इस्ट ऑर वेस्ट इंडिया इज द बेस्ट !!!!!!!!!!!!!

india

ठिकाणं आणि इतर काही विशेषणं यांच्यातील मजेशीर संबंध. एवढी विविधता फक्त भारतातच आढळते – Continue reading

मोदी , आडवाणी आणि मी

cartoon advaniआज खूप दिवसांनी लिहितोय.  पुण्यातच खूप दिवसांनी आणि खूप दिवसांसाठी आलोय. खूप खूप म्हणजे अगदीच खूप नव्हे काही. पण नेहमी केवळ एखाद्या दिवसासाठी पुण्यात येणारा मी चक्कं चार दिवसांसाठी पुण्यात आलोय. सहाजिकच गणपतीची धामधूम असूनही मला पोस्ट लिहायला वेळ मिळालाय.

मोदी आणि आडवाणी यांचं नाव ओठावर येण्याचेच दिवस आहेत हे. पण मला काल त्यांची आठवण झाली ती वेगळ्या कारणामुळे. Continue reading

गोड बोल गाढवा

tilgulकाल खूप दिवसांनी गावाहून आलो. पाणी आहे. शेतीत रमलोय. कष्ट करतोय. कष्ट कंपनीत असतानाही करत होतो. त्याबदल्यात मिळावा तेवढा मोबदला मिळत नव्हता. आपल्यापेक्षा कमी बुद्धिमत्तेची आणि कामचुकार मंडळी केवळ लाळघोटेपनाच्या, हुजरेगीरीच्या जोरावर आपल्यापेक्षा अधिक पगार घेतात हे पाहून व्यथित व्हायचो.

शेतात मेथी केली होती. परिसरात माझ्या मेथीची ख्याती पसरली होती. तीन चार किलोमीटरहून काही मंडळी आली माझा प्लॉट पाहून खुश झाली. बाजारही बरा मिळाला. काही हजार रुपये पदरात पडले. फायदा किती झाला यापेक्षाही आज एका कुटुंबाचा मी पूर्णवेळ पोशिंदा आहे याचं मला समाधान आहे. याव्यतिरिक्तअधूनमधून बारा चौदा गडी बाया माझ्या शेतावर काम करत असतात. त्यांच्याही मीठ मिरचीची सोय माझ्यामुळे होत असते. मेथीचा प्लॉट संपलाय. आता पुढचं नियोजन चालू आहे.

काल आलो. आज ब्लॉग उघडला. माझ्या ब्लॉगच प्रगतिपुस्तक (stats ) पहिल. आज मकरसंक्रात माझ्या शुभेछा मिळतील काही नव्या ओळी मिळतील, संक्रतीसाठी एखादं भेटकार्ड मिळेल या अपेक्षेने आज अनेकांनी माझ्या ब्लॉगला भेट दिली पण त्यांच्या नशिबी निराशाच पडली असेल. कारण मी आज अजून काहीच पोस्ट केलं नव्हतं. त्यामुळेच ‘ तिळगुळ ‘ हि मागच्या संक्रातीला टाकलेली कविताच अनेकांनी आज पुन्हा पहिली. म्हणून आज तुम्हाला मकरसंक्रातीच्या मनःपूर्वक शुभेछा देतानाच देतोय एक खोडकर भेटकार्ड. Continue reading

सहावा सिलेंडर

gas cylinder परवा  जि. प. शाळांचे दुखणे भाग -१ , शालेय पोषण आहार हा सागर पाटील यांचा लेख वाचला. याच संदर्भात मी माझ्या ब्लॉगवर आयजीच्या जीवावर बायजी उदार हा लेख लिहिला होता. त्यात मीही या शालेय पोषण आहाराबद्दल लिहिलं होतं. शिक्षकांच्या दृष्टीनं तर ते दुखणं आहेच. पण माझा प्रश्न होता तो हाच कि ‘ जनतेनं कधी आमच्या मुलांना जेवायला घाला ‘ अशी मागणी केली होती ?

हिच काय अशा प्रकारची कोणतीही योजना जनतेच्या मागणीशिवाय सरकारनं राबवू नये. बरं जनतेला अर्थसाह्य करायचं ना मग अत्यावशक अशा सेवेत मोडणाऱ्या गॉसवरची सबसिडी का कमी केली ? पेट्रोलवरची सबसिडी का काढून टाकली ? इतकंच काय शेतकर्यांसाठी दिली जाणारी ठिबक सिंचनावरची सबसिडीही सरकारनं ४० % पर्यंत कमी केली आहे.  आता पुन्हा ९० % सबसिडी द्यायचा विचार आहे. ग्यास सिलेंडरच्या बाबतीतली धोरण ठरवताना सरकारला वेळ लागला नाही पण या बाबतीत दफ्तर दिरंगाई चालूच आहे. कारण इथं सरळ सरळ खायला मिळत नव्हतं.

सबसिड्या कडून टाकणाऱ्या सरकारनं Continue reading

एक होता पाऊस

पाऊस कुणाला आवडत नाही. तरुणाईला तर तो  आवडतोच आवडतो…………….पण छोट्यांनाही आवडतो…………..संध्याकाळच्या सावल्या खुणावत असताना मोठ्यांना हि तो हवासा वाटतो. कारण पाऊस असतोच तसा हवा हवासा. पण या कवितेतला छोट्या मात्र त्या पावसाशी चक्क लपाछपी खेळतोय. मागे मी ‘ एक होतं वांग ‘ हि कविता लिहिली होती. या कवितेतला पाऊसही तसाच Continue reading

गोष्ट

वर्तमान पत्रातल्या एकेक बातम्या पहिल्या कि फार फार वाईट वाटतं. भ्रष्टाचार …………बलात्कार ………. खून ………..दरोडे. कसलं शासन आणि कसली सुरक्षितता ? किती बेभरवश्याच आयुष्य जगतो आहोत आम्ही. या साऱ्याला जबाबदार कोण आम्ही कि  आमच्या देशातली व्यवस्था ? यातून बाहेर पडायला मार्गच नाही का  ?

आहे ! निचित आहे. फक्त आम्हाला शिवाजी महाराजांनी दिलेला लढा, झाशीच्या राणीन केलेला उठाव, भगतसिंगाच बलिदान, स्वातंत्रवीर सावरकरांनी भोगलेली काळ्या पाण्याची शिक्षा आठवायला हवी.

हो ! मान्य.  हे सारं परकीय  सत्तेविरुद्ध  होतं. आता आपण, आपणच निर्माण केलेल्या लोकशाही विरुद्ध कसं लढायचं ?

असाच प्रश्न पडणार असेल तर अमेरिकेचा स्वातंत्र्य लढा आठवावा, Continue reading

अशाही मिशा

( यातले हे मिश्यांचे फोटो पाहून तुम्हाला नक्की हसू येईल.)

मागे मी ‘ त्याची मिशी, त्याचा डाय ‘ हि विनोदी कविता ब्लॉगवर टाकली होती. मिशी हा लहानपणापासून प्रत्येकाच्याच कुठलाच विषय असतो. ती जन्मताच का येत नाही ? ती मुलांनाच का येते ? ती कधी झुपकेदार तर कधी अक्कडबाज असते. कधी वळणदार तर कधी टोकदार. तिला कधी छपरी मिशी म्हणतात तर कधी पिळीची.

कित्येकांना आपल्या ओठांवर कधी एकदाचं मिसुरड फुटतंय याची आस लागलेली असते. तर काहींना ओठांवर फुटलेल्या मिशा साफ करून टाकण्याची.

माझे काका ज्यांना आम्ही दादा म्हणायचो त्यांच्या ओठांवर अगदी मुठभर मिशा होत्या. चहा पिताना तहाच्या ओठांच्या आधी त्यांच्या मिशाच चहा प्यायच्या. चहा गाळलेला नसला तरी तो गाळूनच घशापर्यंत जायील अशी त्यांच्या मिशीची ठेवण आणि राखण होती.

तमाशातली लावणी पहाताना रंगमंचावरल्या नर्तकीकडे पाहून मिशीला पीळ भरणार नाही असा गावरान तरुण विरळाच. राग आल्यानंतर दुसऱ्याकडे लालबुंद डोळ्यांनी पाहून मिशीला पीळ भरणारेही अनेकजण असतात. मिशीची टोके पिळण्यात कित्येकांचे दिवसातले काही तास जातात. मिशीवर पालथी मुठ फिरवण्यातही अनेकजण धन्यता मानतात.

अशीच परवा आमच्याकडे एक कृत्रिम मिशी सापडली आणि ती मिशी लावून फोटो काढून घेण्यासाठी घरातल्या सगळ्या बालगोपाळांची झुंबड उडाली ते हे फोटो.

हा छोटा देवानंद तर नाही ना ?

हा छोटा देवानंद तर नाही ना ?

कसा वाटला हा हिप्पी ?

कसा वाटला हा हिप्पी ?

हा कारगिल मधला कर्नल तर नव्हे ?

हा कारगिल मधला कर्नल तर नव्हे ?

त्याची मिशी, त्याचा डाय

त्याची मिशी, त्याचा डाय

ढाण्या वाघ आणि आण्णांचं उपोषण

खरा भारतीय, indian,

खरा भारतीय, indian,

मुंबापुरीत मच्छर फार झालेत. म्हणून हे मच्छराचं गुणगुणनं आहे असं समजून आमच्या ढाण्या वाघानं आपला पंजा आपल्याच कानाच्या दिशेनं फिरवला. पण मच्छराचा मागमूसही हाती न लागता जेव्हा त्यांच्याच पंजाचा त्यांच्याच कानाखाली जाळ निघाला तेव्हा ते समजून चुकले कि नाही हे मच्छराचं गुणगुणनं नाही, ही सिंहाची गर्जना होती.

मग डोळ्यावरची झापड बाजूला सारून डोळे किलकिले करत आज कितीतरी दिवसानंतर आमच्या ढाण्या वाघानं आजूबाजूला पाहिलं. पण आपल्याच शिनीच्या ( म्हणजे बरोबरीच्या. आठ दहा वर्ष मागं पुढं असली तरी एका शिनिचीच म्हणत्यात नव्हं ) वाघानं एवढी सगळा देश हादरवून टाकणारी गर्जना केली म्हणाल्यावर हा आमचा एवढे दिवस सुस्तावलेला वाघ एकदम खजील झाला. पण त्याच्या तोंडातून काही डरकाळी फुटेना.
पण उशिरा का होईना काल कसातरी आमच्या वाघानं जबडा उघडला. डरकाळी फोडली. पण डरकाळी नव्हतीच ती. संतापही नव्हता. कंटाळून जांभळी ( जांभई ) दिल्यासारखं वाटलं. काय म्हणाला काल आमचा ढाण्या वाघ माहिते आहे. आमचा म्हणतोय म्हणजे मी सेनेचा नाही बरं का. पटलं नाही हे आमच्या ढाण्या वाघाचा विधान. काय म्हणाला माहिती आहे तो ? तो म्हणाला – ” मला अण्णांच्या प्रकृतीची काळजी वाटते. अण्णांनी उपोषण मागे घ्यावं. हवं असेल तर अरविंद केजरीवाल अथवा किरण बेदी यांनी उपोषणाला बसावं.”

व्वा वाघा तुझ्या नसानसातून हिंदुत्वाच आणि मराठी मातीचं वारं वाहत आहे हे आज पटलं. अण्णांशिवाय कुणी उत्तरेकडचं अथवा दक्षिणेकडचं असं उपोषणाला बसला असतं तर तू त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिलं नसतं. केवळ आपले अण्णा आहेत म्हणून तुझ्या नसानसातलं शांत झालेलं हिंदुत्वाच वादळ आज पुन्हा जागं झालं. पण ते वादळ इतका पोरकटपणा करेल असं आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं.

मागे एकदा त्या पवारांच्या अज्यानं तुझ्या क्रत्त्वा विशी सवाल उपस्थित केलं होता तेव्हा आम्ही त्याचा कोण समाचार घेतला होता. पण आज अण्णांच्या कर्तुत्वाला पाठबळ देण्याऐवजी तुम्ही त्यात भुंगा सोडायचा जो प्रयत्न केलाय तो अजिबात नाही आवडला आपल्याला. अहो अर्विडचा आणि किरणचा नाव घेण्या ऐवजी एखदा म्हणाला असता, ” अण्णा तू लढायचं तर तू लढ. पण उपोषण सोड. आणि उपोषण चालू ठेवायचाच असेल तर त्या अर्विडला आणि त्या किरणला नको नको बसवू उपोषणाला. फक्कड बोलतोय तो अरविद. उपोषणासाठी जर कुणी गडीच पाहिजे असल तर मी माझा बछडा देतो ना पाठवून. पण तू उपोषण सोड.”

किराणा

आमच्या सोसायटीतल्या सुमाताई. त्यांच्या यमीच लग्नं जमलं. घराघरातून रोज केळवनाची आमंत्रणं येऊ लागली. आज कुणाकडे तर गुजर काकूंकडे, उद्या कुणाकडे तर लिगाडे काकूंकडे, परवा कुणाकडे तर शहाणे काकूंकडे. रोज केळवण झडायची.

कधी कधी तर संध्याकाळच्या चहा आणि नाष्ट्यावरही केळवण भागवल जायचं. बेतही मोठे साग्रसंगीत असायचे. काल असाच तिसऱ्या मजल्यावरच्या जोशी काकूंकडे संध्याकाळच्या केळवनाचा बेत होता. सातची वेळ ठरलेली. आया बाया जमलेल्या. म्हणायला नाष्टा पण निम्मं अर्ध जेवण होईल असा चमचमीत बेत. पाव भाजीचा.

रमत गमत, हसत खिदळत पाव भाजीचा फडशा पडत होता. गप्पा चांगल्याच रंगलेल्या. घड्याळाचं भान कुणालाच नाही. आणि यमीचं लक्ष घड्याळाकडे गेलं. ती किंचाळलीच, ” काकू, आहो साडे आठ वाजलेत. मला देशमुख काकिंच्यात जायचय केळवनाला.”

जोशी काकूंचा शरू आतल्या खोलीतच होता. त्यानं हे ऐकलं आणि बाहेर येत म्हणाला, ” यावर आणखी रात्रीचं जेवण का ?”

” हो ना रे. गेली पंधरा दिवस असच चाललंय बघ.” यमी अभिमानानं फुलून म्हणाली.

” हो का ? मग या महिन्यात किराणा भरलाच नसेल तुमच्या.”

शरूच्या या कोटीवर बायकांच्यात चांगलीच खसखस पिकली आणि यमी देशमुख काकूंच्या घराच्या दिशेने धूम पळाली.