टोल नकोच

tax or tollखरंच टोल नकोच. का ते मी माझ्या ‘ तेरीभी चूप, मेरीभी चूप ‘ या मागेच लिहिलेल्या लेखात विस्तारानं लिहिलं आहे.

परवा ‘ आम्ही सत्तेत आल्यास महाराष्ट्र टोलमुक्त करू.’ असं आश्वासन भाजपच्या गोपीनाथ मुंडेंनी दिलं. मोदींनी त्यावर कुठेही आपलं मत नोंदवलं नाही. याचा अर्थ Continue reading

Advertisements

अरविंद केजरीवाल आणि जनता दरबार

Arvind Kejriwal 1” हमारे पास बहुमत नहीं है।  इसलिए हम विरोधी बाकोंपर ही बैठेंगे । बीजेपी के पास अधिकतम विधायक है तो वही सरकार बनाले।  ” अरविंद केजरीवालांचा हा एकच घोषा होता.

त्याचवेळी बीजेपी मात्र, ” आम्ही कोणत्याही प्रकारे तोडफोडीच राजकारण करणार नसून विरोधी बाकांवर बसणार आहोत. ” असं ठामपणे सांगत होती.

आम आदमी पार्टीच्या केजरीवालांचा मात्रं बीजेपीवर विश्वास नव्हता. अरविंद केजरीवाल म्हणत होते, ” आगे होता है क्या देखते जाव। बीजेपी कुछ भी तोड़फोड़ करेगी लेकिन सत्ता नही छोड़ेगी। ”

झालं काय ! Continue reading

पाण्याचं राजकारण

kukadi damपाणी. वनस्पतीपासून प्रत्येक सजीवाच्या जगण्यासाठी आवश्यक असलेली एक बाब.  देशात अनेक धरणं. कालवे. सिंचनाची एक सुसूत्र व्यवस्था. पण Continue reading

सहावा सिलेंडर

gas cylinder परवा  जि. प. शाळांचे दुखणे भाग -१ , शालेय पोषण आहार हा सागर पाटील यांचा लेख वाचला. याच संदर्भात मी माझ्या ब्लॉगवर आयजीच्या जीवावर बायजी उदार हा लेख लिहिला होता. त्यात मीही या शालेय पोषण आहाराबद्दल लिहिलं होतं. शिक्षकांच्या दृष्टीनं तर ते दुखणं आहेच. पण माझा प्रश्न होता तो हाच कि ‘ जनतेनं कधी आमच्या मुलांना जेवायला घाला ‘ अशी मागणी केली होती ?

हिच काय अशा प्रकारची कोणतीही योजना जनतेच्या मागणीशिवाय सरकारनं राबवू नये. बरं जनतेला अर्थसाह्य करायचं ना मग अत्यावशक अशा सेवेत मोडणाऱ्या गॉसवरची सबसिडी का कमी केली ? पेट्रोलवरची सबसिडी का काढून टाकली ? इतकंच काय शेतकर्यांसाठी दिली जाणारी ठिबक सिंचनावरची सबसिडीही सरकारनं ४० % पर्यंत कमी केली आहे.  आता पुन्हा ९० % सबसिडी द्यायचा विचार आहे. ग्यास सिलेंडरच्या बाबतीतली धोरण ठरवताना सरकारला वेळ लागला नाही पण या बाबतीत दफ्तर दिरंगाई चालूच आहे. कारण इथं सरळ सरळ खायला मिळत नव्हतं.

सबसिड्या कडून टाकणाऱ्या सरकारनं Continue reading

हे भूत उतरवायलाच हवं

हे भूत सार्यांनाच खूप छळतय. अंगारे धुपारे……..लिंबू मिरच्या…….गंडे दोरे……. अंगारे धुपारे……… मंत्र तंत्र असं काही ना काही करून हे भूत उतरवायलाच हवं. हे सारं करूनही हे भूत उतरलं नाही तर आपण आपलाच बळी द्यायला हवा. रक्ताचा सडा घालायला हवा पण हे भूत उतरवायलाच हवं.

भूत

भूत

वेसण घातलेला बैल आणि …….

आज टिम अण्णाचे प्रशांत भूषण यांनी मुलायम सिंग यांच्याशी झालेल्या संभाषणात चार कोटी मागितल्याची बातमी वाचली. आणि वाईट वाटलं. या पुढार्यांनी आजतागायत एकमेकांचे पाय ओढण्याशिवाय आणि या देशाला अस्थिर करण्याशिवाय आणखी काही केलं नाही. रामदेव बाबांचं आंदोलन मोडून काढलं. अण्णांनाही दुसऱ्याच दिवशी अटक करून तुरुंगात टाकलं. पण हि मात्रा चालली नाही तेव्हा पडती बाजू घेतली. अण्णांचं उपोषण चालू दिलं. दरम्यान टिम अण्णांमध्ये मतभेद पसरवण्याचे प्रयत्न केले. पण अखेरच्या दिवशी सारी सूत्रं अरविद केजरीवालांच्या हाती पाहून बरं वाटलं.

आता हि नवीन बातमी प्रशांत भूषण यांनी मुलायम सिंग यांच्याशी झालेल्या संभाषणात चार कोटी मागितल्याची. ही सीडीच यांच्याकडे आहे म्हणे. किती वेळाची आहे त्याचा मात्र कुठेही उल्लेख नाही. संभाषणाची चार सहा वाक्ये सुद्धा वर्तमान पत्रात छापून आलेली. त्यात मुलायम सिंग नुसते हुं हुं करताहेत. आणि प्रशांत भूषण चार कोटी मागताहेत. अरे मी सुद्धा अशा वेळी अशी चूक करणार नाही. आणि अण्णांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे प्रशांत भूषण असं करतील ? यांच्यावर येवढा विश्वास टाकावा या लायकीचे आहेत हे पुढारी ?

रामदेव बाबांच्या मागे त्या बयेला राखी सावंतला लावायचा चावटपणाही कॉग्रेसच करू शकतं. नाहीतर वाट्टेल त्या थराला जाणारी राखी सावंत तमाम चिकणे चोपडे, धनिक सोडून रामदेव बाबांच्या प्रेमात कशाला पडेल ?  आणि प्रशांत भूषण यांच्या मागे हे. कोणी आणि किती विश्वास ठेवावा या गोष्टीवर. अभिनेत्यांचे आवाज काढणारे कितीतरी मिमिक्री कलाकार आपण गल्लीबोळात पहातो. एखाद्याचा हुबेहूब आवाज काढणं काही फारसं अवघड नाही. मनीष तिवारींनी तर चक्क अण्णाच डोक्यापासून पायापर्यंत भ्रष्टाचारी असल्याचा विधान केलं होतं. हे काय काही बोलीतील. यांच्या जिभेला कोण लगाम घालणार ?

नेत्यांच्या सभांना माणसं गोळा केली जातात. मी परवा पाहिलेल्या सुप्रिया सुळेंच्या स्त्री भरून हत्ये संदर्भात काढलेल्या पदयात्रेल्या मुलीही अशाच कुठल्या कुठल्या शाळा कॉलेजातून आणलेल्या. आणि तमाम सत्ताधाऱ्यांना हेच सहन झालं नाही. अण्णांसारख्या एका सामान्य, कफल्लक समाजसेवकाच्या आंदोलनाला देशभरातून पाठींबा मिळतो म्हणजे काय ? पण  अण्णांच्या आंदोलनाला पाठींबा मिळाला तो काही अण्णांची जनमानसातली प्रतिमा म्हणून नाही काही.  अण्णांनी भ्रष्टाचाराच्या ज्या व्यवस्थेविरोधात आंदोलन सुरु केलं त्या व्यवस्थेला देशातला प्रत्येक नागरिक बळी पडलेला आहे. हा पाठींबा किती व्यापक होता याचं उत्तम उदाहरण म्हणजे मुंबईच्या ज्या डबेवाल्यांनी स्वतःच्या सेवेत कधी खंड पडू दिला नाही ते मुंबईचे डबेवालेही एक वेळचं काम बंद ठेवत या आंदोलनात उतरले.

वेसण घातलेला बैल शिंग उगरणारच नाही असं नाही पण कमीत कमी वेसण असलेल्या बैलाच्या वेसणीला हात घालण्याचं धाडस तरी करता येत. तसंच लोकपाल आणून भ्रष्टाचार पूर्णतः संपुष्टात येणं शक्य नसलं तरी आमच्या पुढार्यांच्या आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या वेसणीला हात घालण्याचं धाडस तरी आम्हाला करतं येईल. हे नक्की. 

त्यामुळेच टिम अण्णांमध्ये मतभेद, प्रशांत भूषण यांनी चार कोटी मागितले अशा कुठल्याही गोष्टींवर विश्वास न ठेवता आपण सारे एक राहू………भ्रष्टाचाराला मत देऊ.

अंगुठाछाप भ्रष्टाचार

टिमकी

टिमकी

( जनतेला टोप्या घालण्याशिवाय यांनी अन्य दुसरं कोणतंही काम केलेलं नाही. म्हणूनच हे चित्र – )

आपल्या ५५२ लोकसभेच्या सदस्यांपैकी किती सदस्य पदवीधारक आहेत हे सरकारनं जाहीर करावं. माझ्या माहिती प्रमाणे पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक सदस्य जेमतेम दहावी बारावी पर्यंत शिकलेले आहेत. आणि भ्रष्टाचार करणाऱ्यात या कमी शिकलेल्या मंडळींचाच सहभाग सर्वाधिक आहे. तरीही लालू यादव आणि शरद यादव सारखे भ्रष्टाचारी भर संसदेत प्रश्न विचारतात कि, ” आता काय आम्ही टिम अण्णांकडून राजकारणाचे धडे घ्यावेत काय? ”

नाहीतरी भ्रष्टाचार करूनही या लालूनं स्वतःची टिमकी वाजवण्याशिवाय दुसरं केलंच काय ? या लालुवर एक ना एक दिवस कुणीतरी जोडा फेकणार. मला या राजकारणी म्हणून फुशारकी मारणाऱ्या मंडळींना विचारायचं आहे कि, “जनतेला टोप्या घालण्यावाचून तुम्हाला कळतच काय ? तुम्ही कुणाकडूनही राजकारणाचे धडे घेण्याची मुळीच गरज नाही. राजकारणाच्या आखाड्यात तुम्ही भलतेच वस्ताद आहात. ते धडे आम्ही तुमच्याकडून चांगलेच घेतले आहेत. पण राजकारणाचे नसले तरी तुम्ही समाजसेवेचे धडे घेणे अत्यंत गरजेचे आहे. आणि तुम्हाला असे समाजसेवेचे धडे द्यायला टीम अण्णा नको, अण्णांच्या आंदोलनात भाग घेतलेले तमाम चिमुरडेच पुरेसे आहेत.”

लोकपाल विधेयक आणण्याचं आश्वासन या राजकारण्यांनी दिलंय खरं. पण ते हे आश्वासन पाळतील असा विश्वास मला नाही. कारण पैसे खाण्याशिवाय आणि जनतेला टोप्या घालण्याशिवाय यांनी अन्य दुसरं कोणतंही काम केलेलं नाही. म्हणूनच हे चित्र –

भ्रष्टाचार

भ्रष्टाचार