दिवा म्हणजे

माझ्या तमाम मित्रांना, रसिकांना, जगभर विखुरलेले असूनही हिंदू संस्कृतीवर प्रेम करणाऱ्या… Continue reading

Advertisements

संवाद आणि शुभेछा

आता कुणीच भेटत नाही, मलाही पंधरा पंधरा दिवस लिहायला वेळ मिळत नाही. पण आज तुम्हाला शुभेछा न देवून कसं चालेल ! खरं तर मी तुम्हाला शुभेछा दिल्या नसत्या म्हणजे मी तुमच्या अहिताची कामना केली असती असं मुळीच नाही. पण माणूस संवाद प्रिय प्राणी आहे. त्याला संवाद साधायला आवडतं.

तसं पाहिलं तर पशु पक्षीही संवाद साधतात. मांजर फक्त म्यावं….म्यावं करू शकते किंवा गुरकावू शकते, कुत्रा फक्त भुंकतो, टिटवीची टिव टिव….कावळ्याची काव काव तर नकोशी वाटते. पशुपक्ष्यांना लाभलेल्या अशा एकाच सुरावटीमुळे त्यांच्या संवादाला एकंच किनार असते असं आपण मानतो. खरंतर त्यांच्याही संवादात आपल्या संवादाएवढीच विविधता असणार. केवळ त्यातले बारकावे जाणण्याची कुवत आपल्याजवळ नसावी.

पण माणसाच्या संवादातली विविधता सहज जाणवण्यासारखी असते. माणूस त्याचं बोलणं………त्याचं लिखाण…….त्याची चित्रकला……..त्याची शिल्पकला……..त्याची नृत्यकला……..अशा अनेक माध्यमातून संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतो. आणि संवाद साधण्याच्या माणसाच्या अशा प्रत्येक अंगाशी भोवतालचा समाज सुद्धा व्वा!….सुरेख!….झकास!……मस्त!…….अशा छोट्याश्या शब्द छटातून प्रती संवाद साधत असतो. टाळी हा सुद्धा  संवादाचाच एक भाग आहे. ईश्वरासमोर ताल धरताना तिला मांगल्याची झालर लाभते. तर एखाद्या मैफलीत तीच टाळी व्वा! म्हणत कलावंत आणि रसिक यांच्यात संवाद घडवून आणत असते.

मुकाभिनय हासुद्धा संवादाचाच एक भाग आहे. चेहऱ्यावरची इवलीशी रेषा हलवून संवाद साधण्याच्या कलेत आपण तरबेज असतो.

बायको स्वयंपाक करते. त्या माध्यमातूनही ती आपल्याशी संवाद साधण्याचाच प्रयत्नच करत असते. आपण टिव्ही पहात जेवणात मश्गुल झालेलो असतो. ती मात्र स्वयंपाक कसं झाला असावा हे जाणून घेण्यासाठी आपल्या चेहऱ्यावरची प्रत्येक रेषा वाचण्याचा प्रयत्न करत असते. स्वयंपाक छान झाला असेल तर बऱ्याचदा आपल्याकडून प्रतिक्रिया द्यायची राहून जाते. कारण आपण त्या चवीत रमून गेलेलो असतो. पण चव थोडीजरी बिघडलेली असेल तर आपण वसकन अंगावर धावून जातो. आणि मग नवरा बायकोतला संवाद बिघडतो.

असे आपण प्रत्येक क्षणी संवाद साधण्याच्या प्रतीक्षेत असतो. पण संवाद साधण्यासाठी आधी तो कुणा कडून तरी व्यक्त व्हावा लागतो. माझ्या मनात तुमच्या विषयी खूप जिव्हाळा आहे…..प्रेम आहे……आपुलकी आहे…..पण हे सारं कुठंतरी व्यक्त व्हायलाच हवं ना……!!!!! म्हणून तर ‘ माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे ‘ , ‘ किंवा ‘ तू मला खूप आवडतोस ‘ अशा शब्दांचा आधार घेतल्याशिवाय आपल्याला प्रेम व्यक्तच करता येत नाही.

स्पर्श हाही संवादाचाच एक भाग आहे. हे कुणाला पटेल का ? पण अंगावर उभे रहाणारे रोमांच………आईच्या कुशीत झोपी जाणारं बाळ……..कोंबडीच्या पंखाखाली उब शोधणारी पिलं ही सारी उदाहरण स्पर्शातला संवादच  व्यक्त करत नाही काय !

म्हणूनच आजचं लेखन. ‘ संवाद ‘ या संदर्भात आणखी बरंच काही मनात साठलं आहे. हे सारं लिहिताना मी मनोमन तुमच्याशी संवाद साधला होता. म्हणूनच हे सारं लिहू शकलो.

तुम्ही तर रसिक आहात. माझ्या मनातली प्रत्येक स्पंदन जाणायची कला तुम्हाला अवगत आहे.  तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या मनापासून शुभेछा

भेटकार्डातले शब्दही माझेच आहेत. लेख आणि भेटकार्ड आवडलं तर तुम्ही माझ्याशी संवाद साधलाच.

diwali wish

Diwali Greeting

दिव्यांचा उत्सव.

मित्रहो,

परवा अपलोड केलेलं ‘ पावसा रे पावसा ‘ हे गाणं तुम्हाला किती आवडलंय ? ते काही कळलं नाही. कळेल सावकाश. त्याची काही घाई नाही एवढी.

पण आज धनत्रयोदशी. आजपासून सुरु होतो मनामनात दिव्यांचा उत्सव. मग तुम्हा शुभेच्छा द्यायला उशीर करून कसं चालेल !!!!!!!!