अंगणवाडी सेविकेंच्या मागण्या

anganwadiनिवडणुका जवळ आल्यात. त्यामुळे आपल्या मागण्या शासन दरबारी मांडण्याची आणि त्यांचा पाठपुरावा करण्याची हीच योग्य वेळ आहे याची जाणीव सर्वच संघटनांना असते. सहाजिकच शासनाला नाक मुठीत धरायला लावण्यासाठी सगळ्याच संघटना कंबर कसतात. पण मतांसाठी शासनाने या दबावाला बळी पडू नये.
कोल्हापूरकरांच टोलविरोधी आंदोलन रास्तच आहे. कारण कोल्हापूरकरांनी आंदोलन केलं नसतं तर येत्या काळात प्रत्येक महानगरपालिकेत असा टोल आकारण्याची प्रथाच पडली असती.
पण अंगणवाडी सेविकेंच्या मागण्या मात्रं अवास्तव आहेत. अरे करा ना थोडी विनामोबदला समाजसेवा. काही बिघडेल का ? नको वाटत असेल सोडून द्या आणि घरी बसा. पण प्रत्येकवेळी कुणीही उठाव आणि शासनाला वेठीला ठरावा हे साफ चुकीचं आहे. अर्थात हि वेळ येण्यालाही शासनच जबाबदार आहे. पुढाऱ्यांच्या शैक्षणिक संस्था चालाव्यात म्हणून कुठलेतरी थातूर मातुर कोर्स सुरु करायचे. स्वतःला सुशिक्षित म्हणवून घेणारे बेकार वाढवायचे. त्यांची खुशामत करण्यासाठी त्यांना शासकीय यंत्रणेत वशिल्यावारी कुठंतरी तात्पुरतं म्हणून सामावून घायचं. आणि नंतर त्यांना तोंड देत बसायचं.
मुळात जिथं शासकीयचं काय खाजगी क्षेत्रातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचा बोजवारा उडालेला आहे तिथं  त अंगणवाड्यांची गरजच काय होती. परंतु असं काही केलं नाही तर पुढाऱ्यांना आणि शासकीय अधिकाऱ्यांना चरायला कुठे मिळणार ? पुढारी आणि हे अधिकारी जनतेच्या पैशावर कसे हात मारतात हे सगळ्यांनाच चांगलं ज्ञात आहे. या अंगणवाड्यांच्या संदर्भातील एक बातमी नुकतीच माझ्या वाचण्यात आली होती. फायबरच्या अंगणवाड्या उभारायच्या असा निर्णय जिल्हा परिषदेनं घेतला. लगेच कार्यतत्परता दाखवून अनेक अंगणवाड्या उभारल्या. १५ कोटी रुपये खर्च केले…… आणि मग या अधिकाऱ्यांना या फायबरच्या खोल्या वाऱ्या वादळात टिकणार नाहीत अशी उपरती झाली. अपघाताचा धोका लक्षात घेऊन त्या अंगणवाड्यांच्या फायबरच्या खोल्या मोडीत काढण्याचंही ठरलं. पण कंट्रात दाराचं देणं चुकणार नव्हतं. कुणाचं नुसकान झालं ? तुमचं ……माझं………आपलं. शासनाचं, पुढाऱ्यांच, अधिकाऱ्याचं नव्हे. शासकीय तिजोरीवर बोजा पडला की ते काही त्यांच्या खिशातनं घालत नाहीत. आपल्याच खिशाला ब्लेड लावतात.
कित्येक प्राथमिक शाळांमधल्या तिसरी चौथीच्या मुलाला साधं लिहिता वाचताही येत नाही. परवाच आपण महाबळेश्वरला दोन दिवसांच्या अधिवेशनासाठी सहा दिवसांची सुटी टाकणाऱ्या शिक्षकांविषयी वाचलंय. कोणती निष्ठा आहे त्यांना त्यांच्या जबाबदारीविषयी /
मी आमच्या गावाकडच्या वस्तीवरच्या शाळेत आठ आठ दिवस शिक्षक नसल्याचं पहातो.  गुरुजी आले नाहीत म्हणून मुलं दुपारीच घरी निघून येतात. कसं होणार या देशाच्या भावी पिढीचं ?
अंगणवाडी सेविकातरि यापेक्षा वेगळं काय करतात ? काय शिकवतात त्या मुलांना ?
बरं यांच्या मागण्या तरी केवढ्या –

  • शासकीय कर्मचारी म्हणून मान्यता दया .
  • सेविकेस १०००० तर मदतनिसांना ७५०० पगार दयावा.
  • बोनस दयावा.
  • कामाच्या ठिकाणीच पोषक आहार दयावा. ( ( म्हणजे उद्या अन्नातून विषबाधा झाली की पुन्हा शासनावर ठपका. नुकसान भरपायीची मागणी  )

कशासाठी एवढ सगळं? काय उत्पादकता या सगळ्याची ? त्यामुळेच anganwadianganwadiशासनानं अत्यंत ठाम भूमिका घेऊन या उठवाविरोधात उभं रहावं. आणि अंगणवाड्या बंदच कराव्यात. इतकंच काय यापुढे शिक्षण व्यवस्थेला अधिक फाटे फोडू नयेत. जिथे गरज आहे तिथेच स्पर्धापरीक्षा हा उपक्रम राबवावा. शालेय प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या गुणवत्ता चाचण्या बंद कराव्यात.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s