गोड बोल गाढवा

tilgulकाल खूप दिवसांनी गावाहून आलो. पाणी आहे. शेतीत रमलोय. कष्ट करतोय. कष्ट कंपनीत असतानाही करत होतो. त्याबदल्यात मिळावा तेवढा मोबदला मिळत नव्हता. आपल्यापेक्षा कमी बुद्धिमत्तेची आणि कामचुकार मंडळी केवळ लाळघोटेपनाच्या, हुजरेगीरीच्या जोरावर आपल्यापेक्षा अधिक पगार घेतात हे पाहून व्यथित व्हायचो.

शेतात मेथी केली होती. परिसरात माझ्या मेथीची ख्याती पसरली होती. तीन चार किलोमीटरहून काही मंडळी आली माझा प्लॉट पाहून खुश झाली. बाजारही बरा मिळाला. काही हजार रुपये पदरात पडले. फायदा किती झाला यापेक्षाही आज एका कुटुंबाचा मी पूर्णवेळ पोशिंदा आहे याचं मला समाधान आहे. याव्यतिरिक्तअधूनमधून बारा चौदा गडी बाया माझ्या शेतावर काम करत असतात. त्यांच्याही मीठ मिरचीची सोय माझ्यामुळे होत असते. मेथीचा प्लॉट संपलाय. आता पुढचं नियोजन चालू आहे.

काल आलो. आज ब्लॉग उघडला. माझ्या ब्लॉगच प्रगतिपुस्तक (stats ) पहिल. आज मकरसंक्रात माझ्या शुभेछा मिळतील काही नव्या ओळी मिळतील, संक्रतीसाठी एखादं भेटकार्ड मिळेल या अपेक्षेने आज अनेकांनी माझ्या ब्लॉगला भेट दिली पण त्यांच्या नशिबी निराशाच पडली असेल. कारण मी आज अजून काहीच पोस्ट केलं नव्हतं. त्यामुळेच ‘ तिळगुळ ‘ हि मागच्या संक्रातीला टाकलेली कविताच अनेकांनी आज पुन्हा पहिली. म्हणून आज तुम्हाला मकरसंक्रातीच्या मनःपूर्वक शुभेछा देतानाच देतोय एक खोडकर भेटकार्ड. Continue reading

मुस्लिम शाही इमामांचा मुजोरीपणा

हे शिर्षक देताना मला अतिव दुःख होतं आहे. कारण माझा स्वतःचा जातीयवादावर मुळीच विश्वास नाही. कारण आपल्या सर्वांच्या रक्ताचा रंग लालच आहे. आपल्या देहात प्राण ओतणारा जो कोणी आहे तो कुणालाच ज्ञात नाही. कुणी त्याला ईश्वर म्हणतं…….. कुणी येशू म्हणतं……….कुणी राम म्हणतं तर कुणी रहीम म्हणतं. जातीयवाद तुमच्या आमच्या मनात नसतोच मुळी. तो असतो आमच्या नेतृत्वात. त्यांना तो हवाच असतो. त्या जातीयवादाच्या बळावरच त्यांची राजकीय महत्वकांक्षा फळाला येते.

पण मुस्लिमांचा मुजोरीपणा असं शिर्षक या लेखाला द्यायला कारणही तसंच घडलं.

” मुस्लिमांनी अण्णांच्या आंदोलनात सहभागी होऊ नये. कारण या आंदोलनात ‘ वंदे मातरम, भारत माता कि जय ‘ अशा घोषणा दिल्या जातात. आणि मुस्लीम देशावर प्रेम करत नाहीत. ते देवाला मानत नाहीत. अण्णांचं
आंदोलन जर जातीय वाद नष्ट व्हावा म्हणून असता तर आम्ही त्या आंदोलनाला पाठींबा दिला असता. ” असं विधान आज मुस्लिमांच्या शाही इमामानं केलं.

कुणी केलं या माणसाला शाही इमाम ? ज्याला समाजात देशप्रेम रुजवता येत नाही त्याला काय अधिकार आहे कोणत्याही समाजाचा पुढारपण करण्याचा ? ज्या देशावर , ज्या मातीवर तुमचा प्रेम नाही त्या देश रहाण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे ? खरंतर मुस्लीमांनीच अशा माणसाला बहिष्कृत करायला हवं. पण त्यासाठी हवं असतं अण्णांसारखं धाडस. पण सगळ्यांकडेच असत नाही. म्हणून तर अशा मंडळीच फावत.

अण्णा सैन्यातून पळाले होते !!!!!!!

आज अण्णांच्या उपोषणाचा सहावा दिवस. संपूर्ण देशभर स्वातंत्र्यलढा सुरु असल्यासारखं एक स्फूर्तीदायक वातावरण………. आणि डोळ्यावरती झापडं ओढून बसलेलं आमचं सरकार. सरकार तरी का म्हणावं याला. हे तर साल मासे टिपण्यासाठी प्रवाहात ध्यानस्त बसलेले बगळे.

रामदेवबाबांना यांनी भर मैदानातून हुसकावून लावलं. रामदेवबाबांचा बर फुसकाच निघाला. आपल्या गल्लीत कुत्र्यालाही स्फुरण चढतं तसं दिग्विजय सिंग, प्रणव मुखर्जी यांना स्फुरण चढलं. ‘ अण्णांचाही रामदेवबाबा करू ‘ असं म्हणण्यापर्यंत यांची मजल गेली. पण गेली पाच दिवस देशभर अखंड पेटलेला वणवा पहिला आणि हळू हळू या काँग्रेसजनांची भांग उतरू लागली.

पण आपल्यातली किड झाकताना दुसऱ्यांच्या अंगावर चिखल उडवणं नाही ती राजनीतीच नव्हे. सहाजिकच या भिकार राजकारण्यांनी काल ‘ अण्णा सैन्यातून फरार झाले होते ‘ असा आरोप केला. पण अण्णांनीच मिळवून दिलेल्या माहितीच्या अधिकारातून हा आरोप निलाखस खोटा असल्याचं संरक्षण खात्यानं सांगितलं आणि कॉंग्रेस अण्णांना चेकमेट करण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न फसला. गेली पाच सहा दिवस आंदोलनाचा जोर आणि जनतेचा सहभाग मुळीच ओसरला नाही.

सहाजिकच आज सरकारनं थोडसं नमतं घेतल्याचं दिसतंय. पण बाजी उल्तेय असं पाहिल्यानंतर हे एखादं पाऊल मागे घेण्याचं राजकारणही यामागे असू शकेल. जिंकलोत तरी भरून पावलोत असं नव्हे. ही तर लढ्याची सुरवात आहे. मला राम मंदिराच्या लढ्याच्या वेळची एक घोषणा आठवतेय –
” ये तो सिर्फ एक झांकी है….मथुरा काशी अभी बाकी है.”

सोनियाच्या स्वप्नात महात्मा गांधी

गेली पाच सहा दिवस खूप धावपळीत गेले. गावी गेलो होतो. भुईमुग काढायचा होता. शेतावर कुठली आलीय नेट. पण अण्णांचं आंदोलन जवळून ( टिव्हीवर ) पहात होतो. लिहायचं खूप मनात होतं पण लिहू शकलो नाही. अण्णांच्या आंदोलनाच्या संदर्भात अनेक यसएमयस येत होते. त्या काहीशा टुकार भाषेतील यसएमयस वरून लिहिलेला हे कल्पित लेखन.

**************************************************************************
एक दिवस महात्मा गांधी सोनिया गांधींच्या स्वप्नात आले आणि म्हणाले, ” मरताना मी काँग्रेसला माझी टोपी , माझा चष्मा आणि माझी काठी दिली होती. कुठे आहेत त्या सगळ्या वस्तू ? ”

त्यावर सोनिया गांधी म्हणाल्या, ” टोपी तर आम्ही जनतेला घातली……….चष्मा मनमोहन सिंगांना दिला…………आणि काठी अण्णा हजारेंच्या हाती दिली होती.”

त्यावर महात्मा गांधी म्हणाले, ” ठीक आहे. जनतेला टोपी घालून तुम्ही माझ्या जनसेवेच्या व्रताला टोपी घातली आहे हे मी पहातो आहेच. माझा चष्माही मनमोहन सिंगांच्या डोळ्यावर दिसतो आहे. त्या चष्म्याच्या आतले डोळे आंधळे आहेत हे हि आता कळून चुकलंय. पण अण्णांनी काठीचं काय केलंय ?”

यावर सोनिया गांधी बारीक आवाजात म्हणाल्या ” काय हे बापुजी. चष्म्याशिवाय तुम्हाला दिसत नाही हेच खरंय. नाही तर आम्ही अण्णांच्या हाती दिलेली तुमची काठी अण्णांनी आमच्याच माथी हाणून आम्ही किती नाठाळ आहोत हे साऱ्या जगाला दाखवून दिल्याचं तुम्हाला दिसलं नसतं का ? ”

महात्मा गांधींनी झटकन सोनिया गांधींच्या स्वप्नातून पळ काढला आणि तडक स्वर्गात पोहचले. स्वर्गातून रामलीला मैदानावर एक नजर टाकली आणि तिथला सोहळा पाहून –

” रघुपती राघवा राजाराम पतित पावन सीताराम ”

हे त्यांचं प्रिय भजन गुणगुणू लागले. हेतू एवढाच कि काँग्रेसला सद्गती मिळावी. अण्णा हजारेंना उपोषण करायला लावलेला पापातून मुक्ती मिळावी. पण कॉंग्रेसचा झालाय कंसा सारखं. त्यांच्या पापाचा घडा भरलाय. नुसता भरलाय असा नव्हे तर भरून उतू चाललाय. आता त्यांचं पतन हे नक्कीच.

दिवा नसला तरी आग दिसते

उद्यापासून गावी जाणार आहे. भुईमुग काढायचा आहे. आणखी बरीच कामं आहेत.

स्वातंत्र्या दिन साजरा झाला खरं पण स्वातंत्र्याला काही अर्थ उरला नाही म्हणा. कधी कधी वाटत न्यायदेवतेपेक्षाही आमची लोकशाही अधिक हतबल आहे आणि आंधळी. फक्त बघ्याची भूमिका घेतो आहोत आम्ही. मनगट पिचल्यासारखे.निराश हताश. बसून रहातो.
ज्याला आम्ही आमचं सरकार म्हणतो त्या आमच्या मायबाप सरकारनं सध्या आम्हाला चिरडून टाकायचंच ठरवलंय. रामदेवबाबांसारख्या माणसाची जिथे डाळ शिजत नाही तिथ पवनेच्या पाण्यासाठी लढणाऱ्यानची काय कथा.

स्वातंत्र्यानंतर आणीबाणीचा एक काळ सोडला तर कधी कुणाचा आवाज फारसा उठलाच नाही. रामदेवबाबांनी आवाज टाकला. पण तो आवाज दाबून टाकण्यात आमचं सरकार यशस्वी झालं आहे. आता आण्णांही अटक केली. काय साधणार कॉंग्रेस यातून ? चारसहा दिवसांपूर्वी मायावतीच्या राज्यात आंदोलकांवर अमानुष लाठीमार करणारे पोलीस पहिले. परवा आमच्या महाराष्ट्रात पवनेच्या पाण्यासाठी अडून बसलेल्या शेतकर्यांवर गोळीबार करण्यात आला. आणखी काही ठिकाणी असा गोळीबार केला कि कशाला सामान्य माणूस उठाव करतोय.

पण नाही मित्रांनो. प्रेम विसरायला हवं. नाती नजरेआड करायला हवीत. स्वराज्य आहेच……….सुराज्याचा ध्यास धरायला हवा. त्यासाठी सुराज्याच्या यज्ञात स्वतःची आहुती द्यायला हवी. त्यासाठी आण्णाच्या आंदोलनाला पाठींबा द्यायला हवा.

आण्णा म्हणजे एक ठिणगी आहे. मंगल पांडे सारखी. ती धुमसणार. अखंड हिंदुस्तान पेटवणार. आणि त्या आगीत कॉंग्रेस जाळून राख होणार.

पाणीसुद्धा पेट घेतं

रॉकेल, डीझेल, पेट्रोल हे ज्वालाग्रही पदार्थ आहेत. लिक्विड पेट्रोलियम ग्यास ( LPG ) सुद्धा पेट घेतो. आणि असा धगधगता निखारा आमच्यापासून काही हातांवर असतो. कापरासारखा घन पदार्थसुद्धा पेट घेतो. असे आणखी कितीतरी पदार्थ सांगता येतील कि जे निर्जीव असूनही पेट घेतात. स्वतः जळताना अवतीभोवती जे काही असेल ते स्वः करतात. अगदी पवनेचं पाणीही पेट घेतं. पण आम्ही सजीव असूनही पेट घेत नाही. एखाद्या वाटेवरच्या दगडासारखे निमुटपणे सारं पहात रहातो.

असो.

पवनेचं पाणी नुसतं पेटलंच नाही तर त्या पाण्यानं सगळ्या मावळला कवेत घेतलं आणि शिवकालानंतर कितीतरी वर्षांनतर पुन्हा शिवाजी महाराजांचा मावळा पेटून उठला. पण स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्याच राजाचं च्त्राटती संभाजी महाराजांचं शीर औरंगजेबाला पेश करणारे मानाजी मानेसारखे कटकारंस्थानी आमच्यात काय कमी आहेत ? आणि हे मानाजी माने वेगळे असत नाहीत. ते आमच्यातच असतात. पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आमचा जीव घेतात. नाव जनकल्याणाचं पण साधायचा असतो स्वतःचा स्वार्थ. आर. आर. काय, अजित पवार काय. हे केवळ शेतकर्यांच्या मना मोडायला बसले आहेत. कारण यांना जाणीव नाही कि यांच्या मुखात पडणारा घास गावाकडच्या मातीतून येतो आणि त्यात शेतकर्यांचा घाम मिसळलेला असतो.