अंगणवाडी सेविकेंच्या मागण्या

anganwadiनिवडणुका जवळ आल्यात. त्यामुळे आपल्या मागण्या शासन दरबारी मांडण्याची आणि त्यांचा पाठपुरावा करण्याची हीच योग्य वेळ आहे याची जाणीव सर्वच संघटनांना असते. सहाजिकच शासनाला नाक मुठीत धरायला लावण्यासाठी सगळ्याच संघटना कंबर कसतात. पण Continue reading

Advertisements

रिझल्ट

काय मुलांनो, परवाची गोष्ट  वाचलीत ना ?

आवडली कि नाही ?
खूप खूप आवडली.
बहोत अच्छे !
हो पण तुमच्या निकालाचा काय ? Continue reading

अक्कलरावांच्या जागतिक दौऱ्याचा अहवाल


मला माहिती आहे माझ्यावर रागावलेले नाही. कारण तुम्ही तुमच्या खेळण्यात दंग होतात. कुणी आत्याकडे………कुणी मामाकडे…….कुणी काकाकडे असे वेगवेगळ्या गावी गेला होतात. तिथल्या पाहुणचारावर मस्त ताव मारत होतात. आत्याने, मामाने आणि काकांनी केलेल्या कौतुकात बुडून गेला होतात. मग कशाला तुम्हाला अक्कलरावांची आठवण होईल ? पण तुम्हाला माझी आठवण आली नाही म्हणून मला काही तुमचा राग नाही आला.       

उलट मला मात्र रोज तुमची आठवण होत होती. म्हणूनच मध्ये मी जगभर विमान प्रवास करण्यासाठी निघालो तेव्हा विमानात झालेल्या गंमती जंमती आणि एअर होस्टेस जवळ आम्ही व्यक्त केलेलं आमच्या जगभरच्या दौऱ्याच प्रयोजन आम्ही तुम्हाला विजयरावांच्या मार्फत मी तुम्हाला सांगितल. त्याच्या पुढची हि गंमत.

मुलांनो मी असं सारं जग फिरून आलो. पण आपल्या इथल्या मंत्रीमंडळांचे जागतिक दौरे जसे नेहमीच अयशस्वी ठरतात तसाच माझा जागतिक दौराही अयशस्वी ठरला.

मी जगभर फिरून आल्यानंतर माझ्या दौऱ्याचा एक अहवाल तयार केलाय. तो अहवाल पुढीलप्रमाणे –

” आपल्या इथले कावळे, ” काव – काव ” आणि चिमण्या, ” चिव – चिव ” याची जगाच्या दौर्यावर जाताना मी नोंद केली होती. आफ्रिकेत पोहोचल्यावर तिथल्या कावळ्यांच्या आणि चिमण्यांच्या आवाजाची नोंद करण्याचा मी प्रयत्न केला. पण तिथले कावळेही काव – कावच करतात आणि चिमण्याही चिव चिव करत त्यांना दाद देतात.   

मला वाटला होतं अमेरिकेतल्या कावळ्यांचा रंग आपल्या इथल्या कावळ्यांच्या तुलनेत असेल गोरा. अहो पण कसचं काय तिथल्या कावळ्यांपेक्षा आपल्या इथल्या कावळ्यांचाच रंग बरा.

खर तर मला जगभरच्या प्रवासात  ठिकठिकाणच्या  मिसळचा…….वडापावचा………इडलीसांबरचा……स्वाद चाखायचा होता. पण छे ! सारं जग फिरून आल्या नंतर मला कळलं हे सारं फक्त आपल्या भारतातच मिळतं. काही ठिकाणी मिळतही असं काही पण त्याला आपल्या इथल्या सारखी चटकदार चव नाही. सहाजिकच माझी खूप उपासमार झाली. त्यामुळेच यापुढे कोणत्याही कारणासाठी प्रदेश दौरा करायचा नाही असं मी ठरवून टाकलंय. “
तुमचा ………..

अक्कलराव 

मित्रांनो आणखी एक गोष्ट अक्कलरावांनी तुम्हाला सांगितलीच नाही. ती मी सांगतो. अंटार्तिकात गेल्यावर अक्कलरावांना तिथली बर्फाची गाडी खूप आवडली. साहजिकच त्यांनी विमान तिथच सोडून दिलं आणि तिथल्या  बर्फाच्या गाडीत बसून ते परतीच्या प्रवासाला निघाले. पण विषवृत्त ओलांडताना त्यांची बर्फाची गाडी वितळून गेली आणि अक्कलरावांना मजल दरमजल करत पुढचा प्रवास करावा लागला.

अन्यथा आज अक्कलराव आपल्या पुण्यातल्या रस्त्यातून बर्फाच्या गाडीत बसून फिरताना आपल्याला दिसले असते.                    
.तुमचा …………
छे ! मी माझं नाव तुम्हाला सांगणार नाही. मी तुम्हाला हि अक्कलरावांची फजिती सांगितली हे अक्कलरावांना कळाल तर ते माझ्यावर रागवतील ना !                           

अक्कलरावांचा विमानप्रवास

मित्रांनो,
अक्कलरावांच्या खूप गमती जमती तुम्हाला इथं पाहायला, वाचायला मिळतील. अक्कलरावांच्या धमाल गोष्टीही वाचता येतील. कारण स्वर्गातले नारदमुनी आणि भूतलावरचे अक्कलराव दोघांची कुंडली एकंच. दोघांनाही  कोणत्याही लोकी कधीही प्रवेश घेता येतो. अक्कलराव असे केव्हाही, कुठेही प्रवेश करू शकत असल्यामुळे ते केव्हाही कुठेही जातात आणि मजा करतात. ते स्वर्गात जातात, समुद्रात जातात, पऱ्यांच्या प्रदेशात जातात, राक्षसाच्या गुहेत शिरतात आणि धमाल करतात.
अगदी परवाचाच उदाहरण घ्या ना. तुम्हाला सुट्टी लागली म्हणून तुम्ही गावो गावी निघून घेलात. कुणी नुस्ते खेळण्यात रमले. सगळे विसरले अक्कलरावांना. साहजिकच अक्कलरावांनाही कंटाळा आला. मग तेही निघाले फिरायला. पण कुठे जायचं फिरायला ?

विचार करता करता अक्कलरावांनी चक्क जगभर फिरून यायचं ठरवलं. आता जगभर फिरायचं म्हणल्यावर बैलगाडीतून प्रवास करून थोडंच चालणार आहे. सहाजिकच अक्कलरावांनी विमानान प्रवास करायचं ठरवलं. मग अक्कलरावांनी पासपोर्ट काढला, व्हिसा काढला. आणि एक दिवस आपलं चंबू गबाळ घेवून पोहचले विमानतळावर.

थोड्याच वेळात त्यांचं विमान प्ल्याट फॉर्मला लागलं. रेल्वेच्या नाही काही विमानाच्या प्ल्याट फॉर्मला. हो बरोबर सांगितलत तुम्हीधावपट्टीम्हणतात त्या प्ल्याट फॉर्मला.

झालं अक्कल राव विमानात बसले. विमानाचं दार लागलं. सूऊऊउ करून विमान हवेत झेपावलं.
अक्कलराव त्यांच्या खुर्चीत रेलले. विमानाच्या खिडकीतून बाहेर डोकावून पाहू लागले. एवढ्यात एअर होस्टेस आली आणि मग काय काय गंमत झाली पहा बरं. अक्कलरावांना जगभर कशासाठी फिरायचं आहे तेही अक्कलराव एअर होस्टेसला सांगतात.ते ही फरा मजेशीर आहे. हे सारा वाचा या कवितेत

जग किती देखण


                खूप दिवस झालं नाही तुम्हाला भेटलो नाही. 
                   नाही, मी तुम्हाला विसरलो नव्हतो काही. खूप अडचणी होत्या. कायये माहिती आहे का ? जसं इथ मी तुमच्यासाठी लिहितो ना तसच दुसऱ्या एका ठिकाणी तुमच्या मोठ्ठ्या ताई आणि दादासाठी लिहितो. त्या ठिकाणी लिहिताना काही अडचणी आल्या होत्या. त्यातून मार्ग काढता काढता हे असं तुमच्या माझ्या भेटीमध्ये बारा पंधरा दिवसांचं अंतर पडलं. दहा दिवस गेले माझे त्या अडचणीतून मार्ग काढताना. मला मार्ग सापडला तेव्हा मी सुटकेचा श्वास घेतला. 
                  झालतं काय ! तुमच्यासाठी जशी मी काही चित्र टाकतोना इथं तशीच त्यांच्यासाठीही काही चित्र टाकतो. अचानक ती चित्र दिसायाचच बंद झालं होतं.

               हे सारं तुम्हाला सांगण्याचा कारण म्हणजे अडचण आली म्हणून कधी थांबू नये आपण हे तुम्हाला कळावं.
         बरं मग सुट्टी कशी चाललीय ? मजा करताय ना ? तुम्ही जसे फिरतंय ना गावोगाव तसेच अक्कलरावही गेलेत फिरायला. तेही इथं तिथं जवळपास नाही काही पार अगदी साता समुद्राच्या पल्याड. आणि गेलेत कसे माहिती आहे चक्क विमानात बसून. त्यांना असा जगभर फिरून काय काय करायचं होतं ते सांगिनच मी तुम्हाला लवकर. तुर्तास जग किती देखण आहे हे पहा तर खर –

 हे अफ्रिकेतल जंगल 

       आणि ही अफ्रिकेतली लिम्पापो नदी. तुम्हाला माहिती आहे लिम्पापो म्हणजे  पाण्यातली मगर. या नदिमधे आशा खुप मगरी आहेत म्हणून या नदीचा नाव लिम्पापो.  

 

                 
  
  हा कोण माहितीच आहे तुम्हाला ! पेग्विन


आपल्याकडे एक मोठ्ठ्या चौसोपी 
वाडयात एक मोठ्ठ खटल रहाताना 

तस हेपेग्विनच एक मोठ्ठ खटल                                                     तुमचा विश्वास बसेल जर मी तुम्हाला म्हणालो की ही हिरवाई अमेरिकेतली आहे तर 

  

ही हिरवाई सुद्धा अमेरिकेतलीच   

सूर्यास्त कुठलाही असो. आपल्या इथला, कोकणातला, कन्याकुमारीचा अथवा दक्षिण आफ्रिकेतल्या सहारा वाळवंटातला. दिसतो छानच.  

वाळवंट ! किती अगम्य ?

                                                      अशी चित्र काढणं आपल्या आवाक्यातल आहे ?                                                                                        

                 

                                                                    
 वाळूचा कागद ………वाळूचा ब्रश ……….असं चित्र पाहताना कोण होणार नाही वश !


                                        

” ताजमहाल ” ना शहाजहांचा ना मुमताजचा तो माणुस म्हणून माणसावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचा  


                                                     ” ताजमहाल ” आमच्या देशाची स्पंदनआईचं बाळ

      आईचं बाळ तुम्ही मोठे असता घरात. आणि तुमच्यानंतर घरात येतं एक छोटसं बाळ. गोरंगोरंपान, इवल्या इवल्या मुठी असणार, फुल उमलाव तसं खुदकन हसणारं.

          तुम्ही तुमचा अभ्यास, तुमचं खेळणं सारं सारं विसरून त्या बाळाशी खेळत राहता.
          खूप छान वाटतं नाही त्याच्या कापसासारख्या मऊ कायेला स्पर्श करताना. अशाच एका बाळाविषयी हि कविता

बाळ तुझं लाडोबा


             आपण आईच्या कुशीतून जन्म घेतो. हे नजरेत न मावणारं जग लुक लुक डोळ्यांनी पाहत राहतो. आई खूप खूप प्रेम करत असते आपल्यावर. तिच्या मांडीवर खेळायचं, तिच्या हातानं भरवून घ्यायचं, तिच्या कुशीत निजायचं, तिचं बोट धरून पाहिलं पाउल टाकायचं. पाटी नाही, पुस्तक नाही. शाळा नाही, खेळ नाही. सारखं आपलं तिच्या अवतीभवती भिरभिरत रहायचं. ती सुद्धा आपली आठवण आली कि मधेच वेळ काढणार. कधी येवून आपली पापी घेणार. कधी हळूच आपल्या गुबगुबीत गालाच्या पाकळ्या ओढणार. कधी कधी तिला आपल्यावर माया करायचं इतकं भरतं येत कि ती सारं काम आहे तसंच टाकून देते आणि पटकन येवून आपल्याला पदराखाली घेते. आपणही मग मजेत कृष्ण होवून ते अमृतपान करत राहतो.
                अशी दोन चार वर्ष सुखात जातात. कुणास ठावूक कुठून पण घरात पुन्हा एक छोटसं बाळ येतं. आपल्याहूनही छोटसं. गोरंगोरंपान, इवल्या इवल्या मुठी असणार, फुल उमलाव तसं खुदकन हसणारं. मस्त वाटत आपल्याला सुरवातीला. त्याच्याशी खेळताना, त्याची पापी घेताना, त्याच्याशी बोबडं बोलताना खूप खूप आनंद होतो. आपण त्याची मोठ्ठी ताई आहोत म्हणून अभिमानही वाटतो. 
                कधी कधी त्याचं काय बिनसतं कुणास ठावूक. खुदकन हसायचं सोडून ते मधेच सप्तसूर लावतं. मग आपण रागावतोही त्याला. ते आणखीनच गळा काढत.

                आपण त्याला असे रागावतो. आणि आई स्वयंपाक घरातून येवू धपक्कन पाठीत एक धपाटा ठेवून देते आपल्या. खरंतर खूप जोरात मारलेलं नसतं आईनं आपल्याला. पण तरी आपण सूर काढून रडायला लागतो. डोळे भरून येतात. आभाळासारखे बरसू लागतात. आपण असे कुण्णी कुण्णी नसल्यासारखे रडत असताना आई आपल्याला जवळही घेत नाही. उलट त्या इटुकल्या पिटुकल्यालाच पदराखाली घेते. झालं हिरोचा सूर लगेच बंद. आपण मात्र रडतोच आहोत कोपऱ्यात बसून.

                आईचं हे असं वागणं पाहून, ” आई मी मोठ्ठी झाले म्हणून माझं काही चुकलं का गं ? अगं छोट्या बाळाला जशी तुझ्या मायेची गरज आहे तशी मला सुद्धा तुझ्या मायेची खूप गरज असते गं. तेव्हा तू बाळाचे लाड कर पण कधी कधी माझेही थोडे लाड करत जा ना.” अशी आईला लाडी गोडी लावणारी हि मुलगी.