आज नव्यानं हा ब्लॉग सुरु करतोय

maymrathi

आज नव्यानं हा ब्लॉग सुरु करतोय. ‘ रिमझिम पाऊस ‘ हे जरी या ब्लॉगच शिर्षक असलं तरी हा ब्लॉग निव्वळ ‘ पाऊस ‘ या एकाच विषयाला वाहिलेला नाही. प्रेम, प्रेमकविता, चारोळी, मी लिहिलेली गाणी, कथा, बोधकथा, राजकारण, sms, विनोद असं खुप काही असणार आहे या ब्लॉगमधे. पाऊस जसा टाळता येत नाही तशाच या साऱ्या गोष्टी. कधी आपलं आयुष्य खारट करणार ……… तर कधी आंबट……कधी तिखट ……… तर कधी गोड.

link for this blog –

http://maymrathi.blogspot.com/

pl bookmark this link.

कोणताही पदार्थ जीभेवर टेकला  की त्याची चव आपल्याला सोसावीच लागते. हवेची झुळूक आली कि ती सोबत धुरळा आणते आणि दरवळही. आपल्याला काहीच टाळता येत नाही. पाऊस जसा टाळता येत नाही तसंच. आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांचे परिणामही आपल्याला कधीच टाळता येत नाहीत. माझ्या कवितांसह अशा अवतीभोवतीच्या घटीतांची रिमझिम म्हणजे हा ब्लॉग ‘ रिमझिम पाऊस ‘. यात नव्या लिखाणाबरोबर माझ्या जुन्या ब्लॉग मधील अनेक पोस्ट असतील.

कारण पाऊस येतो.…….  त्याचा आपल्यापर्यंत पोहचलेला प्रत्येक थेंब आपल्याला चिंब करून जातो…… आपल्या रोमारोमात उतोरतो.……. कधी कौलावरच्या पागोळ्या होतो……… कधी अंगणातल्या रांगोळ्या होतो…….कधी होतो रानातला झरा……. कधी टपटपणारी गारा. माझे माझ्या जुन्या ब्लॉगचे जवळ जवळ ५० हजारहून अधिक रसिक वाचक हे त्या माझ्यापर्यंत येऊन पोहचलेल्या……. मला चिंब करणाऱ्या पावसाच्या थेंबांसारखे आहेत. त्यांनी मला  चिंब केलंय मला नखशिखांत न्याहळलय.

येणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जसा नवा असतो तसेच या ब्लॉगला नव्यानं भेट देणारे वाचक असणार आहेत. त्यांना माझ्या जुन्या लिखाणाचा गंध अनुभवता यावा म्हणून जुन्या ब्लॉगवरच्या नव्यानं पोस्ट करणार आहे पण तसं करताना नव्या ब्लॉगची नवलीही जपणार आहे. कारण मला माहिती आहे पिवळी पडून गळू पहाणारी पालवी कोणालाच नको असते प्रत्येकाला हवं असतं वसंत ऋतूत कोंबाकोंबातून अवतरणार नवं चैत्यन्य.
मला विश्वास आहे जुनी जर जपता जपता मी नवी पैठणीही जन्माला घालीन.

भेटत रहा नव्या ब्लॉगवर .    ‘ रिमझिम पाऊस ‘  वर

http://maymrathi.blogspot.com/ या लिंकवर.

Advertisements

आभाळाचं डोळं, तिच्याकडं लागलं

ती त्याला दिसते……डोळ्यांना डोळे भीडतात आणि एका अवचित क्षणी तो तिच्या आणि ती त्याच्या मनात भरते. पण हे कधी….कुठे……आणि कसं घडतं….. Continue reading

असंही गीत

ganpati

ganpati

भक्ती गीतं लिहिणं हा माझा पिंड नाही. पण कधी कधी अचानक आभाळ दाटून यावं तसे काही विचार येतात.आणि ध्यानीमनी नसताना एखादं भक्तीगीत आकार घेतं. पांडुरंग हे काही माझं आराध्य दैवत नाही. पण Continue reading

शपथ झाली पोरकी

प्रेम कुणामधलंही असो. आई मुलातलं असो…….नवरा बायकोतलं असो……..प्रियकर प्रेयसीतलं असो………वडील मुलातलं असो……मित्रा मित्रातलं असो किंवा मित्र मैत्रीणीतलं असो. प्रेमाच्या कोणत्याही पदराला बंधनाची झालर असतेच. का अशा बंधनाची गरज भासते माणसाला ? कारण Continue reading

मैत्री : तीही गाढवाशी.

donkeyसुदंर मुलीच्या प्रेमात कुणीही पडतो. पण रंगानं काळ्या , दात पुढं आलेल्या मुलीकडे कुणी वळूनही पहात नाही. तिलाही प्रेमाची गरज असतेच ना ? पण असा साधा विचारही कधी आपल्या मनात येत नाही. का असं ?

एखाद्या छानछोकी खिसा खुळखुळनाऱ्या मुलाकडे मुली सहज ओढल्या जातात. पण अंगावर साधेसुधे कपडे असणाऱ्या सरळ मार्गी मुलाला मात्र त्या मुर्खात काढतात. त्या मुलालाही मन आहे भावना आहेत याची जाणीवही नसते मुलींना.  का असं ?

सुंदर मुलीच्या प्रेमात पडायला आणि श्रीमंत मुलांना भुरळ घालायला फार बुद्धी लागत नाही. त्यासाठी Continue reading

गोष्ट

वर्तमान पत्रातल्या एकेक बातम्या पहिल्या कि फार फार वाईट वाटतं. भ्रष्टाचार …………बलात्कार ………. खून ………..दरोडे. कसलं शासन आणि कसली सुरक्षितता ? किती बेभरवश्याच आयुष्य जगतो आहोत आम्ही. या साऱ्याला जबाबदार कोण आम्ही कि  आमच्या देशातली व्यवस्था ? यातून बाहेर पडायला मार्गच नाही का  ?

आहे ! निचित आहे. फक्त आम्हाला शिवाजी महाराजांनी दिलेला लढा, झाशीच्या राणीन केलेला उठाव, भगतसिंगाच बलिदान, स्वातंत्रवीर सावरकरांनी भोगलेली काळ्या पाण्याची शिक्षा आठवायला हवी.

हो ! मान्य.  हे सारं परकीय  सत्तेविरुद्ध  होतं. आता आपण, आपणच निर्माण केलेल्या लोकशाही विरुद्ध कसं लढायचं ?

असाच प्रश्न पडणार असेल तर अमेरिकेचा स्वातंत्र्य लढा आठवावा, Continue reading

तुमचा बाप तुमच्यावर अन्याय करतोय ?

मी लहान होतो तेव्हा माझा बाप माझ्यावर अन्याय करतोय असं मला वाटायचं. त्याचं वागणं चुकीचं नसेल. किंवा मी आज ज्या रीतीनं माझ्या पायावर उभा आहे ते पाहिलं कि वाटतं त्याचं वागणं चुकीचं नव्हताच. पण तरीही मी माझ्या मुलांशी फार कठोरपणे वागू शकत नाही. तरीही माझ्या मुलांना माझं वागणं कठोर वाटत असेल. पण मित्रांनो नाही. प्रत्येक बाप त्याच्या मुलांशी जे काही वागतो ते त्या मुलांच्या उज्ज्वल भावितव्यासाठीच. पण हे आज पटतंय.

त्या वयात कळतच नाही चुकतंय कोण ते. कळत नाही म्हणण्यापेक्षा आपण बरोबरच आहोत. कळत नाही ते आपल्या आई बाबांना. आपल्या वयात तेही असेच वागले असतील. आपल्यासारख्याच चुका केल्या असतील. आपण जसा आज मार खातो ना त्यांचा तसा त्यांनीही मार खाल्ला असेल आपल्या आजोबांचा. पण आज आपल्याला शहाणपण शिकवताहेत. असं ठाम मत असतं आपलं.

पण Continue reading