एका दगडात चार पक्षी

sonia rahulलोकसभेच्या निवडणुका पार पडेपर्यंत माझ्याकडून राजकारणाशिवाय अन्य विषयांवर फारसं लिखाण होईल असं मला वाटत नाही. कारण काँग्रेस आपले नेहमीचे फंडे वापरतय. हाती असलेल्या सत्तेचा पुरेपूर वापर करतंय. ( गैर कि योग्य ? पण गैर यावर बहुमत होईल असं मला वाटतं. )

राहुल गांधींची छबी मतदारांच्या मनावर बिंबवण्यासाठी काँग्रेसचा किती आटापिटा चाललाय. त्यासाठी पाचशे कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आलीय. जाहीर पाचशे कोटी आतून पाच हजार कोटीसुद्धा खर्च करणार असतील. किती जाहिरात राहुल गांधींची सगळ्याच टिव्ही च्यानलवर ? जणू एखाद्या कंपनीनं नवं प्रोडक्ट लाँच केलंय. त्यांनी त्यांची कितीही जाहिरात करावी त्याविषयी माझं काही म्हणनं नाही. पण एखाद्या पक्षाला पाठिंबा देणाऱ्या इतर मान्यवरांवर शिंतोडे तरी उडवू नयेत.

  • सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर मोदींच्या व्यासपीठावर गेल्या. त्यांनी मोदींचं कौतुक केलं. झालं लगेच काँग्रेसनं बाह्या सरसावल्या. अगदी त्यांचं भारतरत्न काढून घ्यायला हवं असं म्हणण्यापर्यंत काँग्रेसची मजल गेली.
  • सलमान खाननं मोदींचं कौतुक केलं. झालं लगेच काँग्रेसला मिर्च्या झोंबल्या. निघाले ‘ जय हो ‘वर बहिष्कार टाकायला. हे कसलं राजकारण.

काँग्रेसनं सचिन तेंडुलकरला आपल्या गोटात ओढलं तेव्हा बीजेपीनं सोडा इतर कुणीही ब्र तरी काढला का हो ?

मी परवाच लिहिलेल्या ‘ काँग्रेसच नको तर राहुल कशाला ‘  या लेखात काँग्रेस राहुल गांधींना कसं महान ठरवू पहातेय याविषयी लिहिलं आहे. पण आम आदमी पार्टीच्या आंदोलन तंत्राचं अनुकरण करताना काँग्रेसचेच नेते सत्ताधारी काँग्रेसच्या विरोधात आंदोलन आणि उपोषणचं अस्त्र वापरताहेत. तुम्हाला माहिती आहेच पण तरीही एक दोन उदाहरणं देतो.

  • कोल्हापुरातील टोल आंदोलनाच्या पाठीशी उभे राहिले ते काँग्रेसचेच नेते.
  • वीज बील कमी करण्यासाठी समिती नेमायची. त्या समितीचं अध्यक्षपद नारायण राणेंच्या पदरात घालायचं. नारायण राणेंच्या शिफारशी विचारात घेत मुख्यमंत्री पृथ्वी राज चव्हाण यांनी वीज दरात २० टक्के कपात जाहीर करायची. त्यातून मुंबईला वगळायचं. ( मुंबईला वीजदरात सवलत का नाही याविषयी कारणं काही दिली असतील तरी मुंबई शिवसेनेच्या ताब्यात आहे म्हणून मुंबईला वीजदरात सवलत नाही हे खरं कारण ) मग संजय निरुपम ( हे खासदार कुणाचे ? काँग्रेसचेच ) यांनी मुंबईला वीजदरात सवलत मिळावी म्हणून उपोषण करायचं. आणि मुख्यमंत्र्यांनी मुंबईलाही सवलत लागू करायची. झाले कि नाही एका दगडात चार पक्षी. नारायण राणेही महान……… मुख्यमंत्रीही महान………… संजय निरुपमही महान……… आणि कॉंग्रेसही महान.

सर्वसामान्यांच्या लक्षात हे राजकारण येणार नाही. पण ही काँग्रेसची अखेरच्या श्वासासाठीची धडपड आहे हेच खरं.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s