एक होता पाऊस

पाऊस कुणाला आवडत नाही. तरुणाईला तर तो  आवडतोच आवडतो…………….पण छोट्यांनाही आवडतो…………..संध्याकाळच्या सावल्या खुणावत असताना मोठ्यांना हि तो हवासा वाटतो. कारण पाऊस असतोच तसा हवा हवासा. पण या कवितेतला छोट्या मात्र त्या पावसाशी चक्क लपाछपी खेळतोय. मागे मी ‘ एक होतं वांग ‘ हि कविता लिहिली होती. या कवितेतला पाऊसही तसाच Continue reading

Advertisements

ती खरंच पावसासारखी.

ती म्हणजे खरंच पावसासारखी.

ती म्हणजे  खरंच पावसासारखी
थेंबा थेंबाने  येते आणि आपल्याला व्यापून टाकते.
वरून दिसतो आपण कोरडेच

पण ती आपलं मनही ओलेचिंब करून जाते.


आपण पहात रहातो खिडकीतून रिमझिमणारा पाऊस पाणी,
पण तो पाऊस नसतोच मुळी त्या असतात तिच्या आठवणी.
आपल्याही नकळत आपण खिडकीतून हात बाहेर काढतो
आणि तिला तळहातावर घेतो. पुन्हा पावसात हरवून जातो.

तळहातावर ती, बाहेरही ती, आपणही स्वतःला झोकून देतो 
आपल्याही नकळत खिडकीतून बाहेर जातो.
ती रिमझिमणारी सर, आपण मुसळधार पाऊस होतो.
तिच्यासह अवताल भवताल सारं सारं कवेत घेतो.

पाऊस

पाऊस

हिरवी राने, हिरवी पाने, हिरव्या वेली, हिरवी मने
हिरव्या हिरव्या हिरवाईतून टपटपणारी दोन जणे
कोणती ती आणि कोणता मी, ओळखत नाही आता कोणी
आई म्हणते, ” काय रे घरात आले कोठून पाणी ?”

दचकून तेव्हा मी माझ्या पायाशी पहातो 
पाणी नसतेच तिथे मग भांबावून जातो
माझ्या चेहऱ्यावर उमटलेल्या तिला आई पहात रहाते
कुठल्यातरी कौतुकानं माझ्या हाती चहा देते.

खिडकीमधून रिम झिमणाऱ्या पुन्हा तिला पहात रहातो
चहावरची वाफ होतो खुशाल तिच्या कवेत जातो.

सॉरी ! माफ करा !! बक्ष दो !!!

सॉरी !
माफ करा !!
बक्ष दो !!!
रहेम करो !!!!
हे सारं एवढ्यासाठी काल सगळंच चुकलं.

पाऊस हा माझा सर्वात आवडता ऋतू . आणि या पावसाळ्यातला पाहिल्याचं पाऊस काल असा काही अनुभवला कि त्याचं स्वागत एका  छानशा पोस्टनं करावसं वाटलं.

” जशी तुझी आठवण
        तसा पाऊस अनावर “

या ओळी मनात आकार घेत होत्या. बाहेर पाउस पडत होता. वीज गेली होती……अंधारात शब्द नीट जुळत नव्हते. वीज आली. ती कधी ही जाईल अशी भीती वाट होती. म्हणून ‘ तुझ्यापेक्षा पाऊसच बरा वाटतो ‘ ही माझी जुनीच पोस्ट पुन्हा नव्यानं. नाही तरी ही पोस्ट अगदी सुरवातीच्या काळात लिहिली होती. त्यावेळी पाच पाच-पन्नासही वाचक नव्हते माझ्या पोस्टचे. पण सगळाच मुसळ केरात. पोस्ट लिहित असतानाच वीज गेली. त्या सगळ्या धावपळीत मी मी अर्धवट लिखाण कधी पोस्ट केला हेही कळलं नाही. त्या पोस्टमध्ये टाकायची राहिलेली कविता आज पुन्हा टाकलीय. त्यामुळे ती पोस्ट नव्यानं पहायला हरकत नाही.
पण माझे रसिक वाचक जागरूक आहेत त्याची ही पावती.

सुवर्णाची आज रोख ठोक प्रतिक्रिया आली.

ती अशी –  ‘ तेच ते परत का.. नवीन नाही सुचत. ‘

तिनं तिचं म्हणणं मांडलं. इतर रसिकांनाही असंच काहीसं म्हनायचं असावं. फक्त ते बोलले नाहीत. कुणी बोललं तरंच माफी मागावी असं थोडंच आहे.

माफ कराल ना ?

एक होता पाऊस

तुमची शाळा सुरु झालीय. अभ्यास मागे लागलाय. चाचणी परीक्षा जवळ आलीय. या सार्याची मला जाणीव आहे. म्हणूनच अलीकडे तुमच्या साठी लिहाना थोडा कमी केल्या. पण बंद नाही हा केल्या. आणि तुमच्यासाठी लिहिणं मी बंद तरी कसा करू शकेन. मलाच मुळात तुम्हाला भेटल्या शिवाय करमत नाही.
एका गोष्टीचा मात्र मला फ्हार फ्हार वाईट वाटत. मी तुमच्यासाठी अगदी मनापासून लिहायचा प्रयत्न करतोय पण तुमच्या प्रतिक्रिया मात्र मला वाचायला मिळत नाहीत. त्यामुळं सहाजिकच तुम्हाला माझा ब्लोग किती आवडतोय ते कळत नाही.
आता पावसाला सुरु झालाय. पाऊस येतो. आपल्याला चिंब करतो. मातीला भिजवतो. काय जादू असते या पावसात काही कळत नाही. पण मातीला हिरवा रंग चढतो. पक्षांचे मंजुळ आवाज येवू लागतात. दूर दूर डोंगराच्या कुशीत फिरून यावंसं वाटतं.
तुम्ही परवा माझ्या ‘ एक होतं वांग ’ या कवितेतल्या वांग्याची गंमत वाचली असेल. तसाच हा पाऊसही.
तुम्ही लपाछपी खेळताना तुमच्या मित्रांसोबत. तसाच हा पाऊसही त्याच्या तुमच्या सारख्याच काही मित्रांसोबत लपाछपी खेळतोय. लपाछपी खेळता ल्ख्र्लता तो लपायला  चक्क डोंराच्या पलीकडे गेलाय. आणि डोंगराआड लपून बसलाय.
मग तुमचा मित्र त्याला शोधत डोंगराच्या पलीकडे गेला. त्यांना पावसाला एक जोरदार धप्प दिला. आणि मग काय गंमत झाली ती पहा या कवितेत –

एक होता पाऊस
त्याला बरसण्याची हौस
रिमझिमत याचा
मला कुशीत घ्यायचा.

लपाछपी खेळताना
डोंगराआड लपायचा
वीज होवून डोंगरा आडून 
मला लपून पहायचा

मी त्याला शोधत मग
डोंगरदरयात जायचो
त्याच्या हळूच जावून
जोरात धप्पा  दयायचो
मग तो पुन्हा एकदा
सर होवून यायचा    
गोड गोड गार गर
खिसा भरून दयायचा
 
मी मग त्याला एक 
गोड पापा दयायचो  
त्याचा हातात हात घालून
खुशाल पाऊस व्हायचो

मातृदिन. ९ मे

“चला चला चला. खेळत काय बसलात ? इकडे या सगळे.”
“काय म्हणालात. आम्हाला आमचा खेळ सोडून एवढ्या तातडीने का बोलावलत ?”
“सांगतो. सांगतो. आज काय आहे माहिती आहे का तुम्हाला ?”
” नाही ना ? सहाजिकच आहे. लहान आहात तुम्ही अजून. पण तरही हे तुम्हाला माहिती असलंच पाहिजे. कारण तो एक आपल्या संस्काराचा भाग आहे. म्हणून तर तुम्हाला एवढ्या तातडीने बोलावलंय.”
“हं ! तर मुलानो आज आहे मातृदिन. ९ मे . लक्षात ठेवाल ना यापुढे ! “
काय म्हणालात ? मातृदिन म्हणजे काय असतं ?”
मुलांनो. मातृदिन म्हणजे आईची थोरवी गाण्याचा दिवस. आईच्या मोठेपणाच स्मरण करण्याचा दिवस. आई आपल्यासाठी राबते. झिजते. हाडाची काड करते. पण आपण कधी तिचे आभार सुद्धा मानत नाही. तिच्यावर कधी सुखाचे चार शब्द उधळत नाही. जगभरातल्या प्रत्येक मुलांना आपल्या आईविषयी कृतन्यता व्यक्त करावी म्हणून जगभरात आज हा दिवस साजरा केला
जातो. “
“म्हणजे काय करायच अक्कलराव ? असं अजिबात विचारू नका. “
“करायचं म्हणलं तर खूप काही करता
येण्यासारखं आहे. खूप काही करू नका. फक्त आज आईला त्रास द्यायचा नाही. म्हणजे इतर दिवशी द्यायचा असं नव्हे. पण आज मात्र तिला थोडाही त्रास द्यायचा नाही. तिच्याजवळ कुठलाही हट्ट करायचा नाही. तिनं सांगितलेलं प्रत्येक काम ऐकायचं आणि तिची गोड पापी घेवून तिचं असंच अखंड प्रेम लाभावं म्हणून देवाजवळ प्रार्थना करायची.”
“मुलांनो आईच्या वेदना, तिचे कष्ट, तिचं सोसणं, तिनं आपल्यासाठी केलेली धडपड यापैकी
कश्शा कश्शाची जाणीव नसते आपल्याला. या साऱ्याची जाणीव ठेवण्याचा हा दिवस.”
“आई जशी आपल्याला असते तशीच
पाखरांना असते……..वासरांना असते. वाघाच्या बछडयाला असते आणि गाढवाच्या गाधडयालाही असते.”
“आकाशातून आपल्या पिलांवर झडप घालणाऱ्या बलाढ्य घारीवर कोंबडीसारखा सामान्य जीव धावून जातो. कारण ती आई असते. बस्स ! एवढंच लक्षात ठेवा आणि यापुढे आईला त्रास देणं बंद करा .”
“कराल ना
एवढ ?”
“सगळेच हो म्हणाले. चला ! मला आजचा दिवस सार्थकी लागल्यासारखा वाटतो आहे. अरे पण असे पळताय कुठे सगळे ?”

“आईच्या कुशीत शिरायला ? ठीक आहे. ठीक आहे. चला मी हि निघालो माझ्या आईच्या कुशीत शिरायला.”


चित्र आणि खरेपणा

चित्र काढायला आवडतं ना तुम्हाला ?

                      व्वा ! चित्रं या  विषयाबरोबर काय सरसावून बसलात सगळेच . हे वरचं चित्रं कुणी काढलं असेल असं वाटतंय तुम्हाला ?
                     माहित नाही म्हणताय. सांगतो.
                     अक्कलरावांच्या शेजारी एक  जयुराणी राहते. हो ! हो ! तोच तो राजा. जयुराणी हे त्याचं लाडाच नाव. खरं नाव जयेश. तर चित्रकला हा त्याचा   खूप आवडता विषय. असं असला तरी पठ्ठ्या वर्षभरात कधीही चित्रकलेची वही आणि रंग हाती घ्यायचा नाही. वर्ष संपता संपता चित्रकलेचे शिक्षक  चित्रकलेची वही पूर्ण करायचा आग्रह  करायचे. जयुराणीला आलेलं टेन्शन. वार्षिक परीक्षा तोंडावर आलेली आणि अशात अभ्यास सोडून चित्रकलेची  वही पूर्ण करत कसं बसायचा ? बरं चित्रं तरी किती काढायची ! एक  दोन नव्हे…………… चक्कं वीसहून अधिक. चित्रांचे विषयसुद्धा असेच पेचात पाडणारे . रक्षाबंधन, बस थांबा, पावसाळ्यातील एक दिवस, स्वातंत्र्यदिन …………एकपेक्षा  दुसरा  कठीण .
                    जयुराणी गेली बाबांकडे. सारं काही बाबांना सांगितल आणि  म्हणाली, ” बाबा  मला  काही  चित्रं  काढून  द्या  ना .”
                    जयुराणीच्या बाबांनाही चित्रं काढायला आवडायचं. त्यांनी लगेच एक दोन दिवसात जयुराणीला काही चित्रं काढून दिली. त्यातलंच एक  ‘ पावसाळ्याच्या दिवसातलं चित्रं.’
                    झालं. चित्रकलेची वही पूर्ण झाली. जयुराणीनं ती त्याच्या शिक्षकांना दाखवली. आणि ‘ पावसाळ्याच्या दिवसातल ‘ ते चित्रं पाहताच सर  म्हणाले, “हे  चित्रं  तू  काढलस  ?”
                    “नाही  सर. हे चित्रं माझ्या बाबांनी काढलंय.” सरांनी  त्या  चित्राला दहा पैकी सात मार्क दिले .
                    जयुराणीनं घरी आल्यावर बाबांना हे सारं सांगितलं. खरं बोलल्याबद्दल बाबांनी जयुराणीला शाब्बासकी दिली. पण  जयुराणीसमोर  प्रश्नचिन्ह. त्याची शंका. त्यानं बाबांना विचारली, “ पण बाबा सरांनी तुम्ही एवढ छान काढलेल्या चित्राला सातच मार्क का दिले  ?”
                    “हे बघ बेटा. खरं तर सरांनी त्या चित्राला शून्याच मार्क द्यायला हवे होते. पण त्यांनी सात मार्क दिले ते चित्राला नव्हे तर तुझ्या खरेपणाला .” बाबांनी जयुराणीला समजावून सांगितलं.
                    “पण एक लक्षात ढेव, यापुढे असं कधीच करायचं नाही. तुझं काम तूच  करायचं .”

                     जयुराणीनं बाबांना पुन्हा असं न करण्याचं वचन दिलंय. आणि तुम्हीसुद्धा असं कधीच वागणार नाही याची मला खात्री आहे. चित्रं   काढायला जमत नसतील तर उन्हात खेळण्या ऐवजी थोडी चित्रं काढण्याचा सराव करा.