बाळासाहेब ठाकरेंची प्रकृती चिंताजनक

cartoons of balasaheb

cartoons of balasaheb

लाख गेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. बाळासाहेब बाळासाहेब ठाकरेंची प्रकृती गेली दोन दिवस चिंताजनक आहे. अमिताभ,अभिषेक अशा अनेकांनी बाळासाहेबांची भेट घेतली. गोपीनाथ मुंडेंनी नुकतीच बाळासाहेबांची घेतली. प्रकृती आहे असं गोपीनाथ मुंडें सांगताहेत. उध्दव ठाकरे चमत्काराची अपेक्षा करताहेत. बाळासाहेब परवाच गेलेत अशीही आतली बातमी आहे.परंतु आतली बातमी वेगळीच Continue reading

Advertisements

फेसबुकवरच्या अमित जाधवला अटक ?

काल वर्तमानपत्रात बातमी वाचली, कि ‘ अमित जाधव या आमच्या फेसबुक वरील मित्राला अजित पवारांचा चेहऱ्याला काळं फसलेला फोटो अपलोड केला आणि फेसबुकच्या वाचकांना प्रतिक्रियांच्या रुपात अश्लील शिव्यांची लाखोली व्हायला सांगितली म्हणून अटक केली.’

मला आमच्या शासनाला आणि पोलीस खात्याला एक प्रश्न विचारायचा आहे कि,  अजित पवारांच्या वडिलांहून अधिक बुजुर्ग आणि कर्तबगार असणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या विषयी जेव्हा अजित पवार अपशब्द वापरतात तेव्हा अजित पवारांना का अटक केली नाही ? कि ” जय शिवाजी जय भवानी टाक खंडणी असं म्हणून राजकारण होत नाही.” किंवा ” आधी स्वतः कमावला शिका आणि मग राजकारण करा.” असं म्हणताना अजित पवारांनी बाळासाहेब ठाकरेंचा कोणताच अपमान केला नाही. इतकी वर्ष बाळासाहेबांच घर काय अजित पवारांनी चालवलंय का ?

बाळासाहेब ठाकरेंनी समाजासाठी काय केलं ? असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या अजित पवारांनी आधी, त्यांनी समाजासाठी काय केलं ? याचं उत्तर द्याव. आणि जे काही केलं असेल ते सत्तेत आहात म्हणूनच करू शकालत ना ? आणि जे काही केलं ते करताना समाजाचा सरकारी तिजोरीतलाच पैसा वापरलात ना कि स्वतःच्या खिशातला ?

खरंतर अजित पवारांनी स्वतःहूनच हि अटक रद्द करायला हवी. पण सत्तेला शहाणपण नसतं आणि सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. पण असं असलं तरी आम्हाला आमच्या मार्गापासून दूर जाऊन चालणार नाही.

मी कुणी शिवसैनिक नाही पण या देशाचा एक जागरूक नागरिक नक्की आहे. अमित जाधव या आमच्या मित्राला माझा पूर्ण पाठींबा आहे.