आम आदमी पार्टीनं काय दिलं ?

aap1आम आदमी पार्टीनं दिल्लीत अपेक्षेपेक्षा घवघवीत यश मिळवलं. भल्या भल्या पत्रकारांनी मोठमोठी विधानं केली पण आम आदमी पार्टीकडे देशव्यापी राजकारण करण्याची कुवत नाही हेसत्य मात्रं सगळ्यांनीच डोळ्याआड केलं.

कारण आज तरी आम आदमी पार्टीचं  स्वरूप तमिळनाडूमध्ये ………… तेलगु देसम, आसाममध्ये……………… आसाम गणपरिषद, महाराष्ट्रात………shivsena……शिवसेना आणि राष्ट्रवादी, पंजाबमध्ये………… अकालीदल यांच्याप्रमाणे आजतरी दिल्लीपुरतच मर्यादित आहे. आणि अनेक वर्षात जशी इतर पक्षांची मजल प्रादेशिक सीमा ओलांडून पलीकडे गेली नाही तशीच आम आदमी पार्टीची धावही दिल्लीच्या पलीकडे जाईल असं आजतरी दिसत नाही.

आम आदमी पार्टी आणि इतर स्थानिक पक्षात एक फार मोठा फरक आहे. शिवसेना हिंदुत्ववादी आहे…………. राष्ट्रवादी पवारांना पंतप्रधान मिळत नसल्याच्या असंतोषातून जन्माला आली आहे……………तेलगुदेसम तमिळांचा अहंकार  जपण्यासाठी आकाराला आली वगैरे वगैरे. पण आम आदमी पार्टी मात्र धर्म , प्रांत या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन जनहिताची भूमिका घेतेय. भ्रष्टाचार हि या देशाला लागलेली कीड आहे त्या भ्रष्टाचाराच्या विरोधात उभी राहू पहातेय. त्यामुळेच आम आदमी पार्टीनं अधिक व्यापक रूप धारण करावं कॉंग्रेस आणि भारतीय जनता पार्टीला एक समर्थ पर्याय म्हणून उभं रहावं पण हे होत नाही तो पर्यंत तरी इतर प्रादेशिक पक्षांप्रमाणेच आम आदमी पार्टीही त्रिशंकू लोकसभेला हातभार लावणार आहे. आणि त्रिशंकू लोकसभा काय आणि विधानसभा काय या देशाच्या प्रगतीला आणि लोकशाहीला घातकच आहे.

local partyगेली अनेक वर्ष विविध राज्यात आणि या देशात त्रिशंकू सरकारं अस्तित्वात येताहेत. दोनापासून तेरा तेरा पक्ष एकत्र करून  सत्तेची मोट बांधली जातेय. हि अशी मोट ओढताना भारतीय जनता पार्टी आणि कॉंग्रेस या प्रमुख राजकीय पक्षांची मोठी तारांबळ होतेय. आणि याचाच परिणाम म्हणून हा देश संकटात सापडतोय.  हे कुणाच्याच लक्षात येत नाही. या प्रकाराला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्नही कुणी करत नाही. पण हे थांबायला हवं. विधानसभेचं ठीक आहे पण लोकसभेलातरी या स्थानिक पक्षांवर निर्बंध आणायला हवेत. तरच या देशाला स्थिर सरकार लाभू शकतं  आणि या देशाची प्रगती होऊ शकते.           

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s