टोल नकोच

tax or tollखरंच टोल नकोच. का ते मी माझ्या ‘ तेरीभी चूप, मेरीभी चूप ‘ या मागेच लिहिलेल्या लेखात विस्तारानं लिहिलं आहे.

परवा ‘ आम्ही सत्तेत आल्यास महाराष्ट्र टोलमुक्त करू.’ असं आश्वासन भाजपच्या गोपीनाथ मुंडेंनी दिलं. मोदींनी त्यावर कुठेही आपलं मत नोंदवलं नाही. याचा अर्थ Continue reading

Advertisements

प्रेमाची भूक

आपली प्रत्येकाची प्रेमाची भूक केवढी असते हे मला ब्लॉग लिहितोय तेव्हा पासून जाणवू लागलाय. कारण का तर ? मी तसं बरंच काही लिहितो ब्लॉगवर. आपल्या देशातला भ्रष्टाचार हि मला सर्वात अधिक चीड आणणारी गोष्ट. माणसातली माणुसकी जागी करावी म्हणून हे लेखन………..प्रत्येकानं चिडून उठाव म्हणून हि धडपड.

पण मला सामाजिक तळमळीपेक्षा प्रेमाच्या शोधात भटकणारे मित्रच अधिक भेटले. ते सहाजिकच आहे. कारण आधी माणूस…………मग प्रेम………….मग समाज हीच खरी साखळी. आधी पोटोबा……………मग विठोबा हेच खरं.
मी सारं लिहितो आहे माझ्या ब्लॉगवर. पण

या कावितांनाच सर्वाधिक वाचक मिळाले.

बैल आणि मी

हा लेखही बऱ्याच जणांनी वाचला. रसिकांच्या सर्वात अधिक प्रतिक्रिया मिळालेला हा लेख. पण या लेखाचा गाभाही प्रेमच………….फक्त त्याची जातकुळी वेगळी.
असो. या सगळ्याची दखल घेईन आणि लिहित राहीन. मला फक्त हवंय तुमचं प्रेम तुमचा प्रतिसाद.

दिव्यांचा उत्सव.

मित्रहो,

परवा अपलोड केलेलं ‘ पावसा रे पावसा ‘ हे गाणं तुम्हाला किती आवडलंय ? ते काही कळलं नाही. कळेल सावकाश. त्याची काही घाई नाही एवढी.

पण आज धनत्रयोदशी. आजपासून सुरु होतो मनामनात दिव्यांचा उत्सव. मग तुम्हा शुभेच्छा द्यायला उशीर करून कसं चालेल !!!!!!!!

हीच का आमची लोकशाही ?

हेच ……हेच नको असतं मला. विलासराव गेले…………अशोकराव आले. काय केलं त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत माहित नाही ! पण झाले बळीचा बकरा. किती ठामपणान त्यांनी परवाच विधान केलं होतं कि, ” माझ्या दूरच्या नातेवायकांनी काय निर्णय घ्यायचे हा त्यांचा प्रश्न आहे. मी दिल्लीला निघालोय ते वेगळ्या कारणासाठी. ”

झालं. अशोकराव दिल्लीला गेले आणि राजीनामा देऊन मोकळे झाले. किती ढिसाळ राजकारण आमचं. एक दुसऱ्याला खाली ओढतो……….सत्तेच्या वारूवर स्वर होतो. भोवतीन हजारो टपलेलेच असतात, ‘ याला कसं खाली ओढता येईल ‘ याची वाट बघत. राजकारणात गेलेला माणूस ग्रह फिरल्यावर ‘ बाबाही रहात नाही आणि बाईही रहात नाही.’ अशावेळी तमाशातला आमचा सोंगाड्याही अधिक पावरबाज वाटायला लागतो. 

परवाच सोनियांच्या मेळाव्यासाठी दोन कोटी दिल्याच्या प्रकरणात अडकता अडकता अशोकराव वाचले होते. महिनासुद्धा झालं नाही त्या घटनेला. आज आलीच गच्छन्ति. काय अधिकार सोनियांना अशोकरावांचा राजीनामा मागण्याचा ? पण विचारणार कोण कुणाला ? आणि समजा विचारलं तरी उत्तर मिळेल, ” छे, छे ! आम्ही नाही काही राजीनामा मागितला. त्यांनीच हे ओझं आपल्याला पेलत नाही असं सांगत राजीनामा दिला.” हे सारच असंच आहे. विलासरावांना पायउतार व्हायला लावून तुमच्या ध्यानीमनी नसताना आम्हीच तुम्हाला त्या सिंहासनावर बसवलं. मग आता आम्ही सांगतो आहोत तर द्या राजीनामा.

ही आमची लोकशाही. सत्तेत यायचा अधिकार तुम्हाला आहे पण सत्तेवर रहायचा अधिकार मात्र तुम्हाला नाही. मालकांना पेकाटात लाथ घातल्यावर कुत्र्यांना जसा क्यॉव………क्यॉव करत तुम्ही वळचनीला पडाव तसा आपला तुम्ही आमचा पुढचा आदेश मिळेपर्यंत गप्पं पडून रहावं.

आणि आम्ही म्हणतो आमच्या देशात लोकशाही आहे. काय केलं विलासरावांनी ? काय करू शकतात अशोकराव ? माझ्यावर अन्याय होतोय असं म्हणत न्याय मागू शकतात ? नाही ना ? मग कशाला म्हणायचं आम्ही व्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते आहोत म्हणून.

अरे खरच जर एखादा नालायक असेल तर त्याला सत्तेवरून खाली खेचायचा अधिकार मतदारांनाच द्या ना. पण नाही आमचं शासन तसं करणार नाही. कारण असे जर सामान्य मतदारांच्या हाती

अधिकार दिले तर ‘ हायकमांडच्या ‘ अस्तित्वाला धक्का नाही का पोहचणार ?

इथ गारुडला महत्त्व नाही. गरुड वाजवणाऱ्याला अधिक महत्त्व आहे. मनमोहन काय आणि अशोकराव काय वळ आली कि गप्पं टोपलीत जावून बसतात.

ज्वालामुखीच रौद्र रूप

१) लोखंडाचा लालबुंद रस वहावा तसा डोंगर माथ्यावरून वहाणारा हा ज्वालामुखीचा रस

२ ) हाच तो आभाळात शेकडो किलोमीटर लांब आणि हजारो फुट उंचीवर पसरलेला धूर

३ ) परिसरातले बर्फाचे डोंगरही ज्वालामुखीच्या उष्णतेने वितळू लागले

४ ) जमिनीपासून आभाळापर्यंत हा धूर पसरला होता. अशाच धुरातून चाललेली हि कार

५ ) जमिनीचं पोट फाडून उंच उसळी घेणारा ज्वालामुखी


मित्रहो ईश्वर आहे कि नाही जगात या विषयी अनेकांची अनेक मत आहेत. ईश्वराचं अस्तित्व नाकारणारयांचा वर्गही खूप मोठा आहे. पण ज्वालामुखी, स्तुनामी, भूकंप यासारख्या घटना पहिल्या कि ईश्वराच अस्तित्व नाकारता येत नाही. अगदी मागे युरोपात जमिनीच पोट फाडून बाहेर आलेला ‘ एयाजाफाजाल्लोकुल ‘ ज्वालामुखीच रौद्र रूप पाहिलं कि ईश्वराच अस्तित्व मान्य करावाच लागतं.

यासारख्या घटनांच खूप पृथ्थकरण आपण करतो आपण. त्याची कारणमिमांसाही शोधून काढतो. पण आपल्या हातात तेवढंच आहे. अशा घटना आपल्या काबूत ठेवायला आपल्याला कधी जमेल ????????!!!!!!!!!!

या ज्वालामुखीच्या भयानकतेची जाणीव मलाही नव्हती. पण युरोपातल्या त्या  ‘ एयाजाफाजाल्लोकुल ‘ ज्वालामुखीचे रौद्र रूपाचे मला मेलवर आलेले फोटो पहिले. आणि निसर्गापुढे आपण किती हतबल आहोत याची जाणीव झाली.

त्याच्या भयानकपणाच्या खुणा –

१) त्याच्यातून निघालेला धूर आभाळात २४००० फुट उंच गेला होता.

२)हा धूर आभाळात तशी २० ते ८० मैल या वेगाने वहात होता.
3) त्याच्यातून निघलेल्या उष्णतेने भोवतालच्या परिसरातले बर्फाचे डोंगर वितळले .
४) या वितळलेल्या बर्फामुळे परिसरातल्या अनेक नद्यांना पूर येऊन त्यांच्यावरचे पूल पाण्याखाली गेले.
५) विमानसेवा बंद करावी लागली.
६) या धुरामुळे त्या परिसरातल्या लोकांला काही महिने सूर्यदर्शन होणार नाही।

ईश्वराच अस्तित्व स्विकारायचं कि नाकारायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपण आपलं नम्र असावं. बस्स !

गाईचं शेण आणि सत्वयुक्त अन्न

आम्ही प्रगतीच्या किती गप्पा मारतो. चंद्र, सूर्य, तारे सारं अगदी काखेत घेऊन फिरल्यासारखे वागतो. टि.व्ही. काय ? ………. इंटरनेट काय ?…………फोन काय ?…………मोबाईल काय ?……..शॉपिंग काय ?………हॉटेलिंग काय ?…….फास्टफूड काय ?……..चायनीज काय ? हेच आमचं लाईफ………..हीच आमची जीवनशैली……..!!!!! वामनानंतर एका पावलात पाताळ आणि दुसऱ्या पावलात आकाश पादाक्रांत करण्याची क्षमता आणखी कुणात असेल तर ती फक्त आमच्यात. केवढी प्रगती केलीय आम्ही ! पण एवढ्या प्रगतीनंतरही आम्हाला मिळणारं अन्न सत्वयुक्त आहे कि नाही ??? असा प्रश्न कधी पडलाय आम्हाला .

नाही ना !!!!!!! नाहीच पडणार. लाईफ है …..एश है…..बस्स !!!!!! आमच्या जगण्याला दुसर काही कारण नकोच आहे.

नको नको ते रोग………… उपटसुंभासारख्या उपटणारया आणि आमच्या आयुष्याला जळमटासारख्या चिकटणारया कसल्या कसल्या व्याधी ………..अकाली पांढरे होणारे केस……….वयाच्या पंचविशीतही ह्र्द्यरोगाच्या झटक्यानं येणारं मरण……..आजकाल कुठल्या रोगाची भीती वाटत नाही आम्हाला??????………थंडी, ताप, खोकला, ठसका ……..असं जरा काही झाला कि आमचा जीव घाबरागुबरा होतो.फार कशाला, अहो काल परवा आलेला तो ” स्वाइन फ्लू ” पण त्यांना सुद्धा आमचं जीण हराम करून टाकलय. असल्या तसल्या कुठल्याही फुटकळ व्याधीन मरणारी माणसं पहिली तर तुम्हालाही प्रश्न पडेल, ” आम्हाला मिळणारं अन्न सत्वयुक्त आहे कि नाही ??? ” या माझ्या प्रश्नापुढं मी तीनच प्रश्नचिन्ह देऊन थांबलोच कसा. खरंतर या प्रश्नापुढं असंख्य प्रश्नचिन्ह दिलीतरी ती अपुरीच पडतील.

मी मुळात ग्रामीण भागातला. गाईच्या शेणाचा आणि माझा फार जवळचा संबंध. तांबडं फुटताच उठून आम्ही शेणकुर करायचो. गुरामाग गेलो कि वढ्याला पडलेले त्यांचे शेणाचे पोव घरी न्यायचो. सहाजिकच त्या शेणाच्या पोवाचा एक निसर्गदत्त आकार माझ्या चांगलाच परिचयाचा आहे. त्या शेणाच्या पोवातून निघणाऱ्या गरम वाफा मी फार जवळून अनुभवल्या आहेत. त्या शेणाच्या पोवाचा मनाला उल्हासित करणारा गंध माझ्या मनात कालपरवापर्यंत जसाच्या तसा होता.

शिकलो…….शहरात आलो. ऑफिसर झालो आणि गाईच्या शेणाला दुरावत गेलो.

पण दोन एक  महिन्यापूर्वी माझ्या वडिलांना देवाज्ञा झाली आणि त्यांचे अंतिम संस्कार करताना अनेक वर्षांनतर माझा गाईच्या शेणाशी जवळून संबंध आला.

झालं असं ! वडिलांना ज्या ठिकाणी अग्नी दिला ती जागी शेणाचा सडा शिंपडायचा होता. कुणीतरी बादलीत गाईची शेण दिलं. आणखी कुणीतरी त्यात पाणी ओतला आणि ती बादली माझ्या हाती दिली. मी शेण कालवू लागलो आणि एक अगदी नकोसा दर्प माझ्या नाकात शिरून मला कासावीस करू लागला. पण पर्याय नव्हता त्यामुळे तो दर्प तसाच सहन करून सडा शिंपला. बादली रिकामी झाली. पण शेणानं बरबटलेले हात कधी  एकदा धुऊन टाकतोय असं मला झालं होतं.

ही गाय शहरातली होती हे सुज्ञास सांगणे न लगे. गाईच्या शेणाला हा नकोसा दर्प तिला शहरात मिळणाऱ्या नीकस अन्नामुळेच येत असावा हे सांगायला कुण्या शास्त्रज्ञाची गरज नाही.

आता सांगा शहरात आम्हाला मिळणारं अन्न तरी  सत्त्वयुक्त असेल याची खात्री देवू शकताय तुम्ही ? जर आमची प्रगती आम्हाला सत्वयुक्त अन्न देऊ शकत  नसेल तर मग त्या प्रगतीचा फायदा काय ??????????????

मनपूर्वक शुभेच्छा

मी गेले दोन महिने लिहित नव्हतो. तरीही माझे अनेक वाचक नियमितपणे माझा ब्लॉग ओपन करत होते. त्यात देवेंद्र होता, सुजित होता, आकांक्षा होती, विशाल होता, आणखी कितीतरी नावं लिहिता येतील. पण कुणा कुणाची आणि किती नावं लिहिणार ? आणि इतरांची नावं लिहिली नाहीत म्हणून मला त्यांचा विसर पडलाय असही होत नाही. मित्रहो तुम्ही नुसताच माझा ब्लॉग वाचवा, छान म्हणावं, माझ्या लिखाणावरच्या तुमच्या  प्रतिक्रिया पहाव्यात म्हणून नाही लिहित काही मी ?

राष्ट्रकुल स्पर्धेची सांगता खूप छान झाली असं म्हणत तिला सुरवातीला लागलेलं भ्रष्टाचाराचं गालबोट पुसण्याचा प्रयत्न झाला खरा. पण आमच्या देशातला भ्रष्टाचार म्हणजे चंद्रावरचा डाग आहे. तो पुसून टाकायचा असेल तर आम्ही साऱ्यांनी जागं व्हायला हवं.

” क्रांती सामान्य माणसच करतात. पुढारी नव्हे हे. ” लक्षात घ्यायला हवं.

कदाचित आता आपल्याच लोकशाही विरुद्ध आपल्याला एखादं रामायण घडवावं लागेल………….. एखादं महाभारत रचावं  लागेल………….एखादं पानिपत लढावं लागेल…………..एखादा सत्याग्रह करावा लागेल; पण मित्रांनो आपल्या लोकशाहीतला कचरा आपल्याला कडून टाकायलाच हवा. म्हणून हा सारा लेखन प्रपंच.

असं असूनही इतके दिवस का लिहित नव्हतो मी ते कळेलच तुम्हाला लवकर. आज नाही सांगत. आज तुम्हा साऱ्यांना दसऱ्याचा मनपूर्वक शुभेच्छा.