अरविंद केजरीवाल आणि जनता दरबार

Arvind Kejriwal 1” हमारे पास बहुमत नहीं है।  इसलिए हम विरोधी बाकोंपर ही बैठेंगे । बीजेपी के पास अधिकतम विधायक है तो वही सरकार बनाले।  ” अरविंद केजरीवालांचा हा एकच घोषा होता.

त्याचवेळी बीजेपी मात्र, ” आम्ही कोणत्याही प्रकारे तोडफोडीच राजकारण करणार नसून विरोधी बाकांवर बसणार आहोत. ” असं ठामपणे सांगत होती.

आम आदमी पार्टीच्या केजरीवालांचा मात्रं बीजेपीवर विश्वास नव्हता. अरविंद केजरीवाल म्हणत होते, ” आगे होता है क्या देखते जाव। बीजेपी कुछ भी तोड़फोड़ करेगी लेकिन सत्ता नही छोड़ेगी। ”

झालं काय ! सगळ्यांवर शिंतोडे उडवत………….  कॉंग्रेसला साथीला घेत अरविंद केजरीवाल सत्तेत आले. गणपतीची आरती केल्यानंतर खिरापत वाटावी इतक्या सहजपणे आश्वासनांची पूर्तता करत सुटले. जनता दरबार भरवायचा ठरवला आणि जनतेला तोंड देत मागे सरकता सरकता विधानभवनाच्या छतावर पोहचले. ही केजरीवालांच्या पीछेहाटीची सुरवात आहे.

ज्या रितीने केजरीवाल जनतेशी संवाद साधतात त्यातून स्वतः केजरीवाल आपलं गाऱ्हाणं ऐकून घेतील आणि आपल्याला न्याय देतील असा विश्वास  दिल्लीकराला होता. आणि प्रत्येकजण त्याच विश्वासानं जनता दरबारात हजर झाला होता.

पण सुशिक्षित आणि सोशल म्हणता म्हणता दिल्लीकर किती मतलबी आहेत हे दिसून आलं . जवळजवळ सगळ्यांचेच प्रोब्लेम वैयक्तित स्वरूपाचे होते. ज्या काही अडचणी माध्यमांच्या माध्यमातून ऐकायला मिळाल्या त्या अशा –

  • मी अनेक वर्षांपासून आमक्या आमक्या ठिकाणी कामाला आहे परंतु अद्यापही मला कायम करण्यात आलेले नाही .
  • आम्ही अनेक वर्षांपासून आमक्या आमक्या ठिकाणी कामाला आहोत परंतू आम्हाला पे रोलनुसार पगार दिला जात नाही.
  • आमच्या घराला खूप हेलपाटे घालूनही परवानगी मिळत नाही ………….वैगेरे …………… वैगेरे.

अशा प्रकारचा जनता दरबार राज्याच्या किंवा देशहिताच्या दृष्टीकोनातून किती हितावह आहे.  त्यामुळेच किरण बेदींनी त्या जनता दरबारा संदर्भात , ” छतपर चढ़कर संसद नही चलायी जाती।” असं जे विधान केलं ते अत्यंत योग्य आहे.

अशा रितीने रस्त्यावर येऊन जनतेची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी मुख्यमंत्री नसतोच मुळी. त्यानं जनतेची गाऱ्हाणी , त्यांच्या अडचणी ऐकून घ्यावात त्या सोडविण्यासाठी एक सिस्टीम राबवावी पण त्यासाठी स्वतः रस्त्यावर येऊ नये आणि जनतेलाही रस्त्यावर आणू नये.

पण झालंय काय ? अरविंद केजरीवालांना हाती आलेली संधी दवडायची नाही. मी ( स्वतः केजरीवाल आम आदमी पार्टी नव्हे ) किती कार्यक्षम आहे हे त्यांना जनतेला दाखवून द्यायचय. त्यासाठीच त्यांनी दिवसागणिक निर्णय घ्यायचा सपाटा लावलाय. हे निर्णय घेण्यापूर्वी त्या त्या प्रकरणाचा त्यांनी किती सखोल अभ्यास केलेला असतो कुणास ठावूक. पण सत्तेत आल्यानंतर केवळ काही दिवसात पाणी प्रश्नाचा आणि निम्म्या दरात वीज देण्याचाarwind kejriwal निर्णय पुरेसा अभ्यास करून घेतला असेल हे कुणा सामान्य माणसालाही पटणार नाही.

आणि अरविंद केजरीवालांची हि सवंग निर्णयक्षमता पाहून जर त्यांच्यात कुणाला या देशाचा भावी पंतप्रधान दिसत असेल तर या देशाचा विनाशकाल जवळ आला आहे असेच म्हणावे लागेल. 

मतदारांनो जागे व्हा , योग्य निर्णय घ्या आणि मगच मत द्या.लोकसभेला जर तुम्ही स्थानिक ( Local  parties , Regional parties ) पक्षांना मत देत बसलात तर देशात पुन्हा अस्थिर सरकार येईल आणि ते या देशाला अधोगतीकडे घेऊन जाईल. तेव्हा आम आदमी पार्टीच काय पण बीजेपी अथवा काँग्रेस  पक्षाशी युती नसलेल्या कोणत्याच स्थानिक किंवा प्रांतीय पक्षाला       ( Local  parties , Regional parties ) मत देऊ नका.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s