रखुमाईचा रुसवा

मित्रहो तीन चार दिवस वेळच नाही मिळाला. पण तुम्हाला प्रॉमिस केलेलं गाणं आज लोड करतोय. व्ही डी ओ फार क्लिअर नाही त्याबद्दल क्षमा करा. पण व्ही डी ओ तुमच्या पर्यंत पोहचवायचा हेतूच नाही माझा. त्या गाण्यातले शब्द आणि त्याचा संगीत तुमच्यापर्यंत पोहचवायचं होता तेवढ्यासाठी एवढ पुरेसं. हे गाणं तुम्ही यापूर्वी कधी कुठेही ऐकलेलं नसेल याची मला खात्री आहे. पण तुमचा अभिप्राय अधिक महत्वाचा.
मूळ लेखनाची अजिबात मोडतोड न करता ते सप्तसुरात बसवायला खूपच कसब लागता. या गीताचा संगीतकार अन्य गाडगीळनं त्याच्यापरीनं तसा मनोमन प्रयत्न केला पण तरीही मूळ लेखनात आणि गाण्यातील शब्दांमध्ये काही फेरफार आहेत. मूळ लिखाणही कालच्या

रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली

या पोस्टमध्ये आहेच

या गाण्यावरची प्रतिक्रिया मात्र नक्की कळवा.

Advertisements

रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली

( या पूर्वी तुम्ही कधी आणि कुठेही न ऐकलेलं हे गाणही लवकरच पोस्ट करीन )

रुसत नाही ती बायको नाही आणि तुमची फिरकी घेतल्यानंतर खळखळून हसत नाही ती प्रेयसी नाही. बायको रुसल्यानंतर भल्याभल्या वाघांचीही कशी शेळी होते याच्या अनुभव प्रत्येकाला अगदी पदोपदी आलेला असतो. बायकांचा रुसवा काढता काढता पुरुषांच्या अगदी नाकी नऊ येतात. तुम्ही कितीही खरे असा पण बायको रुसते तेव्हा नाक मुठीत धरून शरण जाण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नवऱ्या समोर उरत नाही.

एक दिवस माझ्या मनात असा विचार आला कि प्रत्यक्ष विठ्ठलाची तरी या फेऱ्यातून सुटका झाली असेल काय ?

नसेलच झाली. आणि मग अशा रितीनं प्रत्यक्ष विठोबावर रुसणाऱ्या रखुमाईच्या रुसव्याची कारण काय असतील ? विचार करता करता मनात आलं रखुमाई असली म्हणून काय झालं विठोबाची का असेना पण बायकोच ना ती !!!!!!!!!! तिच्या आणि आमच्या बायकांच्या रुसव्याची कारण सारखीच असतील.

फरक एवढाच तो विठोबा आहे. आमचा सर्वांचा तारणहार. तो लेकुरवाळा. तो काही आमच्यासारखं नाक मुठीत धरून रखुमाईला शरण जात नाही. तो आपला त्याच्या गोतावळ्यात रमून जातो. पण विठ्लाला नसली तरी त्याच्या भक्तांना रखुमाईच्या रुसव्याची चिंता असतेच ना. सहाजिकच रखुमाईला रुसायला काय झालं ? याची विचारणा करायला विठ्ठलासह हि सारी भक्त मंडळी रखुमाईला सामोरी जातात. तेव्हा रखुमाईनं सांगितलेली तिच्या रुसव्याची कारण अगदी तुमच्या आमच्या बायकोच्या रुसवाच्या कारणांशी मिळती जुळ्तीच आहेत.

प्रत्येक स्त्रीला जसा तिचा नवरा बिनकामाचा वाटत असतो. तसाच पंढरीचा विठोबाही अगदीच बिनकामाचा आहे असंच रखुमाईला वाटत असतं.

आपल्या नवऱ्यानं फक्त आपल्याभोवतीच पिंगा घालावा हीच प्रत्येक स्त्रीची अपेक्षा………तीच रखुमाईचीही.

कुठल्याही स्त्रीला आपल्या नवऱ्यानं इतरांविषयी दाखवलेली सहानभूती जशी सहन होत नाही तशीच रखुमाईलाही.

या साऱ्या विचारातून आकाराला आलेलं हे गाणं –

रखुमाई रुसली

सावळ्या हरी,  ऐकू या  तरी
काय झाला रुसायला
रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली
चला जावू पुसायला …………

सांगा सांगा रखुमा आई
विठोबा दादानं खोड केली काही
कान धरून सांगू उठाबशा काढायला
काय झालं रुसायला
रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली

असा कसा हा तुमचा हरी
नुसताच उभा विटेवरी
युगं लोटली कितीतरी
नाही तयार अजुनी खाली उतरायला
काय झालं रुसायला
रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली

विठू तुमचा लेकुरवाळा
सदा भोवती गोतावळा
सारी याच्या कडेवरी
मी तरी पडणार किती पुरी
रांधून लागले हात माझे दुखायला
काय झालं रुसायला
रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली

हा भक्तांचा कैवार घेतो
गोऱ्यासाठी चिखल होतो
जनीसाठी जातो दळण दळायला
अन पुस्ताय काय झालं रुसायला
रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली