तमोहराच भेट देईन

संजय पवार हे धनकवडी – बिबवेवाडी भागातील एक नामांकित LIC प्रतिनिधी. त्यांचं स्वतः चं ऐसपैस ऑफिस आहे. दहा वीस तरुणांना रोजगार पुरवतात. त्यांनी तमोहरा कादंबरीच्या १० प्रती बुक केल्या होत्या. ते म्हणाले, ” मी माझ्या विमा धारकांना दरवर्षी डायरी देत असतो. यावर्षी डायरी हवी की कादंबरी असा पर्याय त्यांच्यासमोर ठेवणार आहे. आणि ग्राहकांनी कादंबरीला पसंती दिली तर मी तुमच्याकडून आणखी पुस्तके मागवून घेईन.” त्यांना त्यांच्या दहा प्रती हस्तांतरीत करताना तमोहराची एक प्रातिनिधिक प्रत घेऊन काढलेले हे छायाचित्र.

सामाजिक भान असलेल्या संजय पवार यांची प्रत्येकाने भेट घ्यायलाच हवी. हे गृहस्थ अत्यंत कार्यतत्पर आहेत. तुम्ही त्यांना ९४२२३०६९०१ या क्रमांकांवर संपर्क साधू शकता. त्यांनी देखील कादंबरी एका बैठकीत वाचली. आणि खूप आवडल्याच कळवलं.

तमोहरा कादंबरी मागविण्यासाठी संपर्क : ९४२२३५६८२३

आम्ही साहित्यिक आम्ही कलावंत

मित्रहो,
नमस्कार.

मी विजय शेंडगे. आजवर ब्लॉगरवर रिमझिम पाऊस अर्थात लोकशाहीचा पहारेकरी, वर्डप्रेसवर रे घना या नावाने ब्लॉग लिहीत होतो. जवळ जवळ आठ दहा वर्ष मी अशा रितीने ब्लॉग लिहितो आहे. अनेकदा नियमित लिहिणे होत नाही. त्यामुळे ब्लॉगवरचा ऑडियन्स कमी होतो. परंतु आपण पब्लिक प्लॅटफॉर्मवर लिहिले तर नियमित लिहिलेच पाहिजे अशी गरज पडत नाही. तुम्ही कधीही पोस्ट लिहिली तरी तुमचा ऑडियन्स पोस्टवर येऊ शकतो. त्यामुळे मी आम्ही साहित्यिक आम्ही कलावंत या पब्लिक पोर्टलवर लिहिण्याचे ठरविले आहे.

आपणही या पब्लिक पोर्टलवर लिहावे असे मी आपणास सुचवेन.

सर्वात महत्वाचे म्हणजे हे पब्लिक पोर्टलवर भारतीय बनावटीचे आहे. webster developers या भारतीय कंपनीने हि वेबसाईट डेव्हलप केली आहे. लेखक, चित्रकार, शिल्पकार, वादक, गायक अशा सर्व कलावंतांसाठी हे मुक्त व्यासपीठ आहे. प्रत्येकजण आपल्या कविता, कथा, इतर लेखन, अनुभव इथे लिहू शकतील. आपले फोटो, व्हिडीओ पोस्ट करू शकतील.

सर्वात महत्वाचे म्हणजे यातील आर्ट मॉल या विभागात लेखकांची प्रकाशित पुस्तके, चित्रकारांची चित्रे, शिल्पकारांचं शिल्पकृती वा अन्य इतर प्रकारच्या कलाकृती इथे सेल साठी उपलब्ध करून देता येणार आहेत. त्याचप्रमाणे साईट व्हिजिट करणारे रसिक इथून त्यांना आवडणाऱ्या कलाकृती खरेदी करू शकणार आहे.

वारीचे वारकरी

आजच्या दैनिक प्रभातमधील माझा लेख. फोटोत मी, माझे बंधू आणि ज्ञानराज विद्याप्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संजय शेंडगे, उद्योजक आणि वारकरी राजेंद्र वाघ, माझी बहीण नगरसेविका आशा धायगुडे शेंडगे, आणि माझे धाकटे बंधू अविनाश शेंडगे.

अभिराज : एक अभिजात संगीतकार

कवी म्हटलं कि कुसुमाग्रज, मंगेश पाडगांवकर यांच्या पलीकडे फारशी नावं माहित नसतातआम्हाला. अपवाद असतील याला. पण माझं विधान सर्वसाधारण आहे. माझ्या सोसायटीतल्या ग्रँज्युएट झालेल्या एका मुलीला मी शिवाजी सावंत माहित आहे का विचारलं, तर Continue reading

इस्ट ऑर वेस्ट इंडिया इज द बेस्ट !!!!!!!!!!!!!

india

ठिकाणं आणि इतर काही विशेषणं यांच्यातील मजेशीर संबंध. एवढी विविधता फक्त भारतातच आढळते – Continue reading

एका दगडात चार पक्षी

sonia rahulलोकसभेच्या निवडणुका पार पडेपर्यंत माझ्याकडून राजकारणाशिवाय अन्य विषयांवर फारसं लिखाण होईल असं मला वाटत नाही. कारण Continue reading