पाण्याचं राजकारण

kukadi damपाणी. वनस्पतीपासून प्रत्येक सजीवाच्या जगण्यासाठी आवश्यक असलेली एक बाब.  देशात अनेक धरणं. कालवे. सिंचनाची एक सुसूत्र व्यवस्था. पण Continue reading

Advertisements

ऊस आंदोलनाला हिंसक वळण

sugar cane

sugar cane

आज सकाळी ‘ एबीपी माझा ‘ वर एक पोल घेतला होता. प्रश्नाचं स्वरूप होतं ते असं. ‘ ऊस आंदोलनाला हिंसक वळण लागणे योग्य आहे का ? ‘ तीन पर्याय होते. ‘ होय ‘ , ‘ नाही ‘ आणि ‘ सांगता येत नाही.’

मी माझं ‘ नाही ‘ असं मत नोंदवलं होतं. नंतर Continue reading

ऊस आंदोलन आणि शेतकरी

Lathicharge on farmer, ऊस आंदोलकांवर लाठीचार्ज

Lathi charge on farmer, ऊस आंदोलकांवर लाठीचार्ज

दौंडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कमानीवर ‘ शेतकरी  सुखी तर ……..जग सुखी.’ असं ब्रीदवाक्य आहे. हे शब्दश खरं आहे. कारण Continue reading

काळ्यापैशाचे स्त्रोत

आपल्या देशात काळ्या पैशाबद्दल खूप बोललं जातं. आपल्या सात समांतर अर्थव्यवस्था उभ्या रहातील इतका काळा पैसा आपल्या देशात आहेत हे मी एम.ए. ला असताना आमच्या अर्थशास्त्राच्या सरांनी सांगितलं होतं. काळ्या पैशाच्या मुद्द्यावरच रामदेवबाबांनी रान पेटवलं होतं. की. विलासराव असोत, माजी मुख्यमंत्री  अशोक चव्हाण असोत, उपमुख्यमंत्री अजित पवार असोत,  मनमोहनसिंग असोत कि रोबर्ट वढेरा असोत काळ्या पैशात हात  बरबटले नाहीत असा नेता शोधून सापडणार नाही.

घोटाळ्यांचे आकडे तर हजार कोटींच्या खाली नसतातच. बरं सारं करून हात झटकून हि मंडळी सगळ्यांना हसत मुखानं तोंड देतात. म्हणजे कसं तर Continue reading

हे किडे कशासाठी ?

२२ वर्ष नौकरी केली. वडीलांच्या आकस्मित निधनानं पोरक्या झालेल्या शेतीला आधार देण्यासाठी नौकरी सोडायचा निर्णय घेतला. मोठ्या हौसेने प्रोडक्शन म्यानेजर या मोठ्या पदावरची एका बहु देशीय  कंपनीतली नौकरी सोडून शेती करायला गेलो. वडील गेल्यानंतर ऑक्टोबर २०१० ला चार एकर उस लावला होता. डिसेंबर २०११ ला नौकरी सोडून कायमचा शेतावर गेलो. नव्यानं दीड उस एकर लावला. दीड एकर भुईमुग पेरला. एकरभर भेंडी लावली. आणि पावसानं प्राण कंठाशी यावेत इतपर ओढ दिली. आटत्या पाण्याचा उसाला फटका बसत होता. भुईमुग पाण्यावाचून सुकू लागला होता. भेंडीला वेगवगळ्या रोगांनी पछाडलं. एकूण काय Continue reading

आजीबाईंचा बटवा आणि तात्यांची पोतडी

आजीबाईंच्या बटव्याबद्दल आपण प्रत्येकानं ऐकलेलं आहे. नियतीच्या कासोटीला जेवढी दुखणी त्या प्रत्येक दुखण्यावर आजीबाईंच्या बटव्यात औषध सापडत असे असं म्हणतात. पूर्वी आजीबाई कासोटा नेसत. त्याला बटवा असे. आणि त्या बटव्यात औषध. काळाच्या ओघात कासोटा गेला आणि कासोट्यासोबत बटवाही.

आताच्या आजीबाईंना कासोटाच नेसता येत नाही. मग बटवा अडकवणार कुठं ? अहो इतकी दयनीय अवस्था असते आजकालच्या आज्यांची आणि आयांचीही विचारू नका. नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाला अंघोळ घालण्याचं ज्ञानही त्यांना नसतं. मग मोलकरीण लावायची आणि आपल्या कुशीत नऊ महिने जीवापाड जपलेला जीव अंघोळीला तिच्या ताब्यात द्यायचा. आणि घरोघर सांगत फिरायचं, ” माझ्या सोनुला अंघोळ घालायला पारूबाई येते. पाचशे रुपये घेते महिन्याला पण छान अंघोळ घालते हं.” जणू काही ही पारूबाई म्हणजे एक टेक्निशियानच.

असो. मला या सगळ्याबद्दल लिहायचं नाही.

मी शेती करायचा निर्णय घेतला आणि गावी गेलो. एक दिवस दुपारी बैल दारासमोरच सावलीला बांधायचा होता. झाडाचा बुंधा फार मोठा म्हणून त्या बुंध्याला बैल बांधता येत नव्हता. झाडाखाली एखादी खुंटीही नव्हती. आता काय करायचं या चिंतेत मी घरात गेलो. घराचे कानेकोपरे पहिले आणि दीड दीड फुट लांबीचे चार खिळे माझ्या हाती लागले. त्यातलाच एक खिळा झाडाच्या सावलीत ठोकला आणि त्यालाच बैल बांधला.

वडील जरी मागील पाच सहा वर्ष शेती पहात होते तरी ते मजूर लावूनच काम करून घ्यायचे. त्यामुळेच शेतीसाठी आवश्यक सगळीच सनगं त्यांनी घेण्याची काहीच कारणं नव्हती. पण मी स्वतःच शेती करायचं ठरवलं होतं. आणि म्हणूनच गरजेची सारी अवजार माझ्याकडे असणं आवश्यक होतं. पण मला जे जे हवं ते ते सारं मला घरातच मिळू लागलं.

आणि म्हणूनच मला आजीबाईंच्या बटव्याची आठवण झाली. आणि गावाकडच्या आमच्या घराला मला तात्यांची पोतडी असं नाव द्यावंसं वाटलं. कारण मागील चार सहा महिन्यात मला ज्या ज्या गोष्टीची गरज पडली ती प्रत्येक गोष्ट मला आमच्या घरात मिळाली. त्यात फ्युज वायर, नवे कोरे फ्युजचे सेट, स्प्यानरचा अखंड सेट, मोटारीच्या स्टार्टरचे काही सुटे भाग, रबरी प्याकिंग, पाईप, फवारणी पंप, काही कीटक नाशक. साठ एक वर्षापूर्वी बांधलेल्या आमच्या त्या जुन्या घराच्या कानाकोपऱ्यात इतक्या गोष्टी आहेत कि गेल्या पाच सहा महिन्यात मीच ती प्रत्येक गोष्ट हाताळून पहिली नाही. ज्या गोष्टीची गरज भासेल तिचा शोध घ्यावा आणि ती सापडावी असंच चाललं आहे.

आताच्या कडकडत्या उन्हाळ्यात कमी पडणाऱ्या पाण्याची जाणीव जणू त्यांना आधीच झाली होती म्हणूनच त्यांनी एक बोअर घेतलं होतं. आज त्या बोअरच्या जीवावरच या उन्हाळ्यात मी लागवड केलेल्या सगळ्या पिकानं तग धरली.  त्यात साडे पाच एकर उस आहे. दीड एकर भुईमुग आहे. एकरभर भेंडी आहे आणि आमच्या बैलासाठी घासही आहे. आणि आता त्या बोअरच्या जीवावरच माझं उर्वरित सहा एकर क्षेत्र पाण्याखाली आणण्याचं स्वप्नं पहातो आहे.

वडिलांच्या आशीर्वादासारखी ही पोतडी. मी जो पर्यंत शेती करीन तो पर्यंत मला काही कमी पडू देणार नाही असं मला विश्वास आहे.

तात्यांची पोतडी

तात्यांची पोतडी

असा मी……असाही मीच

असामीकुणाला वाटेल मला पुलंच्या ‘ असामी ‘ बद्दल लिहायचं आहे. पण नाही. पुलंच्या ‘ असामी असामी ‘ बद्दल टीका टिपण्णी करण्या इतपत मी मोठा नाही.

यातली छायाचित्र पाहिल्यानंतर तुम्हाला माझ्या विषयाचं गांभीर्य पटेल. माणूस स्थित्यंतर प्रिय आहे. किंवा असंही म्हणता येईल माणसाला त्याच्यातली स्थित्यंतरं प्रिय असोत व नसोत त्याच्यात घडणाऱ्या स्थित्यंतराचा स्वीकार त्याला करावाच लागतो.

आता माझंच पहाना. काही महिन्यापूर्वीचा मी प्रोडक्शन म्यानेजर. एका बहुदेशीय कंपनीत माझ्या कामात व्यस्त असणारा. वीस बावीस लोकांची टीम सांभाळणारा. केबिन….संगनक……प्रोडक्शन शेडूल…….मंथली टार्गेट…….डीस्प्याचेस…….ऑर्डर लाईन…….प्रोसेस डेव्हलपमेंट………लाईन ब्यालांसिग……….सप्लायर डेव्हलपमेंट………..कामगार……..घड्याळाचे काटे विसरून केलेली पळापळी……..धावाधाव………….आणि सरतेशेवटी हाती पडणारा मोजका पगार. कितीही काम केलं तरी तेवढाच आणि नाही केलं तरी तेवढाच. या सगळ्या चक्रव्यहुत फसलेला. त्या सगळ्यात स्वतःला झोकून देणारा. मूल्यमापन कसलं ते नाहीच. मी आपला नुसता कमांडरच्या सांगण्यानुसार सीमेवर छातीवर गोळ्या झेलणाऱ्या सैनिकासारखा छातीवर गोळ्या झेलत राहिलो. मेडल्स इतरांच्याच पदरी पडले.

पण हे सारं खूप आनंदानं सोसलं. कंपनीच्या भरभराटीस आपला हातभार लागतो आहे यात आनंद मनात राहिलो. कंपनीच्या भराभराटीबरोबर कधीतरी आपलीही भरभराट होईल असा आशावाद बाळगत राहिलो. आणि जवळ जवळ अठरा वर्षांनतर कर्णानं आपली कवच कुंडलं कृष्णाच्या स्वाधीन करावीत इतक्या सहजतेन राजीनामा देऊन बाहेर पडलो.असाही मी

एक नवी वाट पत्करली. शेतीची. जिथं माझ्या कष्टाचं मोल ठरवणं केवळ ईश्वराच्या आणि निसर्गाच्या हाती आहे. इथं गरज आहे ती फक्त कष्टाची. लाळघोटेपणाची किंवा हुजरेगिरीची नाही. मी श्रमालाच ईश्वर मानतो. त्यामुळेच मी कष्टाला कधीच घाबरत नाही.

मी नौकरीला कंटाळून शेती करायचा निर्णय घेतला असं कुणी समजत असेल ते मात्र साफ चुकीचं आहे. वडील असे अकाली निघून गेले नसते तर मला शेतीकडे पहायची गरजच पडली नसती. वडीलांपाठी निराधार झालेल्या शेतीकडे खरंतर मीही दुर्लक्ष करू शकलो असतो. मारून मुटकून हुजरेगिरी करत राहिलो असतो. शहरातला एषआराम उपभोगत राहिलो असतो. पण गेली वीसहून अधिक वर्ष पडीक असलेली आमची शेती माझ्या वडिलांनी गेल्या पाच सहा वर्षात खूप मेहनतीनं उभी केली होती. वडीलांपाठी ती पुन्हा ओस पडली असती तर निवृत्तीनंतर शहरातल्या तमाम सुखांना लाथ मारून गावाकडे जाऊन वडिलांनी जे कष्ट घेतले होते त्या कष्टाची माती झाली असती. आणि मला ते होऊ द्यायचं नव्हतं.

नव्या वाटेवर पाऊल टाकलं. माझी शेती मीच बघू लागलो. सुरवातीला हाताखाली कुणीच नाही. एकटाच. अंधाराचं……काट्याकुट्याचं…….चोराचिलटाचं….इचू काट्याचं कसलंही भय न बाळगता. रात्री अपरात्री कासराभर उजेड फेकणारी विजेरी घेवून शेतात जायचो. आभाळातल चांदणं पहात भर शेतात मातीत अंग टाकून द्यायचो. कुठूनतरी साप येईल …….विंचू येईल असं कसलंच भय वाटायचं नाही.

दोन तीन महिने गेले. आणि दोन वाघ माझ्या सोबतीला आले. देविदास सोनावणे आणि भगवान तांबे. आता हे चार हात माझ्या मदतीला आहेत. अधिकाधिक भार तेच उचलतात. मला फारसं कष्ट पडू देत नाहीत. आणि मीही ठरवून टाकलंय कि त्यांनी माझ्या मातीत गाळलेल्या घामाचं सोनंच करायच. त्यांच्या नशिबी जरी कष्ट आले असतील तरी त्यांच्या मुलांच्या ओंजळीत शिक्षण भरायच.

काय होईल ते काळच सांगेल. पण हे दोघे माझ्या मदतीला येण्याआधी एक दिवस सकाळी सकाळी मीच माझी छबी टिपली. आणि तेव्हाच हि पोस्ट जन्माला आली