बलात्कारला फाशी = अन्याय

बलात्कार साठीतला नराधमही करतो आणि ज्याला संभोग क्रियेविषयी फार  काही माहित नसतं असा ऐन पंधरा सोळा वर्षाचा तरुणही. बात्कार पन्नाशीतल्या षोडशेवर होतो आणि चार वर्षाच्या निष्पाप कोवळ्या निरागस जीवावरही. लैंगिक शोषण केवळ तरूणींचंच होतं असं नाही तर अनेकदा मुलंही लैंगिक शोषणाची बळी ठरतात.

दिल्ली बलात्कारातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली. अनेकांनी विजयोउत्सव साजरा केला. आरोपीच्या  वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. समाजातील विविध थरातून आरोपींना दिलेल्या कठोर शिक्षेबद्दल समाधान व्यक्त करण्यात आलं. सुशीलकुमार शिंदे यांच्यासारख्या जबाबदार धुरीनानही आरोपींना सुनावण्यात आलेल्या शिक्षेबद्दल समाधान व्यक्त केलं. पण खरंच बलात्कारातील त्या आरोपींना सुनावण्यात आलेली शिक्षा योग्य आहे ?

माझ्या मते नाही. कारण Continue reading

Advertisements

आभाळाचं डोळं, तिच्याकडं लागलं

ती त्याला दिसते……डोळ्यांना डोळे भीडतात आणि एका अवचित क्षणी तो तिच्या आणि ती त्याच्या मनात भरते. पण हे कधी….कुठे……आणि कसं घडतं….. Continue reading

दिल्लीतील बलात्कार पिडीतेला अशोकचक्र ?

 

Delhi Rape

Delhi Rape

बलात्कार या विषयाल अनुशंगाने मी मागेच मी मागेच बलात्कार का होतात ?, तर बलात्कारच होतील ??? हे लेख लिहिले आहेत. आणि आज पुन्हा त्याच विषयावर लिहितो आहे. कारण बलात्कारीत तरूणीने साऱ्या वेदना सोसल्या. त्यात तिचा बळी गेला. राजकीय नेतृत्त्व काहीच करत नव्हतं. पण सामान्य जनता रस्त्यावर उतरली. तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जनतेच्या भावना मी समजू शकतो पण Continue reading

शपथ झाली पोरकी

प्रेम कुणामधलंही असो. आई मुलातलं असो…….नवरा बायकोतलं असो……..प्रियकर प्रेयसीतलं असो………वडील मुलातलं असो……मित्रा मित्रातलं असो किंवा मित्र मैत्रीणीतलं असो. प्रेमाच्या कोणत्याही पदराला बंधनाची झालर असतेच. का अशा बंधनाची गरज भासते माणसाला ? कारण Continue reading

तुझ्यासाठी

ती रुसते रागावते आणि आपण आपला सगळा अहंकार बाजूला ठेवून तिला हसवू पहातो. तिच्यासाठी सर्कशीतला विदुषक होतो. गुलाबी गालावर सुकलेले अश्रू पुसत ती ओठांच्या कोनातून हळूवार हसते आणि आपण पसरलेल्या बाहूंच्या पंखात विसावते.

कधी कधी आपण रागावतो. आपल्याही नकळत तांडव करतो. ती भेदरते. आपल्या रागाला शरण जाते. आपल्याला हसवू पहाते. उषेचे रंग होते. फुलांचे गंध होते. आपण हरवून जातो त्यात. विसरतो आपला राग. पसरतो पंख आणि ती विसावते पुन्हा एकदा आपल्या कुशीत.

काय म्हणायचा याला ? प्रेम …… कि …… तडजोड ?

कारण या दोन्ही गोष्टी होत नाहीत तेव्हा दोघांच्या दोन दिशा ठरलेल्या. मध्ये एक अदृश्य भिंत. दोघांमध्ये विसंवाद निर्माण करणारी नव्हे. दोघांमधला संवाद दडपून टाकणारी. म्हणूनच खूप गरजेचा असतं अशी भिंत उभी रहाण्या आधीच जमीनदोस्त करण्याची. या आणि अशाच भावना व्यक्त करणारी हि कविता –

रुसवा, प्रेम, प्रेम कविता

रुसवा, प्रेम, प्रेम कविता

स्त्री भ्रुण हत्या आणि सुप्रिया सुळेंची पदयात्रा

मुलगी, सुप्रिया सुळेंची पदयात्रा , स्त्री भ्रुण हत्या

मुलगी, सुप्रिया सुळेंची पदयात्रा , स्त्री भ्रुण हत्या

मुलगी असेल तर जन्माला येण्या आधीच तिची हत्या करण्याची समाजाची मानसिकता अजूनही थांबत नाही. माझ्या घरात तसं घडतं………माझ्या शेजारी तसं घडतं………….माझ्या ऑफिसातही अशा घटना घडतात. मला घटना घडल्या नंतर कळतं. मी त्याविषयी काहीच बोलत नाही. मला दोन्ही मुलंच आहेत असं सांगितल्यानंतर, ” दोन्ही मुलंच का ? मजा आहे बुवा तुमची. ” असं म्हणणारी मंडळीही मला भेटतात. अशा वेळी काय करावं कळत नाही.

पण माझ्या धाकट्या बंधूंना दोन्ही मुलीच आहेत. एकाच मुलीवर थांबलेले माझे मित्रही आहेत. तीन मुलं असताना मुलगी हवीच म्हणून देवाला नवस करणारी आणि चौथं मुल होऊ देणारी माझी आई आहेच. मुलीची खूप आस बाळगली होती म्हणून माझ्या आईनं पाळण्यात न घालता तिचं नाव आशा ठेवलं. घरात मी थोरला. मला दोन्ही मुलंच झाली तेव्हा मला, ” एक मुलगी होऊ दे ना रे विजय.” अशी गळही मला माझ्या आईनं घातली. पण मी थांबलो कारण आजच्या महागाईच्या जमान्यात तिसरं मुल संभाळण म्हणजे तारेवरची कसरत.

हे सगळं सांगण्याला कारण घडलं. गेली दोन दिवस माझ्या ऑफिसच्या रस्त्यावरून सुरु असलेली सुप्रिया सुळेंची पदयात्रा मी पहातो आहे.

मुलगी, सुप्रिया सुळेंची पदयात्रा , स्त्री भ्रुण हत्या

मुलगी, सुप्रिया सुळेंची पदयात्रा , स्त्री भ्रुण हत्या

मागे पुढे पोलिसांचा भला मोठ्ठ ताफा…………रस्त्यावर ठिकठिकाणी झळकणारे ताडमाड फ्लेक्स पदयात्रेत सहभागी झालेल्या ( स्वखुशीने कि आदेशाने माहित नाही ) हजारभर शाळकरी मुली. मुंबई बेंगलोर सारख्या राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूला सहासात किलोमीटर पर्यंत रखडलेली वहाने. रस्त्यात ठिकठिकाणी चाललेले सत्कार………….हार तुरे ………..मुठभर पांढऱ्या शुभ्र मिशा ओठावर मिरवत सुप्रिया सुळेंच्या पायाशी वाकणारी मंडळी……….क्षणभराचा सत्कार झालाकी तुंबलेल्या वहानांच्या रांगेकडे पहात, ‘ आमची गाडी तेवढी काढून द्या. ” असं पोलीस अधिकार्याला फर्मावणारे पांढऱ्या खादितले पुढारी………..पुढारी पोलीस अधिकाऱ्याला साहेब म्हणत नाही. पण पोलीस अधिकारी मात्र ‘ होय साहेब ‘ म्हणत तुंबलेल्या वहानांच्या रांगेवर चवताळून जाणारे पोलीस अधिकारी. हे सारं स्त्री भ्रुण हत्या थांबविण्यासाठी कि केवळ एक स्टंट म्हणून. कारण चारसहा वर्षापूर्वी कोण ओळखत होतं या सुप्रियाला. पण आज तिच्या समोर चाललेली थोर मोठ्यांची आणि पोलीसखात्याची लगबग पहिली कि वाटतं सत्तेसमोर शहाणपणही चालत नाही आणि थोरपणही.

तर बलात्कारच होतील ???

एकदा माणसाला मोठेपण लाभलं कि ती काय काय विधान करतील याचा काही नेम नाही. तशी हि माणसं नेहमीच तोलून मापून बोलतात पण तरीही कधी कधी घसरतात.

” स्त्रियांनी अर्धवट आणि तंग कपडे घातले तर बलात्कारच होतील. ” हे एका स्त्रीचं विधान. ( खरंतर या विधानाची छायांकित प्रतच मला इथं द्याची होतो. पण ते वर्तमान पत्र मला न मिळाल्यानं मी सदर लेखनातून ते नाव वगळल आहे. पण ज्यांना सदर विधानाविषयी शंका असेल त्यांनी १२ डिसेंबरचा लोकमत किंवा पुढारी पहावा. दोन्हीपैकी कोणत्यातरी एका वर्तमान पत्रात मी सदर वाक्य वाचलं आहे. ज्या रसिकांना सदर वाक्य कोणत्या वर्तमान पत्रात वाचलं आहे हे आठवत असेल त्यांनी कृपा करून अभिप्रायातून कळवाव.)

नशीब हे एका स्त्रीचे उद्गार होते. एखाद्या पुरुषाच्या तोंडून हे उद्गार बाहेर पडले असते तर केवढं रान पेटलं असतं. केवळ एका आदरणीय स्त्रीनं हे विधान केलं होतं म्हणून त्यावर फारसा गहजब मजला नाही.

मला मात्र फार वाईट वाटलं. त्यांनी हे आईच्या भूमिकेतूनच सांगितलं असेल हेही मला मान्य आहे. पण बदलत्या काळाची, बदलत्या फ्याशनची दखल त्यांनी घेतलेलीच दिसत नाही. त्या अजून त्यांच्याच जमान्यात वावरत आहेत. याचा अर्थ मी देह प्रदर्शन करणाऱ्या फ्याशनची पाठराखण करतो आहे असं मुळीच नाही. तसं असतं तर मी लो कट to हाय हिल्स हा लेख लिहिलाच नसता.

पण, ‘ तरुणी अपुरे आणि तंग कपडे वापरतात म्हणून त्यांच्यावर बलात्कार होतात.’ असं म्हणणं म्हणजे फारच झालं. याच विधानाचा आधार घेऊन एखादा नराधम जर, ” माझी काही चूक नाही तिनं कपडेच तसे घातले होते म्हणून तिच्यावर बलात्कार करण्याची मला इच्छा झाली. ” असं म्हणू लागला तर !!!

एखाद्या अपुऱ्या, तंग कपड्यातल्या तरुणीला पाहून कुणाही सर्वसामान्य व्यक्तीच्या मनात त्या तरुणीवर बलात्कार करावा अशी इच्छा मुळीच निर्माण होणार नाही. अगदी माझी स्वतःचीच मानसिकता सांगायची झाली तर मला घृणाच वाटते अशा स्त्रीकडे पाहून.

त्यामुळेच बलात्कार करण्याची इच्छा निर्माण होण्याला त्या त्या व्यक्तीमधली पाशवी वृत्तीच कारणीभूत असते. अशा नराधमांना अपुऱ्या ………..तंग कपड्यातल्या तरुणीच उद्दीपित करतात असंच नव्हे तर, त्यांच्यातली  पाशवी वृत्ती जागी होते तेव्हा त्यांना कसलीही स्त्री चालते……..अगदी वेडिविद्रीही. तीही मिळत नाही तेव्हा असे नराधम अंगभरकपडे असणाऱ्या एखाद्या आठ – दहा वर्षाच्या मुलीचा घास घ्यायलाही मागे पुढे पहात नाहीत.

तरुणींनी संयमानं वागायला हवं हे जरी खरं असलं तरी अशा पाशवी वृत्तीला पाठीशी न घालता त्यांना कठोरात कठोर शासन झालं पाहिजे यासाठीच प्रत्येकानं पाठपुरावा करायला हवा………….अगदी देहांत प्रायश्चित्त एवढ्या कठोर शिक्षेसाठीही.