हीच का आमची लोकशाही ?

( कुणाला बदनाम करणं हा हेतू नाही या सगळ्याचा. पण यातला व्हीडीओ आणि त्यातल्या स्ट्रिपलाईन हा पुरावा आहे.)

यावेळी खऱ्या अर्थानं माझा राजकारणाशी संबंध आला. मागच्या दोन्हीवेळी मी किनाऱ्यावरचा प्रवासी होतो. म्हणजे प्रवाहात झोकून द्यायची इच्छा नव्हती असं नाही. पण नौकरीच्या पाशात अडकलेलो होतो. त्यातही आणखी प्रोडक्शन म्यानेजर. म्हणजे घाण्याटला बैल म्हणा किंवा घाण्यातले शेंगदाणे म्हणा. सुटका नाही. पण यावेळी ते जू  ( बैलगाडीला किंवा नांगराला जुंपताना बैलाच्या खांद्यावत असता ते.) आधीच झुगारून दिला होतं. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या २०१२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत माझी बहिणीला नगरसेवक या पदासाठी शिवसेनेची उमेदवारी मिळाली होती. आणि मला प्रचार मोहिमेसाठी पुरसा वेळ देता आला.

खरंतर निवडणुकीच्या आधी चारसहा महिन्यांपासून या प्रकाराकडं मी लक्ष ठेवून होतो. हे मी केवळ आमच्या मतदार संघापुरतं बोलत नाही. सगळ्याच मतदार संघात दिवाळीपासून मतदारांच्या घरी पोहचणारे मिठीचे पुडे आणि भेटवस्तू पहाता होतो. वर्तमान पत्रातूनही त्याविषयी खूप काही लिहून येत होतं. पण निवडणुकीच्या आधी महिनाभर मी आमच्या प्रभागात पोहचलो आणि मला फार जवळून सारं काही पहाता आलं.

उमेदवारांनी पैशाची मस्ती चढलेली असते असते आणि गरीब मतदारांना एका मतासाठी मिळणाऱ्या हजार दोनहजार रुपयांचं व्यसन लागलेला असतं. हा पैसे घेवून मत देणारा मतदार आता एवढा धाडसी झालाय कि तो प्रत्येक उमेदवारांकडून मतागनिक मिळणारे पैसे तो घेतोच पण समजा एखाद्या निवडून येण्याची दाट शक्यता असलेल्या एखाद्या उमेदवाराकडून त्याला पैसे मिळाले नाहीत तर तो त्या उमेदवाराला सरळ सरळ पैसे मागायलाही कमी करत नाही. अगदी मीसुद्धा यातून गेलो आहे. पण पैशापुढे आमची अक्कल चालू शकणार नव्हती. आम्ही हतबल असायचो. मग मी उपदेशाचे चारसहा डोस पाजून त्या गृहस्थांचं मन वळविण्याचा प्रयत्न करायचो.

आमच्या प्रभागात गेल्यावेळी नगरसेविका असलेल्या महिला उमेदवाराची एक हस्तक पैसे वाटताना पकडली गेली. त्या हस्तक बाईन मला अमक्या अमक्या उमेदवाराच्या नवऱ्यानं पैसे आणून दिल्याचं सांगितलं. पोलीस आले. पंचनामा झाला. दोषींना अटक झाली. टिव्ही वर बातमी झळकली. सगळ्याच प्रमुख वर्तमानपत्रांनीही या बातमीला स्थान दिलं. पण फरक काय पडला. ती उमेदवार उजळ माथ्यानं हिंडत होती. इतकाच काय तर दोन हजारांपेक्षा अधिक मतदान घेवून ती तीन क्रमांकावर राहिली. आणि दोन आणि तीन या क्रमांकावरील उमेदवारांच्या मतात फरक फोटा तो केवळ १५ मतांचा. म्हणजेच एवढा घडूनही तला मतदारांनी नाकारला असं म्हणता येणार नाही.

आणखी एका ठिकाणी तर तमाशातल्या फडात नाचणाऱ्या ललनेवर मिशीला पीळ मारत दोघांनी पैसे उध्ळवेत तसे एकाच मतदारावर त्या प्रभागातील दोन उमेदवारांनी पैसे उधळल्याची बातमी वर्तमान पत्रातून झळकली होती.

उमेदवारी हवी असणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी पार्श्वभूमी असू नये असा संकेत आहे. पण ऐन निवडणुकीच्या काळात गुंडगिरीने वागणाऱ्या आणि दडपशाहीच्या मार्गाचा अवलंब करणाऱ्या उमेस्वरांना कोण शासन करणार.

हे दोन्ही प्रकार माझ्या अवतीभोवती घडलेले. सहाजिकच मी एक निनावी अर्ज लिहिला. त्यात आमच्या विरोधातील उमेदवाराने पैसे वाटल्याच्या आणि आणखी एका प्रभागातील दोन उमेदवारांमध्ये झालेल्या हाणामारीच्या घटनेचा उल्लेख केला आणि सदर अर्ज घेवून आमच्या महानगर पालिकेच्या निवडणूक आयुक्तांना भेटलो. आणि या दोन्ही ठिकाणच्या या दोषी उमेदवारांवर निवडणूक आयोगाने कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. पण कसलं काय ! या संदर्भात कसलीही कारवाई करण्यात त्या अधिकाऱ्यानं असमर्थता दाखवली. प्रत्यक्ष गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. तसा आम्हाला अधिकार नाही. हवा असेल तर तुम्ही मुंबईला जा.

हा पैशांचा पाऊस फक्त महानगरपालिकांच्या निवडणुकीतच पडला असं नव्हे काही. जिल्हा परिषदांच्या आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीतही हेच घडलंय. या प्रचारादरम्यान दोन दिवसांसाठी गावी गेलो. तेव्हा चुलत बहिण तिचं दुख सांगत होती. ‘ आरं बघणा इज्या त्या बाप्प्यान XXXदादाकडून अडीच लाख रुपये आणल्यात वाटायला आणि मला दिल्यात नुसतं हजार रुपय. आता माझ्यासारख्या शेळ्या मेंढ्या मागं फिरणाऱ्या बाईला जरा जास्त दिवू न्हाईत व्हाय. आमच्याकड काय जमीन जुमला हाय का ….आमचा ऊस जाणार हाय ? ”

आता सांगा कसं हिला लोकशाही म्हणायचं.

इंदिराबाईंनी भले तीस वर्षापूर्वीच ‘ गरिबी हटाव ‘ अशी घोषणा केली होती. पण आजतागायत गरिबी हटली नाही. आणि ती हटावी, समाज शहाणा व्हावा अशी कुणाचीच इच्छा नाही. कॉंग्रेस, राष्ट्रवादीची तर मुळीच नाही. कारण भुकेकंगाल शहरवासी आणि दरिद्री शेतकरी हीच त्यांची बलस्थानं आहेत. हेच आहे त्यांचं गठ्ठा मतदान.

Advertisements

मुसक्या बांधायची वेळ आली आहे

किती दिवस खदखदतंय हे सारं माझ्या मनात. खूप चीडचीड होते. अगदी भ्रष्टाचाराच्या विरोधातलं रामदेव बाबांचं आंदोलन उधळलं गेलं तेव्हापासून खूप चडफड होतेय मनाची. वाटत आपण सारे खरंच षंढ आहोत.  सारं गुमान सहन करणारे सत्तेच्या हातातले बाहुले आहोत. जात्याचा खुंटा त्यांच्या हातात आम्ही भरडले जाणारे दाणे.

आणि वर हे अकलेचे तारे तोडणारे कपिल सिब्बल, दिग्विजय सिंग. राजकारणाचा माज सत्ताधाऱ्यांच्या अंगात किती मुरलाय हे क्षणा क्षणाला प्रत्येक पावलाला दिसतंय. हि मंडळी बाह्या सरसावून आणणांवर आणि रामदेव बाबांवर चिखल फेक करीत होती. आणि आम्ही काही करू शकत नव्हतो. करू शकत नव्हतो म्हणण्यापेक्षा करत नव्हतो. पण आता पुरे किती दिवस आपण अशी बघ्याची भूमिका घेणार. हे एक नाही दहा हाताना देशाला लुटणार. शिवाय यांचे हात अदृश्य. नाट्य गोताय्गोत्यांच्या रुपातले. घोटाळ्यांचे यातले बहुतेक आकडे कोटीत. कधी कधी मला वाटतं रावणांना दहा तोंडांनी जेवढं विध्वंस केला नसेल तेवढा विध्वंस हि मंडळी करताहेत.

खरंतर आपण प्रत्येकानेच रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. पण आपण पडलो पोटार्थी. आमच्यातुनच जन्माला आले होते सावरकर, आमच्यातूनच गरजले होते लोकमान्य टिळक, आमच्यातलेच भगतसिंग …राजगुरू….सुखदेव गेले होते फासावर या साऱ्यांचा आम्हाला विसर पडलाय.

politic, राजकारण

नाग आणि गारोडी

आम्ही मतदार आहोत. आम्हीच निवडून देतो हे लोकप्रतिनिधी. पण आम्हाला आमचा तो हक्कही नीट बजावता येत नाही. गोर गरीब मतदान करतात. त्यांची मतं विकत घेतली जातात. पण सुशिक्षित म्हणवणारे आमचा अधिकारही विसरून जातो. पण आता आम्ही असं हात बांधून चालणार नाही. जागं व्हायला हवं. मुसक्या बांधायला हव्यात. आमचे पूर्वज परकीयान विरुद्ध लढले. पण अमेरिकेचा स्वतंत्र लढा घ्या. फ्रेंचची राज्य क्रांती घ्या. तिथल्या जनतेचे हे उठाव स्वकियांविरूद्धच होते. आता आम्हालाही जागं व्हायला हवं. मुसक्या बांधायला हव्यात.

मी एम.एफ. हुसेन ????

श्री विष्णूंचा नवा अवतार

या माझ्या पोस्टवर –

सुहास या आपल्या ब्लॉगर मित्राची अत्यंत जहाल प्रतिक्रिया आलीय. ती अशी –
” जर आपण अस करायला लागलो तर, एम.एफ. हुसेन आणि आपल्यात फरक तो काय. देवी-देवतांची    अशी विटंबना कधीच सहन नाही करू शकत. आदर व्यक्त करण्याची ही पद्धत साफ चुकीची आहे…”

त्यांचा आणि इतर तमाम रसिक वाचकांच्या मनातला गैरसमज दूर व्हावा म्हणून हे लेखन.

आपण सामान्य माणसं भलतीच पापभिरू आहोत.

पण आपण सारेच ईश्वराचे अंश आहोत, हे तर मान्य आहे तुम्हाला आणि परमेश्वराला जेव्हा जेव्हा अवतार धारण करून या पृथ्वीतलावर प्रकट व्हावसं वाटलं तेव्हा त्यानं मानवी देहाचाच आधार घेतला आहे. त्याच्या अनेक लीला या मानवी जीवनाशी साधर्म्य सांगणारयाच आहेत. श्रीरामांच्या आणि श्रीकृष्णाच्या कितीतरी बाललीलांची उदाहरण आपल्या साऱ्यांनाच चांगलीच परिचित आहेत.

ते कुठले तरी बेंगलोरचे सत्य साईबाबा काय आणि त्या कुठल्या तरी किती तरी अम्मा भगवान काय ? आज या साऱ्यांना ईश्वरी अवतार मानून त्यांच्या मागे धावणारा किती तरी मोठा अंधश्रद्धाळू वर्ग आपल्या सगळ्यांनाच चांगलाच परिचयाचा आहे.

मी अल्ला मानतो आणि ईश्वरही मानतो पण त्याचं भर मैदानात असं अवडंबर मला मान्य नाही. म्हणून तर मी, ” आमच्याही खेळाडूंना ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव आहे. शतक केलं किंवा बळी मिळाला कि तेही आभाळाकड पाहून त्या नियतीच्या विधात्याची मनोमन करुणा भाकतात.” असं लिहिलंय.

मित्रहो सुहासनं, असं म्हणलंय कि, ” एम.एफ. हुसेन आणि आपल्यात फरक तो काय. देवी-देवतांची अशी विटंबना कधीच सहन नाही करू शकत.”

मला एक कळलं नाही कि सुहासनं मला एम.एफ. हुसेनच्या पंगतीत नेवून बसवावं असं मी काय केलंय ?  श्री विष्णूंच्या शेषधारी अवताराची विटंबना होईल असं माझ्याकडून काय घडलंय ?

चला सुहासजी, एम.एफ. हुसेनच्या विरोधात उठाव करायला येताय माझ्यासोबत ?

त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे आज आमचंच लोकशाही सरकार आम्हाला पदोपदी लुटंतय. टोल नाही असा रस्ता या देशात नाही. पहा –

तेरीभी चूप, मेरीभी चूप

त्या विरुद्ध आवाज उठवण्याची आणि लढा देण्याची गरज आहे. काय करतोय आपण ?

आपण पुन्हा मूळ मुद्द्याकडे वाळूत.

कलकत्यात गांगुलीचं मंदिर बंधू इच्छिणारे आहेतच ना ? अमिताभला ईश्वर मानणारे काय कमी आहेत? सचिनला ईश्वरतुल्य समजणारे काय कमी आहेत ? मला स्वतःला सचिन विषयी नितांत आदर आहे.

इतकंच काय मी स्वतःही काही माणसात परमेश्वर पहात असतो. या माणसांच्याच पाठबळामुळं मी काही वेळा यशाचं पावूल उचलतो असं मला वाटत. शक्य झालं तर या माणसांना मीही असाच एखादा ईश्वराचा चेहरा देवू इच्छितो. पण मला तशी गरज वाटत नाही. माझी श्रद्धा माझ्या मनात.

श्री विष्णूंचा नवा अवतार

या लिखाणात कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. आणि स्वतःच ईश्वरा नितांत श्रद्धा असणारा एक पामर आहे. देवी-देवतांची विटंबना माझ्याकडून तरी शक्य नाही.