प्रेम म्हणजे नेमकं काय ?

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे
प्रेम असतं
तुमचं आमचं साऱ्यांच
सेम असतं.

एवढ्या दिलखुलास शब्दात मंगेश पाडगावकरांनी प्रेमाची व्याख्या सांगितली. प्रेम आधी आलं मग प्रेमाची व्याख्या आली. कोट्यावधी वर्षापूर्वी कोणते जीव अस्तित्वात होते हेही संशोधक सांगू शकतील पण माणसाच्या मनात प्रेम भावनेचा उगम नेमकं कधी झाला हे सांगणं मात्र कुणालाही शक्य होणार नाही. आणि तरीही आपल्याला प्रेम म्हणजे काय हे नक्की समजलंय असं वाटत नाही.

निस्वार्थ असतं ते प्रेम………प्रेमला कसलाही मोह नसतो…………प्रेमाला कसलीही अपेक्षा नसते. अशा रीतीनं प्रेमाला शब्दांनी व्यापण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही प्रेम आपल्या ओंजळीत आलंय असं म्हणता येत नाही.

प्रेम असं करावं

प्रेमाहुनी जगी या

‘ प्रेम कसं करावं ? ‘

या आणि अशा कितीतरी पोस्टमधून मी हे सारं सांगण्याचा प्रयत्न केलाय. पण तरीही अजूनही काहीतरी सांगायचा राहिला आहे असं वाटत रहातं आणि मग मी पुन्हा लिहितो –

प्रेम म्हणजे खेळ नव्हे, प्रेम म्हणजे आग आहे
दोन जीवांच्या काळजाला, आलेली जग आहे.

आणि इथच चुकतं आपलं……आपण खूप प्रेम करतो एकमेकांवर……….वेळप्रसंगी एकमेकांसाठी जीव द्यायचीही तयारी ठेवतो………पण एकमेकांवर एवढा प्रेम करत असूनही आपल्या काळजाला जग आलेली नसते. आणि इथच सारं चुकतं.
खरच जेव्हा केव्हा दुसऱ्यावर प्रेम करताना आपल्या अंर्तमनाला जाग येईल तेव्हाच ” प्रेम हा ईश्वराने आळवलेला राग आहे ” या विधानाची प्रचीती आपल्याला येईल.

 

13 Comments

Leave a comment