राक्षसपुरचा राक्षस

मुलं राक्षसाला घाबरतात असं कुणी म्हणत असेल तर ते मला फारसं पटणार नाही. मुलं राक्षसाला घाबरली असती तर त्यांनी राक्षसाच्या गोष्टी कान देऊन ऐकल्या नसत्या आणि अभ्यासाची पुस्तकं डोळ्यासमोर धरायची टाळाटाळ करणारी मुलं अशा गोष्टींची पुस्तकं तासंतास डोळ्यासमोर धरून बसलीही नसती.

त्यातूनही थोडीफार भीती असतेच मुलांना राक्षसाची. पण त्या भितीलाही एक वय असतं. अशी राक्षसाची थोडीफार भीती बाळगणाऱ्या मुलांच्या मनातूनही राक्षसाची भीती दूर व्हावी म्हणून लिहिलेली हि कविता.

Advertisements

ताजी कविता : एक व्याख्या

परवा माझ्याकडे माझ्या दोन पुतण्या आल्या. म्हणाल्या, ” बाबा, बाईंनी आम्हाला पावसावरची कविता लिहून आणायला सांगितलीय.” मोठेपण नाही सांगत पण या एवढ्याश्या पोरटयांनाही माझ्या कविता आवडतात आणि कळतात ही.

शालेय अभ्यासक्रमातले उपक्रमह असेच असतात. हे असं करावं हे त्यांना कुणी सांगतच नाही. फक्त हे करून आणा. मग मुलं बिच्चारी आणि शक्य असले तर पालकही ( बहुदा आया ) काहीतरी करून ते जुळवून आणतात. पुढे त्या उपक्रमांच काय होतं हे परमेश्वरालाच माहिती.

असो. खरंतर वर्गात कविता शिकवल्यानंतर मुलांनी स्वतःच कविता लिहावी असं बाईंना अभिप्रेत असणार. पण त्यासाठी कमीतकमी कवितेतलं यमक तरी मुलांच्या गळी उतरवायला हवं. एखाद कडवं वर्गातच मुलांना तयार करून दाखवायला हवं. पण मुलांवर एवढे कष्ट कोण घेणार प्रत्येकजण आपला पाटी टाकून घरी जाणार.

तर या मुली अशा माझ्या गळी पडल्या. एकीला डायरीत लिहिलेली एक कविता दिली. आता दुसरीला ती कविता नको होती. वेगळीच कविता हवी होती. ती म्हणाली, ” बाबा मला ताजी कविता हवी.” राज हट्टाचा जमाना गेला. पण बाल हट्ट आणि स्त्री हट्ट अजूनही आमची मान सोडायला तयार नाही. ( हे गमतीनं लिहिलंय बरं.) काय करणार ?

दिवस अगदी काल परवाचे. पावसाळ्याचे. बाहेर आभाळ भरून आलेलं. वीज गेलेली. मी अंधारातून भरलेल्या आभाळाचा वेध घेत बसलेलो. मग माझ्या मनात आलं, पाऊस जर शाळेत गेला तर ? आणि मग मी तिला म्हणालो, ” गुड्डी, चल. आपण तुझ्यासाठी नवी कविता तयार करू.” तीही अगदी उत्साहात माझ्या मांडीला मांडी लावून बसली. आणि बघता बघता पाहिलं कडवं तयार झालं.

एकदा एक पाऊस
शाळेमध्ये गेला
एका मागून एक त्याने
पाढे म्हटले सोळा.

तासभर लाईट नव्हते. त्यामुळं आमची बैठक मोडण्याचाही प्रश्न नव्हता. अंधारातच मी आपले शब्दांचे तीर मारत होतो. तीही अधून मधून मोडकी तोडकी साथ देत ओळी तयार करण्याचा प्रयत्न करत होती. ओळी तयार करण्यात रस घेत होती. आणि मग तासाभरानं आमची कविता तयार झाली.
ती छोटीशी पोर. ” मला बाबांनी ताजी कविता दिली.” म्हणत उड्या मारत पळाली. ती ही कविता _

एक होता पाऊस

तुमची शाळा सुरु झालीय. अभ्यास मागे लागलाय. चाचणी परीक्षा जवळ आलीय. या सार्याची मला जाणीव आहे. म्हणूनच अलीकडे तुमच्या साठी लिहाना थोडा कमी केल्या. पण बंद नाही हा केल्या. आणि तुमच्यासाठी लिहिणं मी बंद तरी कसा करू शकेन. मलाच मुळात तुम्हाला भेटल्या शिवाय करमत नाही.
एका गोष्टीचा मात्र मला फ्हार फ्हार वाईट वाटत. मी तुमच्यासाठी अगदी मनापासून लिहायचा प्रयत्न करतोय पण तुमच्या प्रतिक्रिया मात्र मला वाचायला मिळत नाहीत. त्यामुळं सहाजिकच तुम्हाला माझा ब्लोग किती आवडतोय ते कळत नाही.
आता पावसाला सुरु झालाय. पाऊस येतो. आपल्याला चिंब करतो. मातीला भिजवतो. काय जादू असते या पावसात काही कळत नाही. पण मातीला हिरवा रंग चढतो. पक्षांचे मंजुळ आवाज येवू लागतात. दूर दूर डोंगराच्या कुशीत फिरून यावंसं वाटतं.
तुम्ही परवा माझ्या ‘ एक होतं वांग ’ या कवितेतल्या वांग्याची गंमत वाचली असेल. तसाच हा पाऊसही.
तुम्ही लपाछपी खेळताना तुमच्या मित्रांसोबत. तसाच हा पाऊसही त्याच्या तुमच्या सारख्याच काही मित्रांसोबत लपाछपी खेळतोय. लपाछपी खेळता ल्ख्र्लता तो लपायला  चक्क डोंराच्या पलीकडे गेलाय. आणि डोंगराआड लपून बसलाय.
मग तुमचा मित्र त्याला शोधत डोंगराच्या पलीकडे गेला. त्यांना पावसाला एक जोरदार धप्प दिला. आणि मग काय गंमत झाली ती पहा या कवितेत –

एक होता पाऊस
त्याला बरसण्याची हौस
रिमझिमत याचा
मला कुशीत घ्यायचा.

लपाछपी खेळताना
डोंगराआड लपायचा
वीज होवून डोंगरा आडून 
मला लपून पहायचा

मी त्याला शोधत मग
डोंगरदरयात जायचो
त्याच्या हळूच जावून
जोरात धप्पा  दयायचो
मग तो पुन्हा एकदा
सर होवून यायचा    
गोड गोड गार गर
खिसा भरून दयायचा
 
मी मग त्याला एक 
गोड पापा दयायचो  
त्याचा हातात हात घालून
खुशाल पाऊस व्हायचो

राक्षस गेला शाळेमध्ये

मुलांनो,

तुम्हाला माहिती आहे का कि काल आमच्या राक्षसपुरचा राक्षससुद्धा शाळेत गेला होता. खोटं नाही सांगत आहे. खरंच, अगदी देवाशप्पत.

कशाला म्हणून काय विचारताय ?           

तुम्ही कशाला जाता शाळेत ?

बरोबर ! शिकून मोठ्ठ व्हायला. हो कि नाही.

आमच्या राक्षसरावांना म्हणे बाराखडी आणि अंकलिपी शिकायची होती.

तुम्हाला वाटलं असेल एवढा मोठ्ठा धिप्पाड राक्षस शाळेत गेला म्हणजे शाळेचं दार तोडाव लागलं असेल. छप्पर काढव लागलं असेल. पण नाही हा मुलांनो तसं काही करावं लागलं नाही. ज्या दरवाजातून मुलं वर्गात गेली त्याच दरवाजातून राक्षसरावही वर्गात गेले. आतमध्ये जाताना इतके वाकले कि चक्क आजोबा झाले. वर्गात येवून उभं राहू गेले तर धाडदिशी छप्पर डोक्याला लागलं. बाकावर बसले असते तर, बाकाचा पार भुगा झाला असता. म्हणून त्यांनी चक्क जमिनीवरच बसकन मारली. ऐसपैस बसले.

गुरुजी वर्गात आले. त्यांची आपली नेहमीची नाकासमोर पहायची आणि बेंचवर बसलेय मुलांवरून नजर फिरवायची सवय. सहाजिकच त्यांचं समोर बसलेल्या राक्षसरावांकडे लक्षच गेलं नाही. मग राक्षसरावांनीच गुरुजींना शिकविण्या विषयी विनंती केली आणि काय गंमत झाली पहा –

एकदा एक राक्षस
शाळेमध्ये गेला
गुरुजींसमोर बसून म्हणाला
शिकवा आता मला

पुढची कविता खालच्या चित्रात संपूर्ण वाचा –