खरा सिंघम

( खरा सिंघम पहायचा असेल तर यातली व्हीडिओ पहायला विसरू नका. )

सलमानचा ‘ दबंग ‘ आला. खूप हवा झाली होती. पण मी चित्रपटांचा शौकीन नाही त्यामुळे खास आवर्जून असा पहिला नाही. त्यापाठोपाठ अजय देवगणचा ‘ सिंघम ‘ आला. आणि सिनेमा रिलीज झाल्याबरोबर पहायला मिळाला. झकास. ‘ मी बाजीराव सिंगम ‘ हे त्यातल्या नायकाचा नाव , ‘ आता सटकली रे माझी ‘ हा त्याचा डायलॉग, त्यातला गोट्या सारं काही झकास होतं. सलमानच्या ‘ दबंग ‘ ची सगळी हवा काढून टाकण्याचं सामर्थ्य ‘ सिंघम ‘ मध्ये होतं. पण तरीही हा सिनेमाच आहे हे भान विसरून चालत नाही.

पण मी मात्र खरा खुरा सिंघम पाहिलाय. बळीराजाला चिरडू पहाणाऱ्या व्यवस्थ्येचा राग असणारा हा सिंघम – त्याची ‘ सटकली ‘ तर सलमानचीच काय अजयची सुद्धा फाटेल –

Advertisements

गणपती आणि बुजगावणं

सोसायटीत चित्रकलेची स्पर्धा होती. तीन गटात. परीक्षकाच काम माझ्या पत्नीकडे होतं.

राजकारणात स्त्रियांना एक तृतिआंश आरक्षण लाभल्यानंतर गावागावात महिला सरपंच होण्याचं पेव फुटलं. पण बाई सरपंच नावालाच. सगळा कारभार धन्याच्याच हातात.

आमच्याकडेही तसंच झालं. परीक्षकाच काम पत्नीकडे पण तिनं सगळी चित्रं माझ्यासमोर टाकली. झकासच होती चित्रं. मी पटापटा दोन्ही गटातली पहिल्या तीन क्रमांकाची चित्र वेगळी केली. तिच्याकडे दिली आणि म्हणालो, ” मला हि चित्र ठीक वाटताहेत. पण परीक्षक तू आहेस. तुला योग्य वाटेल ते कर.”

तिनंही सगळी चित्रं नजरेखालून घातली. आणि मला म्हणाली, ” हे श्रीहरीच चित्रही छान आहे ना ?”

ते चित्रं मलाही आवडलं होतं. पण इतर चित्रांमध्ये रेखीवपणा जास्त होता. आणि या चित्रात कल्पनेचा वेगळेपणा. हा बुजगावण्याच्या रूपातला गणपती आम्हाला सगळ्यांनाच खूप आवडला. आणि आम्ही बहुमतानं त्याला उत्तेजनार्थ पारितोषिक द्याचं ठरवलं. ते हे चित्रं –

गणपती, गणपती बाप्पा,

गणपती, गणपती बाप्पा,

किराणा

आमच्या सोसायटीतल्या सुमाताई. त्यांच्या यमीच लग्नं जमलं. घराघरातून रोज केळवनाची आमंत्रणं येऊ लागली. आज कुणाकडे तर गुजर काकूंकडे, उद्या कुणाकडे तर लिगाडे काकूंकडे, परवा कुणाकडे तर शहाणे काकूंकडे. रोज केळवण झडायची.

कधी कधी तर संध्याकाळच्या चहा आणि नाष्ट्यावरही केळवण भागवल जायचं. बेतही मोठे साग्रसंगीत असायचे. काल असाच तिसऱ्या मजल्यावरच्या जोशी काकूंकडे संध्याकाळच्या केळवनाचा बेत होता. सातची वेळ ठरलेली. आया बाया जमलेल्या. म्हणायला नाष्टा पण निम्मं अर्ध जेवण होईल असा चमचमीत बेत. पाव भाजीचा.

रमत गमत, हसत खिदळत पाव भाजीचा फडशा पडत होता. गप्पा चांगल्याच रंगलेल्या. घड्याळाचं भान कुणालाच नाही. आणि यमीचं लक्ष घड्याळाकडे गेलं. ती किंचाळलीच, ” काकू, आहो साडे आठ वाजलेत. मला देशमुख काकिंच्यात जायचय केळवनाला.”

जोशी काकूंचा शरू आतल्या खोलीतच होता. त्यानं हे ऐकलं आणि बाहेर येत म्हणाला, ” यावर आणखी रात्रीचं जेवण का ?”

” हो ना रे. गेली पंधरा दिवस असच चाललंय बघ.” यमी अभिमानानं फुलून म्हणाली.

” हो का ? मग या महिन्यात किराणा भरलाच नसेल तुमच्या.”

शरूच्या या कोटीवर बायकांच्यात चांगलीच खसखस पिकली आणि यमी देशमुख काकूंच्या घराच्या दिशेने धूम पळाली.

श्री विष्णूंचा नवा अवतार

( हा फोटो पहायला विसरू नका )

पाकिस्तानी गोलंदाज रियाझनं भारतीय संघाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात पाचवा बळी घेतला आणि भारतीय मातीवर नाक घासलं. म्हणाला, ” बाई, तुझ्या पदरी पडलो आणि पुण्यवान झालो.”

खरंतर त्याला ” आई, तुझ्या पदरी पडलो आणि पुण्यवान झालो.” असं म्हणायचं असावं. पण पाकिस्तानी संस्कृतीत एवढी शिकवण कुठली ?

नंतर कळलं कि तो मनोमन नमाज पढून आल्लाची करून भाकत होता.

आम्ही एवढे कर्मठ नाही तेच बरे आहोत. आमच्याही खेळाडूंना ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव आहे. शतक केलं किंवा बळी मिळाला कि तेही आभाळाकड पाहून त्या नियतीच्या विधात्याची मनोमन करुणा भाकतात. पण हे असले नखरे. छ्या ! तुम्हाला सांगतो परमेश्वराच्या अस्तित्वावर विश्वास माझाही आहे. देवाच्या दारी गेल्यानंतर मीही त्याला खूप काही मागत असतो. हात जोडून त्या परमेश्वराला शरण जाताना मी त्याच्याशी काय बोलतो त्याविषयी नंतर लिहीन.

पण या रियाझच मात्र अतीच झालं होतं. मागे एकदा मी शोएब अख्तरलाही अशाच रीतीनं मैदानावर नमाज पढताना पाहिलं होतं  पण तेव्हा भगवान विष्णू थोडे धावपळीत होते.

पण आता………..आता मात्र भगवान विष्णूंना हे सहन झालं नाही आणि त्यांनी हिंदवी भूमीत नतमस्तक होत अल्लाची करून भाकणाऱ्या रियाझला चक्क दर्शन दिलं. तो हा विष्णूचा नवा अवतार.

आफ्रिदीचं विमान

मला माहिती आहे आज सगळेच नेट सोडून टिव्हीला डोळे लावून बसलेले असणार. मागे आपण दक्षिण आफ्रिकेत जेव्हा टेस्ट सिरीज जिंकली तेव्हा मी लिहिलेल्या –

जे हसतील…..

या लेखावर –

मनोहर या मित्रानं ‘ सातत्य म्हणजे काय रे भाऊ ? ‘ अशी झोंबणारी प्रतिक्रिया दिली होती. मी तेव्हा त्याला उत्तर दिलं नाही. पण एक वेळ अशी येते कि आपल्याला आपल्या श्वासातल सातत्य राखनही जमत नाही. तिथ एखादा फलंदाज जर लवकर बाद झाला तर त्याच्यात सातत्य नाही असं म्हणन कितपत योग्य आहे.

जाऊ देत. म्याच सुरु झालीय. तरीही मी लिहायला बसलोय ते वाद घालण्यासाठी नाही काही. आज भारतच जिंकणार हे मला सांगायचं म्हणून.

********************************************************************************

सकाळी एक विनोद वाचनात आला –

स्मिथ पॉनटिंगला म्हणाला, ” अरे चल ना लवकर. विमान चुकेल. “
यावर  पॉनटिंगला, ” अरे, थांब ना आफ्रिदी पण येतोय.”
खरंच अजूनही स्मिथ आणि पॉनटिंग विमानतळावरच थांबून आहेत.

********************************************************************************

चला मी उठतो. आपण जिंकणारी म्याच पहायची आहे.

भारतीय संघ दंडास पात्र

भारतीय संघाला दंड करायला हवा. तुम्हीही माझ्याशी मताशी सहमत व्हाल.

म्हणजे पहा हं !!! सुरवातीला भारतीय संघ सगळ्या संघाची शिकार करून वर्ल्डकप जिंकणार असं वाटत होतं. पण उपांत्यपूर्व फेरीत पोहचू कि नाही अशी शंका येऊ लागली होती.

सहाजिकच होतं ते. ‘ अरे, फलंदाजी मजबूत म्हणजे गोलंदाजांनी नुसत्या गोट्याच खेळायच्या का ? ‘ नुस्ते सचिन सेहवाग कुठपर्यंत किल्ला लढवणार. तरी नशीब जहीर हातभार लावतोय. पण त्याच्या एकट्याच्या जीवावर त्याच्या वाट्याच्या १० षटकांमध्ये समोरचा आख्खा संघ कसा बाद करता येणार. आणि म्हणूनच या विश्वचषकात आत्ता पर्यंत झालेल्या ७ सामन्यात आपण विंडीजचा संघ वगळता अन्य कोणत्याही संघाला पूर्णतः बाद करू शकलो नाही.

सहाजिकच भल्या भल्यांनी विजेतेपदाच्या यादीतून भारताचं नाव वगळून टाकलं होतं. पण मोठ्या दिमाखात उपांत्यपूर्व फेरी जिंकून भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहचला आणि तिथच चुकलं. सगळीकडे अहाकार माजला. मेनका गांधी पुढे सरसावल्या. हरणांची शिकार करून गजाआड जाऊन आलेला सलमानही फिल्मी अंदाजात पुढे आला. ‘ प्राणीप्रेमींनी ‘ तर दंडकारण्य यात्राच ( दांडी यात्रेच्या नामसाधर्म्यावरून ) काढायची ठरवलंय. सगळ्यांचा एकच सूर. ” भारतीय संघाला शिक्षा…………….व्हायलाच हवी.”
अरे सेमिफायनला गेले ते गेले. ते सेमिफायनला जायला हवेत असं सगळ्यांनाच वाटत होतं. पण त्यासाठी एखाद्या दुसऱ्या कांगारूची शिकार केली असती तर ठीक होतं ना. पण एक दोन नव्हे चक्क अकरा कांगारूंची शिकार करणं म्हणजे फारच झालं.

आता सांगा, ” भारतीय संघाला शिक्षा व्हायलाच हवी.” हे माझं म्हणणं पटतयना तुम्हाला ?
चला सांगा काय शिक्षा करायची भारतीय संघाला.

मी ठरवलंय आता भारतीय संघान वर्ल्डकप जिंकला तरच भारतीय संघाला अकरा कांगारूंची शिकार माफ.

मला माहिती आहे, तुम्ही म्हणणार वर्ल्डकप जिंको अथवा न जिंको पण उद्या पाकड्यांना आस्मान दाखवलं तरी भारतीय संघाला अकरा कांगारूंची शिकार माफ.

बरोबर ना.