इंडियंस आर ग्रेट

हिदुस्तानात सम्राट अशोका पासून गौतम बुद्धांपर्यंत अनेक महात्मे होऊन गेले.

याच मातीत स्वात्यंत्र वीर सावरकर, आगरकर, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, यासारखे हुतात्मे जन्मले.

याच मातीत रंगली बाजीराव – मस्तानीची प्रेम कहाणी.

ताजमहालच्या रुपात याच मातीवर उभी राहिली प्रेमाची निशाणी.

सत्तेसाठी हपापलेल्या सत्ताधुंद राजकारण्यांनी या मातीची हि ओळख पुसून टाकायचा अगदी चंगच बांधलाय.

पण तरीही या मातीची ओळख सांगणारे या मातीत निपजतातच. खेळाच्या मैदानावर तर हे प्रकर्षानं जाणवत.

मला आठवणारं सुनील गावस्कर हे त्यातलं पाहिलं नाव. अंपायरनं बोटवर करायच्या आधी मैदानातून परत फिरणारं.

सचिन तेंडुलकर हे आणखी एक नाव कुणाच्याही स्लेजिंगला उत्तर न देणारं. शतकांमागून शतकं करणारं. शतकांच शतक करू पाहणार.

खरंतर या विश्वकपमध्ये सचिनच्या शतकांच शतक व्हायला हवं होतं.

पण आफ्रिदी शिंकला. म्हणाला,” आम्ही सचिनचं शंभरावं शतक होऊ देणार नाही.” आणि खरंच त्यानं सचिनचं शंभरावं शतक होऊ दिलं नाही आणि खाली मान घालून निघून गेला.

हे सारं लिहिण्याला एक कारण झालं.

आजची आय. पी. एल. ची. म्याच.

रॉयल चायलेंज बंगलोर विरुद्ध कोलकत्ता नाईट रायडर्सची.

जिंकायला धावा उरलेल्या २.

मैदानात खेळताहेत ख्रिस गेल आणि विराट कोहली. गेल ९८ धावांवर. फलंदाजी करत होता विराट मनाचा कोहली. एक दोन वेळा १ धाव काढायची संधी होती. पण विराटनं ते टाळलं. आख्खं षटक निर्धाव खेळून काढलं. त्यात एक दोनदा बाद होता होतही वाचला. मध्येच एक चेंडू वाईड पडला. गेलची शतकाची संधी हुकते कि काय म्हणून विराटला वाईटही वाटलं. समोरच्या गोलंदाजाला त्यानं नाक मुरडलं.

षटक संपलं. गेलला स्ट्राईक मिळाली. त्यांना चौकार मारला. शतक केलं. विराट खूष.

तेव्हा आठवलं ‘ कुठं सचिनचं शंभरावं शतक होऊ नये म्हणून बिब्बा घालणारा आफ्रिदी आणि कुठं गेलचं शतक व्हावं म्हणून विजयी फटक्याचा मोह आवरून एक आख्खं षटक निर्धाव खेळून काढणारा कोहली.’

म्हणूनच म्हणतोय. ‘ इंडियंस आर ग्रेट ‘

Advertisements

हा रडीचा डाव नाही

हो नाही करता करता भारतानं वर्ल्डकप जिंकला. नुसताच जिंकला नाही. दिमाखात जिंकला.
आपण पाकिस्तान विरुद्धची म्याच जिंकली तेव्हाच माझ्या मनात –

” जिंकणे हा धर्म अमुचा, हार आम्हा ठाव नाही
तुम्ही करा काही कितीही, हा रडीचा डाव नाही.”

या ओळी आकार घेवू लागल्या होत्या. हि सगळी कविता लिहित असताना एकीकडे अम्पायरनं बाद द्याच्या आधीच मैदानातून बाहेर जाणारा सचिन आठवत होता, आफ्रिदीचा अगदी झेपावत घेतलेला झेल आपण टप्पा पडण्यापूर्वी घेतला कि टप्पा पडल्यानंतर हे आपल्याला सांगता येणार नाही, हे अगदी निरागस बाळासारख सांगणारा नेहरा आठवत होता आणि दुसरीकडं मैदानातल्या अम्पायरनं बाद दिल्यानंतरही तिसरया अम्पायरच्या निर्णयाची वाट पहात मैदानात ताटकळत उभे रहाणारे इतर देशांचे कितीतरी खेळाडू मी पहात होतो. आणि या हिंदवी मातीच्या इमानीपणाची मला अधिक तीव्रतेन जाणीव होत होती.

अंतिम सामन्यात भारताचे दोन मोहरे झटपट बाद केल्यानंतर श्रीलंकन खेळाडूंनी केलेला जल्लोषही आठवतोय आणि गंभीर – धोनीची जोडी फुटेना तेव्हा केवळ यांच्यावर दबाव आणावा एवढ्याच हेतूने केलेले कितीतरी अपील आठवताहेत.

१९९६ साली उपांत्य सामन्यात विनोद कांबळी रडला. २०११ श्रीलंका रडल्यासारखी दिसली नाही पण मनोमन रडत होती.

बस्स. २०१५ च्या वर्ल्डकप साठी धोनीच्या संघाला मनःपूर्वक. शुभेच्छा.

होय मी आजच सांगतोय. २०१५ चा वर्ल्डकप आम्हीच जिंकणार आहोत.

२०११ च्या विजयानिमित्त सचिनसह भारतीय संघाला अर्पण.

श्री विष्णूंचा नवा अवतार

( हा फोटो पहायला विसरू नका )

पाकिस्तानी गोलंदाज रियाझनं भारतीय संघाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात पाचवा बळी घेतला आणि भारतीय मातीवर नाक घासलं. म्हणाला, ” बाई, तुझ्या पदरी पडलो आणि पुण्यवान झालो.”

खरंतर त्याला ” आई, तुझ्या पदरी पडलो आणि पुण्यवान झालो.” असं म्हणायचं असावं. पण पाकिस्तानी संस्कृतीत एवढी शिकवण कुठली ?

नंतर कळलं कि तो मनोमन नमाज पढून आल्लाची करून भाकत होता.

आम्ही एवढे कर्मठ नाही तेच बरे आहोत. आमच्याही खेळाडूंना ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव आहे. शतक केलं किंवा बळी मिळाला कि तेही आभाळाकड पाहून त्या नियतीच्या विधात्याची मनोमन करुणा भाकतात. पण हे असले नखरे. छ्या ! तुम्हाला सांगतो परमेश्वराच्या अस्तित्वावर विश्वास माझाही आहे. देवाच्या दारी गेल्यानंतर मीही त्याला खूप काही मागत असतो. हात जोडून त्या परमेश्वराला शरण जाताना मी त्याच्याशी काय बोलतो त्याविषयी नंतर लिहीन.

पण या रियाझच मात्र अतीच झालं होतं. मागे एकदा मी शोएब अख्तरलाही अशाच रीतीनं मैदानावर नमाज पढताना पाहिलं होतं  पण तेव्हा भगवान विष्णू थोडे धावपळीत होते.

पण आता………..आता मात्र भगवान विष्णूंना हे सहन झालं नाही आणि त्यांनी हिंदवी भूमीत नतमस्तक होत अल्लाची करून भाकणाऱ्या रियाझला चक्क दर्शन दिलं. तो हा विष्णूचा नवा अवतार.

जिंकणे हा धर्म अमुचा

पाकिस्तान सोबतची म्याच व्हायच्या आधी मी –

पैज लावताय ????

हा लेख लिहिला होता. आम्ही पाकिस्तानसोबतची म्याच लिलया जिंकली. पण तेव्हापासून माझ्या मनात –

” जिंकणे हा धर्म अमुचा, हार आम्हा ठाव नाही
तुम्ही करा काही कितीही, हा रडीचा डाव नाही.”

या ओळी आकाराला आल्या होत्या.

वर्ल्डकप सुरु व्हायच्या आधीपासून भारतीय संघ २८ वर्षांनतर पुन्हा इतिहास घडवणार आणि वर्ल्डकप खेचून आणणार असा मलाच काय पण तमाम भारतीयांना विश्वास होता. पण साखळी फेरीतली भारताची कामगिरी खूप ढिसाळ झाली आणि माझ्यासह अनेकांचा मनात शंकेची पाल चुकचुकली. देशविदेशातल्या तज्ञांनी आणि माजी खेळाडूंनी तर भारताला विजेतेपदाच्या स्पर्धेतून बादच करून टाकलं होतं.

पण वेस्ट इंडीज विरुद्धच्या विजयान भारतीय संघात नवचैतन्य निर्माण केलं आणि मग सतत तीन वेळा विश्वकप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला भारतीय संघान माती चारली आणि त्यानंतर परंपरागत शत्रू पाकिस्तानला मैदानातून हुसकून लावलं.

झालं. हा हा म्हणता फायनल आली. आणि समोर दहातोंडी रावणाचे वंशज.

पण श्रीरामाची परंपरा सांगणाऱ्या मातीला रावण काही नवीन नव्हता. आपला वध कधी आणि कसा झालं हे जसं रावणाला कळलं नाही तसंच श्रीलंकेच्या खेळाडूंनाही.

हे महायुद्ध सुरु व्हायच्या आधीपासून, ” आम्हाला सचिनसाठी वर्ल्डकप जिंकायचाय ” असं धोनीसह प्रत्येक खेळाडू म्हणत होता. आणि अंतिम सामन्यात सचिन लवकर बाद होवूनही आपल्या संघानं विश्वकप जिंकला आणि त्यांचे शब्द खरे करून दाखवले. प्रत्येक विजयात प्रत्येकाचाच वाट असतो. पण समजा या अंतिम सामन्यात सेहवाग शून्यावर बाद झालेला असताना सचिननं शतक झळकावत म्याच जिंकली असती तर इतर खेळाडूंना त्या विजयावर हवा तसा हक्क सांगता आला नसता.

पण २ बाद १९ या परिस्थितीतून सामना जिंकताना भारतीय संघातल्या प्रत्येक खेळाडूनं आम्हाला सचिन विषयी किती आदर आहे हेच दाखवून दिलं…….आणि त्याच बरोबर दाखवून दिली भारतीय संघातील एकजीवाची ताकद.

सचिन तू आणखी एक वर्ल्डकप खेळावास एवढ बळ परमेश्वरानं तुला द्यावं.

” जिंकणे हा धर्म अमुचा, हार आम्हा ठाव नाही
तुम्ही करा काही कितीही, हा रडीचा डाव नाही.”

ही कविता कशी पूर्ण झाली हे उद्या सांगेन.

धोनीच्या विजय रथाचे अश्व

( यातलं महाभारताच्या युद्धाचं चित्र नक्की पहा )

परवा भारतानं पाकिस्तानला आस्मान दाखवलं. अंतिम सामन्याला उपस्थित नाही राहिलं तरी चालेल पण भारत पाकिस्तान या दोन्ही संघातला झुंज पाहायला उपस्थित रहायलाच हवं असं खुद्द सोनिया गांधी आमचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांनाही वाटलं. पाकिस्तानचे गिलानीही या सामन्याला उपस्थित राहिले. सगळ्या देशाचा कारभार आपल्या शिरावर आहे याचाही या नेत्यांना विसर पडला.

या निमित्तानं किती विनोदांचा आणि चुटकूल्यांचा जन्म झाला त्याची तर गिनतीच नाही. कलाकारांची प्रतिभा कशी असते याचं एक फार सुंदर उदाहरण मला या वेळी दिसून आलं.

मला एक मेल आली होती. त्या मेलच नाव होतं. पाक – इंडो महाभारत.

आफ्रिदीचं विमान

मला माहिती आहे आज सगळेच नेट सोडून टिव्हीला डोळे लावून बसलेले असणार. मागे आपण दक्षिण आफ्रिकेत जेव्हा टेस्ट सिरीज जिंकली तेव्हा मी लिहिलेल्या –

जे हसतील…..

या लेखावर –

मनोहर या मित्रानं ‘ सातत्य म्हणजे काय रे भाऊ ? ‘ अशी झोंबणारी प्रतिक्रिया दिली होती. मी तेव्हा त्याला उत्तर दिलं नाही. पण एक वेळ अशी येते कि आपल्याला आपल्या श्वासातल सातत्य राखनही जमत नाही. तिथ एखादा फलंदाज जर लवकर बाद झाला तर त्याच्यात सातत्य नाही असं म्हणन कितपत योग्य आहे.

जाऊ देत. म्याच सुरु झालीय. तरीही मी लिहायला बसलोय ते वाद घालण्यासाठी नाही काही. आज भारतच जिंकणार हे मला सांगायचं म्हणून.

********************************************************************************

सकाळी एक विनोद वाचनात आला –

स्मिथ पॉनटिंगला म्हणाला, ” अरे चल ना लवकर. विमान चुकेल. “
यावर  पॉनटिंगला, ” अरे, थांब ना आफ्रिदी पण येतोय.”
खरंच अजूनही स्मिथ आणि पॉनटिंग विमानतळावरच थांबून आहेत.

********************************************************************************

चला मी उठतो. आपण जिंकणारी म्याच पहायची आहे.

भारतीय संघ दंडास पात्र

भारतीय संघाला दंड करायला हवा. तुम्हीही माझ्याशी मताशी सहमत व्हाल.

म्हणजे पहा हं !!! सुरवातीला भारतीय संघ सगळ्या संघाची शिकार करून वर्ल्डकप जिंकणार असं वाटत होतं. पण उपांत्यपूर्व फेरीत पोहचू कि नाही अशी शंका येऊ लागली होती.

सहाजिकच होतं ते. ‘ अरे, फलंदाजी मजबूत म्हणजे गोलंदाजांनी नुसत्या गोट्याच खेळायच्या का ? ‘ नुस्ते सचिन सेहवाग कुठपर्यंत किल्ला लढवणार. तरी नशीब जहीर हातभार लावतोय. पण त्याच्या एकट्याच्या जीवावर त्याच्या वाट्याच्या १० षटकांमध्ये समोरचा आख्खा संघ कसा बाद करता येणार. आणि म्हणूनच या विश्वचषकात आत्ता पर्यंत झालेल्या ७ सामन्यात आपण विंडीजचा संघ वगळता अन्य कोणत्याही संघाला पूर्णतः बाद करू शकलो नाही.

सहाजिकच भल्या भल्यांनी विजेतेपदाच्या यादीतून भारताचं नाव वगळून टाकलं होतं. पण मोठ्या दिमाखात उपांत्यपूर्व फेरी जिंकून भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहचला आणि तिथच चुकलं. सगळीकडे अहाकार माजला. मेनका गांधी पुढे सरसावल्या. हरणांची शिकार करून गजाआड जाऊन आलेला सलमानही फिल्मी अंदाजात पुढे आला. ‘ प्राणीप्रेमींनी ‘ तर दंडकारण्य यात्राच ( दांडी यात्रेच्या नामसाधर्म्यावरून ) काढायची ठरवलंय. सगळ्यांचा एकच सूर. ” भारतीय संघाला शिक्षा…………….व्हायलाच हवी.”
अरे सेमिफायनला गेले ते गेले. ते सेमिफायनला जायला हवेत असं सगळ्यांनाच वाटत होतं. पण त्यासाठी एखाद्या दुसऱ्या कांगारूची शिकार केली असती तर ठीक होतं ना. पण एक दोन नव्हे चक्क अकरा कांगारूंची शिकार करणं म्हणजे फारच झालं.

आता सांगा, ” भारतीय संघाला शिक्षा व्हायलाच हवी.” हे माझं म्हणणं पटतयना तुम्हाला ?
चला सांगा काय शिक्षा करायची भारतीय संघाला.

मी ठरवलंय आता भारतीय संघान वर्ल्डकप जिंकला तरच भारतीय संघाला अकरा कांगारूंची शिकार माफ.

मला माहिती आहे, तुम्ही म्हणणार वर्ल्डकप जिंको अथवा न जिंको पण उद्या पाकड्यांना आस्मान दाखवलं तरी भारतीय संघाला अकरा कांगारूंची शिकार माफ.

बरोबर ना.