तिळगुळ घ्या, गोड गोड बोला

कालच गावाहून आलो. अनेकांनी मकरसंक्रांती संबंधित काहीतरी मिळेल या अपेक्षेने माझ्या ब्लॉगला भेट दिली होती. नवं काहीतरी द्यावं या हेतूनं बसलो आणि तुम्हाला रुचेल असं भेटकार्ड तयार केलं.

आज मकरसंक्रांत. बारा राशी असतात हे आपल्याला माहिती आहे. ज्या दिवशी सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्या दिवसाला संक्रांत म्हणतात. आणि आजच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून आजच्या दिवसाला मकरसंक्रांत म्हणतात.
बारा महिन्याच्या बारा राशी असतात. त्यामुळे प्रत्येक महिन्यात सुर्य दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. सहाजिकच प्रत्येक महिन्यात संक्रांत असते. मग मकरसंक्रांतीलाच एवढ महत्व का ? 
कारण आजपासून उत्तरायण सुरु होतं. सुर्य भारताच्या अधिकाधिक जवळ येऊ लागतो.
tilgul त्यामुळेच दिवस मोठा रात्रं लहान होऊ लागते. अंधार हे वाईटाचं  तर प्रकाश हे चांगुलपणाचं प्रतिक मानतात. सहाजिकच मकरसंक्रांत हा दिवस वाईट गोष्टींच्या निर्मूलनाचा तर चांगल्या गोष्टींच्या आगमनाचा दिवस मानतात. दिवस मोठा झाल्यामुळे प्रत्येक प्राणिमात्राला अधिक उर्जा मिळू लागते. वसंत ऋतूच्या आगमनाला अनकूल परिस्थिती निर्माण होते. आजपासून वाढणारा उन्हाचा चटकाच उद्याच्या पावसाची रुजवात करणार असतो.

थोडक्यात उद्याच्या भाग्योदयाची सुरवात आजपासून होणार असते.  म्हणून आजचा दिवस प्रत्येकाला तिळगुळ देऊन , प्रत्येकाला नव्या भवितव्यासाठी शुभेच्छा देऊन साजरा केला जातो

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s