आभाळाचं डोळं, तिच्याकडं लागलं

ती त्याला दिसते……डोळ्यांना डोळे भीडतात आणि एका अवचित क्षणी तो तिच्या आणि ती त्याच्या मनात भरते. पण हे कधी….कुठे……आणि कसं घडतं….. Continue reading

Advertisements

शपथ झाली पोरकी

प्रेम कुणामधलंही असो. आई मुलातलं असो…….नवरा बायकोतलं असो……..प्रियकर प्रेयसीतलं असो………वडील मुलातलं असो……मित्रा मित्रातलं असो किंवा मित्र मैत्रीणीतलं असो. प्रेमाच्या कोणत्याही पदराला बंधनाची झालर असतेच. का अशा बंधनाची गरज भासते माणसाला ? कारण Continue reading

मैत्री : तीही गाढवाशी.

donkeyसुदंर मुलीच्या प्रेमात कुणीही पडतो. पण रंगानं काळ्या , दात पुढं आलेल्या मुलीकडे कुणी वळूनही पहात नाही. तिलाही प्रेमाची गरज असतेच ना ? पण असा साधा विचारही कधी आपल्या मनात येत नाही. का असं ?

एखाद्या छानछोकी खिसा खुळखुळनाऱ्या मुलाकडे मुली सहज ओढल्या जातात. पण अंगावर साधेसुधे कपडे असणाऱ्या सरळ मार्गी मुलाला मात्र त्या मुर्खात काढतात. त्या मुलालाही मन आहे भावना आहेत याची जाणीवही नसते मुलींना.  का असं ?

सुंदर मुलीच्या प्रेमात पडायला आणि श्रीमंत मुलांना भुरळ घालायला फार बुद्धी लागत नाही. त्यासाठी Continue reading

खरी मैत्री

womenमी परवाच्या खरा मित्र या पोस्टमध्ये ‘ शालेय जीवनातील मित्र हेच खरे मित्र असतात ‘ असं विधान केलं होतं. हे विधान शंभर टक्के खरं आहे असा माझा दावा नाही. पण आयुष्यातल्या इतर कालावधीत भेटणारे मित्र आणि शालेय जीवनातील मित्र यांना एकाच पारड्यात तोलायचं झालं तर शालेय जीवनातील मित्रांचं पारड निश्चित जड ठरेल. पण मैत्रीच्या कुठल्याही टप्प्यावर तुमच्या वैचारिक आणि भावनिक तर जुळायला हव्यात हे निश्चितच. पण शालेय जीवनातील मैत्रीची बाजू घ्यायला तसं कारणही घडलं.

राजू कुचेकर. आमचा इंजीनियारिंगचा मित्र. रंगानं काळा. सावळा हा शब्द जोडून वापरू नये इतका काळा. पण दिलानं मोठा. अंगानं सडसडीत. पहाणाराला वाटावं एका झापडीचाही नाही. पण Continue reading

खरे मित्र

friendship

friendship

आपण जन्माला आल्यापासून तिरडीवर चढेपर्यंत किती माणसं येतात आपल्या आयुष्यात. चढेपर्यंत म्हणण्यापेक्षा चढवले जाईपर्यंत म्हणू. चढवले जाईपर्यंत तरी कशाला म्हणायचं. तेव्हा कुणाला कसलाही विरोध करण्याचं त्राण तर नसतच आपल्यात पण काहीच उरलेलं नसतं आपल्या हाती.
पण ……….

Continue reading

प्रेम म्हणजे नेमकं काय ?

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे
प्रेम असतं
तुमचं आमचं साऱ्यांच
सेम असतं.

एवढ्या दिलखुलास शब्दात मंगेश पाडगावकरांनी प्रेमाची व्याख्या सांगितली. प्रेम आधी आलं मग प्रेमाची व्याख्या आली. कोट्यावधी वर्षापूर्वी कोणते जीव अस्तित्वात होते हेही संशोधक सांगू शकतील पण माणसाच्या मनात प्रेम भावनेचा उगम नेमकं कधी झाला हे सांगणं मात्र कुणालाही शक्य होणार नाही. आणि तरीही आपल्याला प्रेम म्हणजे काय हे नक्की समजलंय असं वाटत नाही.

निस्वार्थ असतं ते प्रेम………प्रेमला कसलाही मोह नसतो…………प्रेमाला कसलीही अपेक्षा नसते. अशा रीतीनं प्रेमाला शब्दांनी व्यापण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही Continue reading