तिळगुळ घ्या, गोड गोड बोला

कालच गावाहून आलो. अनेकांनी मकरसंक्रांती संबंधित काहीतरी मिळेल या अपेक्षेने माझ्या ब्लॉगला भेट दिली होती. नवं काहीतरी द्यावं या हेतूनं बसलो आणि तुम्हाला रुचेल असं भेटकार्ड तयार केलं.

आज मकरसंक्रांत. बारा राशी असतात हे आपल्याला माहिती आहे. ज्या दिवशी सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्या दिवसाला संक्रांत म्हणतात. आणि आजच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून आजच्या दिवसाला मकरसंक्रांत म्हणतात.
बारा महिन्याच्या बारा राशी असतात. त्यामुळे प्रत्येक महिन्यात सुर्य दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. सहाजिकच प्रत्येक महिन्यात संक्रांत असते. मग मकरसंक्रांतीलाच एवढ महत्व का ?  Continue reading

Advertisements

दिवा म्हणजे

माझ्या तमाम मित्रांना, रसिकांना, जगभर विखुरलेले असूनही हिंदू संस्कृतीवर प्रेम करणाऱ्या… Continue reading

गोड बोल गाढवा

tilgulकाल खूप दिवसांनी गावाहून आलो. पाणी आहे. शेतीत रमलोय. कष्ट करतोय. कष्ट कंपनीत असतानाही करत होतो. त्याबदल्यात मिळावा तेवढा मोबदला मिळत नव्हता. आपल्यापेक्षा कमी बुद्धिमत्तेची आणि कामचुकार मंडळी केवळ लाळघोटेपनाच्या, हुजरेगीरीच्या जोरावर आपल्यापेक्षा अधिक पगार घेतात हे पाहून व्यथित व्हायचो.

शेतात मेथी केली होती. परिसरात माझ्या मेथीची ख्याती पसरली होती. तीन चार किलोमीटरहून काही मंडळी आली माझा प्लॉट पाहून खुश झाली. बाजारही बरा मिळाला. काही हजार रुपये पदरात पडले. फायदा किती झाला यापेक्षाही आज एका कुटुंबाचा मी पूर्णवेळ पोशिंदा आहे याचं मला समाधान आहे. याव्यतिरिक्तअधूनमधून बारा चौदा गडी बाया माझ्या शेतावर काम करत असतात. त्यांच्याही मीठ मिरचीची सोय माझ्यामुळे होत असते. मेथीचा प्लॉट संपलाय. आता पुढचं नियोजन चालू आहे.

काल आलो. आज ब्लॉग उघडला. माझ्या ब्लॉगच प्रगतिपुस्तक (stats ) पहिल. आज मकरसंक्रात माझ्या शुभेछा मिळतील काही नव्या ओळी मिळतील, संक्रतीसाठी एखादं भेटकार्ड मिळेल या अपेक्षेने आज अनेकांनी माझ्या ब्लॉगला भेट दिली पण त्यांच्या नशिबी निराशाच पडली असेल. कारण मी आज अजून काहीच पोस्ट केलं नव्हतं. त्यामुळेच ‘ तिळगुळ ‘ हि मागच्या संक्रातीला टाकलेली कविताच अनेकांनी आज पुन्हा पहिली. म्हणून आज तुम्हाला मकरसंक्रातीच्या मनःपूर्वक शुभेछा देतानाच देतोय एक खोडकर भेटकार्ड. Continue reading

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

अनेकांना अनेकांकडून अशा ढिगभर शुभेच्छा आल्या असतील त्यात आणखी माझ्या शुभेच्छाची भर. कोण वाचणार हि पोस्ट ? पण वाचायला हवी. वाचायला हवी म्हणण्यापेक्षा पहायला हवी. आणि माझे रसिक वाचक ही पोस्ट आवर्जून वाचतील असा  मला विश्वास आहे. कारण Continue reading

म्हणूनच

आज खूप दिवसानंतर लिहितोय. लिहायला विषय नाहीत असा नाही, वेळच नाही हेच खरं कारण. कारण विषयाला तोटा मुळीच नसतो. अगदी नवीन वर्षाच्या शुभेच्छाही मी तुम्हाला दिलेल्या नाहीत. पण मी मी शुभेच्या दिल्या नाहीत म्हणजे मी तुमचा अहित चिंततो आहे असं मुळीच नाही. जगात प्रत्येकाचं कल्याण व्हावं हीच माझी भूमिका. नौकरी सोडल आहे. गावी जावून शेती पहातो आहे. आता माणसं जवळून दिसताहेत. त्यांचे अंतरंग न्याहाळता अनुभवतो आहे. म्हणजे आजपर्यंत माणसं पहात नव्हतो असं नाही. पण आजपर्यंत भाजी भाकरी आणि रोजच्या विवंचनातच बुडून गेलेलो असायचो. पण आज लिहायला बसलोय ते तुम्हाला मकर संक्रांतीच्या  शुभेच्छा देण्यासाठीच –

तिळगुळ, संक्रांत

असं सुखाचं वर्ष यावं

मित्रहो,

दिवसभर खूप कंटाळलो आहे. सकाळी लवकर उठायचं. पुन्हा ऑफिसला जायचंय. रविवारी ऑडीट आहे. त्यामुळं हक्काची सुट्टीही बोंबलली. कसलं सेलिब्रेशन अन कसलं काय ? उद्या पेपरात तर्रर्र झालेल्यांचे आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी झपाटून गेलेल्यांचे एकेक किस्से वाचले कि मला प्रश्न पडतो – ” आयला. कसा वेळ मिळतो या लोकांना ? ”
पण त्यांच्या सुखाकड पाहून आपण जळत बिळत नाही काय. त्यांच सुख त्यांना लखलाभ. आपण धावत राहू भाकरीच्या पाठीमागे.”
आता तुम्ही भडकाल माझ्यावर. म्हणाल, ” च्यायला. हि काय यांना भंकसगिरी चालवलीय ? आम्ही काय हे असलं रडगाणं वाचायला याचा ब्लॉग वाचतो काय ? “जाऊदेत. मला सांगायचा होतं ते एवढंच मित्रहो कि मी खरच खूप कंटाळलो होतो.
खरंतर ३१ डिसेंबरला या वेळेला कुठल्यातरी बार मध्ये बसून मस्त हवेत तरंगायचं सोडून इथं बसून ब्लॉग लिहिणारा मी म्हणजे कोणी तरी खुळा असेल असंच तुम्हाला वाटत असेल. पण आत्ताच म्हणजे ९.३० ला ऑफिसातून आलोय. जेवलोय. आणि बसलोय लिहायला. काय लिहावं काही कळत नव्हतं.
” तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष तुम्हाला सुख – समृद्धीचं,  आनंदच आणि भरभराटीच जावो. ” एवढी दोन वाक्य खरडूनही मी तुम्हाला तंग मारू शकलो असतो.
पण माझ्या ब्लॉगकडे नेहमीच खूप आशेने पहाणाऱ्या रसिक मित्रांचा खूप भ्रमनिरास झाला असता. म्हणून आत्ताच नवी कोरी कविता लिहिलीय तीच पोस्ट करतोय. याच माझ्या शुभकामना.!!!!!!!!!!!!

दिव्यांचा उत्सव.

मित्रहो,

परवा अपलोड केलेलं ‘ पावसा रे पावसा ‘ हे गाणं तुम्हाला किती आवडलंय ? ते काही कळलं नाही. कळेल सावकाश. त्याची काही घाई नाही एवढी.

पण आज धनत्रयोदशी. आजपासून सुरु होतो मनामनात दिव्यांचा उत्सव. मग तुम्हा शुभेच्छा द्यायला उशीर करून कसं चालेल !!!!!!!!