता असेल ? दोन वेळच्या अन्नाची भ्रांत नसते तेव्हा अशा गोष्टी सुचू शकतात. पण एकवेळचं अन्नं मिळण्याची शक्यता नसते तेव्हा ?-  तेव्हा अशा गोष्टींचा विचारही मनाला शिवत नाही.

मी आम आदमी पार्टीच्या आणि केजरीवालांच्या यशाला नाकारत नाही. उलट आम आदमी पार्टी सत्तेत आली असती तर मला अधिक आंनद झाला असता. त्यांनी जी आश्वासनं दिली होती ती पाळण्याची संधी त्यांना मिळाली असती.

आम आदमी पार्टीचा अजेंडा जनमनाला खूप प्रभावित करतो. अशा जनहिताच्या जाहीरनाम्याची अंमलबजावनी करण्याची संधी जर आम आदमी पार्टीला मिळाली असती आणि जर ती अंमलबजावनी आम आदमी पार्टीनं यशस्वीपणे केली असती  तर खरंच  या देशाच्या लोकशाहीला एक नवी दिशा मिळाली असती.

पण आशा अजून मावळली नाही. जर आपला शब्द पाळण्यात आम आदमी पार्टी यशस्वी झाली तर तिनं आख्खा देश कवेत घ्यावा आणि या देशातल्या लोकशाहीला खऱ्या अर्थानं बळकटी प्राप्त करून द्यावी.

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s