समुद्राएवढी आई आणि अलिबाग ( On Beach with My Mother )

आई तर समुद्राएवढी असते. पण समुद्राएवढ मोठेपण असणाऱ्या माझ्या आईने तिच्या उभ्या आयुष्यात समुद्रच पहिला नव्हता.  आपल्या आईने अद्याप समुद्र पहिला  नाही याची मला कोणतीही जाणीव नव्हती.

( My mother is another image of sea. But she never visit a sea in her life.)

पण दिवाळीत चार दिवस सुट्टी होती. माझे भाऊ, बहिण, त्यांची मुलं, माझे आई – वडील असे आम्ही सारे आमच्या घरी एकत्र आलो होतो. सहज बोलता बोलता आई म्हणाली. ” विजय, मी अजून कधी समुद्रच पहिला नाही रे. मला एकदा तरी समुद्र पहावासा वाटतोय रे.”

( Once when we all were at home in Diwali occasion she wished of visiting Beach in front of us. I immediately decided to take her to Akshi Beach at alibag.)

मी क्षणभराचाही विचार केला नाही. वडिलांसह आईला घेऊन समुद्रावर जायच ठरवलं.

झालं !!!!!!!!!!! सकाळी लवकर उठून, एका वेळेचं जेवण सोबत घेऊन आम्ही घर सोडलं. लोणावळा – खंडाळा मार्गे अलिबागला पोहचलो.

पाणी आणि समुद्र या गोष्टींचं मला एवढ प्रचंड आकर्षण आहे कि तिथे गेलो कि मी भान हरपून बसतो. हिमालयाच्या कुशीत गेल्यावर काय होईल ते माहित नाही ? काश्मिरचा बर्फ झेलताना कसं वाटेल ते हि सांगता येत नाही.

रस्त्यात एके ठिकाणी नाष्टा करून आम्ही सरळ अलिबागच्या कुशीत शिरलो. समुद्रच पहायचा होता. त्यामुळं अलिबाग शहरात कुठेही नं शिरता सरळ ” अक्षी “ बीचच्या दिशेने निघालो. गाडी बीचच्या कडेला लावली. सारे गाडीतून बाहेर पडलो. समुद्राचा खारा वास श्वासात भरून घेतला. समुद्राची गाज साद घालीत होती. मुलं तर  अगदी घाईला आली होती. त्यांनी अंगावरचे कपडे टाकून दिले आणि समुद्राशी सलगी करता यावी म्हणून आखूड कपडे अंगावर चढवले. आणि निघाले सारे समुद्राच्या  दिशेने.

आम्ही समुद्राच्या दिशेने निघालो कि समुद्रच आमच्या दिशेने येत होता हेच कळत नव्हत. पण प्रत्येक क्षणाला आमच्यामधलं अंतर कमी होत होतं. समुद्र आमचे पाय कवेत घेऊ लागला. आमच्या पायाखालची वाळू सरकू लागली. तेव्हा आम्ही समुद्रात विरघळतो आहोत असचं आम्हाला वाटत होतं.

( When we were proceeding towards Beach there was a sence of our mind that sea itself moving towards us.)

आम्ही बीचवर पोहोचलो तर मधाचं पोळं उठाव तसं समुद्रावर माणसाचं मोहळ उठलेलं. प्रत्येकजण स्वतःच अस्तित्व हरवलेला. आपण या अंतहीन समुद्राचा एक अंश आहोत याची खात्री पटल्याने समुद्राशी एकरूप झालेला.

देशभरातून कुठून कुठून आलेली हि माणसं कुणी तामिळनाडूचा……….. कुणी कर्नाटकचा……….कुणी केरळचा……….कुणी बीडचा………..कुणी लातूरचा……..कुणी कुठला…………आणि कुणी कुठला………..पण सारे हा प्रांतभेद विसरून

गेलेले………माणूस म्हणून पाखरासारखे स्वछंदपणे समुद्राच्या किणाऱ्यावर विहरत असलेले. पण आपण आपल्या खोपट्यात गेलो कि हि माणुसकी विसरतो. स्वार्थ नावाच्या दलदलीत रुतत जातो. असा का ?

( from where these people are ? Someone from Tamilnadu………someone from Kerala………Someone from karnataka…….and may be from other parts of India. All forget the boundaries of their region……..and all were enjoying equally with height of enthusiasm )

हि कबड्डी खेळणारी माणसं कुठल्या जातीची ?……….. कुठल्या धर्माची ?………… कुठला यांचा देश ? ………..कुठला प्रांत ? निसर्गाच्या सहवासात गेलं कि या साऱ्या सीमारेषा अक्षरशा गळून पडतात. आयुष्य कसं जगावं याचं हे एक आदर्श उदाहरण.

( These peoples playing Kabbadi were from which state ………of which caste…….of which religion i didn’t know they are keeping a batter example in front of us about how to leave life with Joy.)

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं बळ वाढविण्यासाठी जलदुर्ग बांधले.आम्ही नक्कीच त्यांचे वंशज आहोत……….. त्त्यांच्यातली उर्मी अजूनही आमच्या नसानसातून वहात असावी म्हणून तर कुणाला तरी अशी जलदुर्ग बांधण्याची उर्मी होते.

( Great Maratha King Chattrapati Shivaji Maharaj build many sea fort in the stage of formation of Swarajya to strengthen it. That spirit must be some where inside us so somebody trying to build this sea fort. )

आम्ही जेवायला बसलो. दोन समुद्र आमच्या पंगतीला होते. एक आमची आई आणि दुसरा ………………….आलीबागचा समुद्र.

( Most of the people looking for luxurious facilities, delicious food when they went for such enjoyment. But we bring food prepared at our home with us. We taking lunch with two sea One is my mother and other is the sea at Akshi Beach. )

भटकंती

खरंतर मला गावभर फिरण्याची थोडा अधिक चांगला शब्द वापरतो ‘ भटकंतीची ‘ खूप  हौस आहे. पण माझा खिसा नेहमीच खूळखुळत असतो ( हा  शब्द प्रयोगही  वेगळ्या अर्थाने ) म्हणजे माझ्या खिशात फारसे पैसे नसतात या अर्थाने वापरला आहे हे रसिकांनी लक्षात घ्यावं.

सहाजिकच मी माझ्या निवास स्थानापासून पाच – पन्नास किलोमीटरच्या परिसराच्या पलीकडे जाण्याचा फारसा विचार करीत नाही.

एक दिवस मी माझ्या राहत्या घरापासून दोन – तीन किलोमीटरच्या टप्प्यावर असलेल्या एका ठिकाणी गेलो. त्या ठिकाणाला नाव गाव काही नाही. ठिकाण आहे  कात्रज घाटाच्या परिसरातल. ‘ पालवी ‘ या माझ्या संस्थेच्यावतीने आम्ही वृक्षारोपणाच काम करीत होतो. साहजिकच त्या परिसरात काही वृक्षारोपण करता येयील का याची पहाणी करण्यासाठी आम्ही तिथ गेलेलो. दिवस जून अखेरीचे………….पावसाळ्याचे.

आम्ही तिथं गेलो आणि त्या परिसराच्या अक्षरश प्रेमातच पडलो.

तिथं एक छोटासा बंधारा होता.

त्या बंधाराच्या पाटातून वाहणार पाणी, पुढच्या खडकावरून  वाहणाऱ्या त्या पाण्याची फेसाळणारी शुभ्रता.

बस जगण्यासाठी यापेक्षा आणखी काही हवं असतं या गोष्टीचा मला तरी विसर पडला.

त्या परिसरात वृक्षारोपण करून आम्ही घरी परतलो. पण माझ्या मनात एकच विचार……….एकदा सहकुंब इथं यावं याचा.

तो पावसाळा निघून गेला. पुढचा पावसाळा आला आणि एका रविवारी आम्ही त्या दिशेने निघालो.

गाडी शेवटपर्यंत जात नव्हती. एक – दोन किलोमीटर अलीकडे गाडी लावली. पुढे पायीच निघालो. साधारण अर्धा तास चालायचं होत. वाट निसरडी. आजूबाजूला गच्चं हिरवी किलबिल.

गप्पा – टप्पा. विनोद, हशा हे सारं होत होतं. पण या सर्याठी कुठेही पाय घसरणार नाही याची काळजी घेत घेत आम्ही सारे त्या ठिकाणी पोहचलो. आणि माझ्या सोबत असलेले सारे भान हरपून गेले.

खोल झाडीतून कुठूनतरी मोराच्या केकावण्या ऐकू येत होत्या. झाडाझुडपातून कितीतरी पक्षी मजेत इकडे तिकडे फिरत होते. हे ठिकाण कोणाला फारसं माहित नसल्यानं तिथं गर्दीही फारशी नव्हती.

बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला उंच कडे. बंधाऱ्याच्या पाण्याच्या फुगवट्या मागे गच्चं झाडी. आम्हाला इकडं तिकडं फारसं फिरता येत नव्हतं. आणि कुठं फारसं फिरावसही वाटत नव्हतं. आमच्या समोरून खळखळून वाहणाऱ्या पाण्याच दुडदुडन, त्यांचे आळोखे – पिळोखे पाहूनच आम्ही मुग्ध झालो होतो.

मुलं त्या पाण्यात मनमुराद धिंगाणा  घालीत होती.


चांगले चार- सहा तास आम्ही त्या दैवी सुखाच्या सहवासात वावरलो. घरनच बांधून आणलेलं जेवण उरकलं.

आणि आभाळाएवढी झालेली मनं घेवून पुन्हा  घराकडे परतलो.