आभाळाचं डोळं, तिच्याकडं लागलं

ती त्याला दिसते……डोळ्यांना डोळे भीडतात आणि एका अवचित क्षणी तो तिच्या आणि ती त्याच्या मनात भरते. पण हे कधी….कुठे……आणि कसं घडतं….. Continue reading

मैत्री : तीही गाढवाशी.

donkeyसुदंर मुलीच्या प्रेमात कुणीही पडतो. पण रंगानं काळ्या , दात पुढं आलेल्या मुलीकडे कुणी वळूनही पहात नाही. तिलाही प्रेमाची गरज असतेच ना ? पण असा साधा विचारही कधी आपल्या मनात येत नाही. का असं ?

एखाद्या छानछोकी खिसा खुळखुळनाऱ्या मुलाकडे मुली सहज ओढल्या जातात. पण अंगावर साधेसुधे कपडे असणाऱ्या सरळ मार्गी मुलाला मात्र त्या मुर्खात काढतात. त्या मुलालाही मन आहे भावना आहेत याची जाणीवही नसते मुलींना.  का असं ?

सुंदर मुलीच्या प्रेमात पडायला आणि श्रीमंत मुलांना भुरळ घालायला फार बुद्धी लागत नाही. त्यासाठी Continue reading

खरे मित्र

friendship

friendship

आपण जन्माला आल्यापासून तिरडीवर चढेपर्यंत किती माणसं येतात आपल्या आयुष्यात. चढेपर्यंत म्हणण्यापेक्षा चढवले जाईपर्यंत म्हणू. चढवले जाईपर्यंत तरी कशाला म्हणायचं. तेव्हा कुणाला कसलाही विरोध करण्याचं त्राण तर नसतच आपल्यात पण काहीच उरलेलं नसतं आपल्या हाती.
पण ……….

Continue reading

प्रेम म्हणजे नेमकं काय ?

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे
प्रेम असतं
तुमचं आमचं साऱ्यांच
सेम असतं.

एवढ्या दिलखुलास शब्दात मंगेश पाडगावकरांनी प्रेमाची व्याख्या सांगितली. प्रेम आधी आलं मग प्रेमाची व्याख्या आली. कोट्यावधी वर्षापूर्वी कोणते जीव अस्तित्वात होते हेही संशोधक सांगू शकतील पण माणसाच्या मनात प्रेम भावनेचा उगम नेमकं कधी झाला हे सांगणं मात्र कुणालाही शक्य होणार नाही. आणि तरीही आपल्याला प्रेम म्हणजे काय हे नक्की समजलंय असं वाटत नाही.

निस्वार्थ असतं ते प्रेम………प्रेमला कसलाही मोह नसतो…………प्रेमाला कसलीही अपेक्षा नसते. अशा रीतीनं प्रेमाला शब्दांनी व्यापण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही Continue reading

तुझ्या चेहऱ्यामध्ये

तो आणि ती. दोन वेगवेगळ्या कुशीतून जन्मलेले दोन जीव. खरंतर काय नातं असता त्यांचं ! पण तारुण्याच्या वळणावर ते दोन जीव एकत्र येतात………….एका अदृश्य नात्यांना बांधले जातात……….कळत नकळत एकजीव होतात. तो तिचा सर्वस्व. तर तिचा चेहरा म्हणजे त्याचं आभाळ. हे आभाळ त्याला नेहमीच हवा असता स्वच्छ………मोकळं………निरभ्र. Continue reading

प्रेमाहुनी जगी या

स्टार प्रवाहवर नवी सिरीयल येतेय. ” स्वप्नांच्या पलीकडले.”

त्या सिरियलची जाहिरात सध्या जोरात चालू आहे. ती म्हणते, ” माझ्या बाबांना ना मक्याचं कणीस फार आवडतं. ते ना त्या कणसंवाल्याला त्याच्या गाडीसकट विकत घेतील आणि बंगल्याच्या आवारात नेऊन उभं करतील.”

तो म्हणतो, ” ती उंच इमारत दिसतेय ना. असं वाटतं, त्या इमारतीवर जाऊन उभं रहावं आणि खालून जाणाऱ्या माणसांकडे मुंग्यांसारख पहावं.”

यावर ती म्हणते, ” काय भन्नाट विचार आहेत रे तुझे ! ”

यात Continue reading

असंही प्रेम

प्रेमाविषयी मी बऱ्याच पोस्ट लिहिल्यात आहेत. त्यात जसा अनेक प्रेम कवितांचा तसाच काही लेखांचाही समावेश आहे. माणसं एकमेकांवर प्रेम करतात. त्या प्रेमाला नात्यांच्या अनेक किनारी असतात. नातं जेवढं जवळचं तेवढी प्रेमाची दृढता अधिक. तू तुझ्या भावावर प्रेम कर असं कुठल्याही बहिणीला सांगावं लागत नाही. तसंच तुला बाळ झालंय आता तुला पान्हा फुटायला हवा असं कुठल्या आईला सांगावं लागत नाही. हे आपल्या फार जवळच माणूस आहे आणि याच्यावर आपण प्रेम करायला हवं, याला आपण जीव लावायला हे दोन वर्षाच्या जीवालाही कळतं.

आता माझ्या शेतात दोन गाडी त्यांच्या कुटुंबासह काम करत असतात. त्यातल्या देविदासची मुलगी अवघी तीन वर्षाची. आई वडील कामात असतात. तिचा छोटा दीड वर्षाचा भाऊ रडू लागतो तेव्हा ती चिमुरडी विठल विठल म्हणत टाळ्या वाजवून त्या छोट्याची आई होते. त्याला समजावून शांत करण्याचा प्रयत्न करते.

माझी बहिण तिच्या नऊवर्षाच्या मुलाला आणि चार वर्षाच्या मुलाला घरात बंद करून कुलूप लावून बाहेर जाते. बंद दाराआड तेच एकमेकांचे पाठीराखे होतात.  या    आई वडील घरात असताना एकमेकांच्या खोड्या काढत एकमेकांना रडवणारी ती दोघं बंद कुलपाआड मात्र एकमेकांवर प्रेमाची पखरण करतात.

दहावीच्या पुढे सरकू लागलेले माझे दोघे चिरंजीव. आम्ही घरात असलो कि एकमेकाच्या खोड्या काढताना आम्हाला घसे ताणायला लावतात. पण कधी एकमेकांना सोडून काही खात नाहीत. एका चोकलेट मधलं अर्धं का असेना पण दुसऱ्यासाठी ठेवणार.

इतक्या निरागस निष्पाप प्रेमाला ग्रहण लागतं……ओहोटी लागते ती वाढत्या वयात. आपले स्वार्थ जागे होतात तेव्हा………आपल्या विचारांना स्वतःच्या अस्तित्वाचे पंख फुटतात तेव्हा. मग आपल्याला वाटतं……

कुणी कुणाचं नसतं.

माणसं एकमेकांवर प्रेम करतात तसेच पशु पक्षी एकमेकांवर प्रेम करतात. एकमेकांचा सहवास त्यांनाही हवा असतो. एकोप्यान….कळप करून रहाण्याची गरज त्यानाही वाटत असते.

आपण काय किंवा पशु पक्षी काय सजीव आहोत म्हणून आपल्याला प्रेमाची जाणीव आहे. पण वनस्पतीही परस्परांवर प्रेम करतात किंवा प्रत असावेत असा विचार तरी आपल्या मनाला शिवतो काय ? पण माझा वनस्पतींच्या परस्परांवरील तसेच सजीवांवरील ( प्राणी आणि आपणही ) प्रेमावर विश्वास आहे. म्हणूनच मी माझ्या शेतातील पिकांशी बोलत असतो. दोन ठिकाणच्या उसांपैकी दुबळ्या असलेल्या उसाला गोंजारत असतो. पटकन उंच होण्याविषयी सांगत असतो.

वृक्षांना आपण पुल्लिंगी तर वेलींना स्त्रीलिंगी मानतो. आपल्या समाज व्यवस्थ्येने पुरुष हा स्त्रीचा आधार मानला आहे. तशीच वेलही बऱ्याचदा वृक्षाच्या आधाराने वाढत असते. पुरुषानं स्त्रीला मिठीत घ्यावं तसाच वृक्षही वेलीला मिठीत घेतो. त्या मिठीतली ओढ मला मोहात पाडते. त्या अनावर ओढीची…………अनावर ओदिच्या मिठीची हि चित्रं .
आपण यातून कधी काही शिकणार आहोत का ?

मी इतका सोशिक नाही

प्रेम हे प्रेम असतं……कि तडजोड ?

ती रागावते आणि हवालदिल होतो. आपला सगळा अहंकार…..आपला सगळा स्वाभिमान बाजूला ठेवून तिचा शब्द झेलू पहातो. तिच्या चेहऱ्यावरचा रुसवा जावून तिथ हसू पहाण्यासाठी वेडेपिसे होतो. आपल्यातल्या विदुषकाला जागे करतो. आणि ती ओठांच्या कोनातून हळूवार हसते. दोन्ही पंख पसरून आपल्या कुशीत शिरते. आपल्या खांद्यावर विसावते. आपण भरून पावतो.

कधी कधी आपण तिची वाट पहात उभे असतो. तिला उशीर होतो. आपला प्राण कंठाशी येतो. फार फार राग आलेला असतो आपल्याला तिचा. वाट पाहून कंटाळून आपण निराश मनानं झालेलो असतो…… जड पावलांनी परत निघालेलो असतो…… आणि ती येते……तेच आपल्याला हवं असलेलं हसू ओठांच्या कोनात घेवून. आपली सारी निराशा……. आपला सारा राग मनातल्या मनात कुठल्या कुठे पळून जातो. पण चेहरा मात्र कोऱ्या पाटीसारखा.ती मात्र फुललेल्या चेहऱ्यानं आणि बोलक्या डोळ्यानं विचारते, ” रागावलास ? ” आणि असं विचारतानाच अगदी निरागसपणे पंख पसरून आपल्या कुशीत शिरते.

असे आपण नेहमीच तिचा हसू पाहून विरघळतो. अळवावरचा थेंब होतो. तिच्या डोळ्यात हरवून जाताना फक्त फक्त तिचे होतो. आपण रागावलेलो होतो हेही विसरून जातो तिचा फुलून आलेला चेहरा पहात रहातो.

पण कधीं कधी मात्र सगळं काही बिनसलेलं असतं. तिचा रुसवा निघत नाही. आणि त्याचा स्वाभिमान त्याला माघार घेवू देत नाही. तेव्हा अगदी दोघांच्या वाट वेगळ्या व्हायची वेळ येते. पण त्याला जाणीव असते. नाही, तिच्या शिवाय आपलं आयुष्य फुलणार नाही. आणि मग तो म्हणतो –

तुझ्यासाठी
प्रेम हे प्रेम असतं……कि तडजोड ?

तुझ्यासाठी

ती रुसते रागावते आणि आपण आपला सगळा अहंकार बाजूला ठेवून तिला हसवू पहातो. तिच्यासाठी सर्कशीतला विदुषक होतो. गुलाबी गालावर सुकलेले अश्रू पुसत ती ओठांच्या कोनातून हळूवार हसते आणि आपण पसरलेल्या बाहूंच्या पंखात विसावते.

कधी कधी आपण रागावतो. आपल्याही नकळत तांडव करतो. ती भेदरते. आपल्या रागाला शरण जाते. आपल्याला हसवू पहाते. उषेचे रंग होते. फुलांचे गंध होते. आपण हरवून जातो त्यात. विसरतो आपला राग. पसरतो पंख आणि ती विसावते पुन्हा एकदा आपल्या कुशीत.

काय म्हणायचा याला ? प्रेम …… कि …… तडजोड ?

कारण या दोन्ही गोष्टी होत नाहीत तेव्हा दोघांच्या दोन दिशा ठरलेल्या. मध्ये एक अदृश्य भिंत. दोघांमध्ये विसंवाद निर्माण करणारी नव्हे. दोघांमधला संवाद दडपून टाकणारी. म्हणूनच खूप गरजेचा असतं अशी भिंत उभी रहाण्या आधीच जमीनदोस्त करण्याची. या आणि अशाच भावना व्यक्त करणारी हि कविता –

रुसवा, प्रेम, प्रेम कविता

रुसवा, प्रेम, प्रेम कविता

जपून ठेवावा असा लाडू.

आपण नुकतेच प्रेमात पडलेलो असतो. तिच्या सोबत हिंडणं फिरणं, हिरव्या रानातल्या सफरी सुरु असतात. पावसात चिंब झाल्यानंतर दोघात मिळून घेतलेल्या एकाच चहाच्या कपातला एकमेकांचा उष्टावलेला घोट घेताना अंगाला एक वेगळीच ऊब मिळत असते. बाजूच्या कुडाच्या हॉटेलात बसून मागवलेल्या जेवनाचा तिला भरवलेला घास मनात एक वेगळाच तरंग उमटवतो. म्हणूनच मागे अशाच एका प्रसंगावर मी –

तिला घास भरवताना

हि कविता पोस्ट केली होती. आणि रसिक वाचकांचा तिला भरभरून प्रतिसाद मिळाला होता.

अशाच एका घासाची हि छोटीशी गोष्ट.

रविवारी गावी गेलो होतो. माझ्या चुंलत पुतणीच लग्न होतं. ती दिलीय कोणाला तर माझ्या आत्याच्या नातवाला. त्यामुळे लग्न दोन्ही कडूनही जवळच. लग्न गावाकडे. मला दोघेही खूप मानतात. त्या दोघांचं जेवणाचं ताट मीच केलं दोघांना एकेक घास भरवला. नंतर एक लाडू घेतला. आधी नवरदेवाला त्यातला एक घास घ्यायला लावला. नंतर त्याच उष्टावलेल्या बाजूचा एक घास नवरीला घ्यायला लावला. आणि मग तो लाडू नवरदेवाच्या हाती देत म्हणालो, ” आता हा उरलेला लाडू खायचा नाही बरा का ? तो असाच जपून ठेवायचा. ”

” पण सांभाळायचा कोणी त्यांनी का मी ?” नवरी म्हणाली.

” दोघांनीही !!!! आपापल्या मनात.

गोड आठवणींचे असे अनेक लाडू प्रत्येकाला आपल्या मनात जपता आले तर आयुष्य किती गोड होईल नाही !!!!!!!!!