सहावा सिलेंडर

gas cylinder परवा  जि. प. शाळांचे दुखणे भाग -१ , शालेय पोषण आहार हा सागर पाटील यांचा लेख वाचला. याच संदर्भात मी माझ्या ब्लॉगवर आयजीच्या जीवावर बायजी उदार हा लेख लिहिला होता. त्यात मीही या शालेय पोषण आहाराबद्दल लिहिलं होतं. शिक्षकांच्या दृष्टीनं तर ते दुखणं आहेच. पण माझा प्रश्न होता तो हाच कि ‘ जनतेनं कधी आमच्या मुलांना जेवायला घाला ‘ अशी मागणी केली होती ?

हिच काय अशा प्रकारची कोणतीही योजना जनतेच्या मागणीशिवाय सरकारनं राबवू नये. बरं जनतेला अर्थसाह्य करायचं ना मग अत्यावशक अशा सेवेत मोडणाऱ्या गॉसवरची सबसिडी का कमी केली ? पेट्रोलवरची सबसिडी का काढून टाकली ? इतकंच काय शेतकर्यांसाठी दिली जाणारी ठिबक सिंचनावरची सबसिडीही सरकारनं ४० % पर्यंत कमी केली आहे.  आता पुन्हा ९० % सबसिडी द्यायचा विचार आहे. ग्यास सिलेंडरच्या बाबतीतली धोरण ठरवताना सरकारला वेळ लागला नाही पण या बाबतीत दफ्तर दिरंगाई चालूच आहे. कारण इथं सरळ सरळ खायला मिळत नव्हतं.

सबसिड्या कडून टाकणाऱ्या सरकारनं Continue reading

सोनियाच्या स्वप्नात महात्मा गांधी

गेली पाच सहा दिवस खूप धावपळीत गेले. गावी गेलो होतो. भुईमुग काढायचा होता. शेतावर कुठली आलीय नेट. पण अण्णांचं आंदोलन जवळून ( टिव्हीवर ) पहात होतो. लिहायचं खूप मनात होतं पण लिहू शकलो नाही. अण्णांच्या आंदोलनाच्या संदर्भात अनेक यसएमयस येत होते. त्या काहीशा टुकार भाषेतील यसएमयस वरून लिहिलेला हे कल्पित लेखन.

**************************************************************************
एक दिवस महात्मा गांधी सोनिया गांधींच्या स्वप्नात आले आणि म्हणाले, ” मरताना मी काँग्रेसला माझी टोपी , माझा चष्मा आणि माझी काठी दिली होती. कुठे आहेत त्या सगळ्या वस्तू ? ”

त्यावर सोनिया गांधी म्हणाल्या, ” टोपी तर आम्ही जनतेला घातली……….चष्मा मनमोहन सिंगांना दिला…………आणि काठी अण्णा हजारेंच्या हाती दिली होती.”

त्यावर महात्मा गांधी म्हणाले, ” ठीक आहे. जनतेला टोपी घालून तुम्ही माझ्या जनसेवेच्या व्रताला टोपी घातली आहे हे मी पहातो आहेच. माझा चष्माही मनमोहन सिंगांच्या डोळ्यावर दिसतो आहे. त्या चष्म्याच्या आतले डोळे आंधळे आहेत हे हि आता कळून चुकलंय. पण अण्णांनी काठीचं काय केलंय ?”

यावर सोनिया गांधी बारीक आवाजात म्हणाल्या ” काय हे बापुजी. चष्म्याशिवाय तुम्हाला दिसत नाही हेच खरंय. नाही तर आम्ही अण्णांच्या हाती दिलेली तुमची काठी अण्णांनी आमच्याच माथी हाणून आम्ही किती नाठाळ आहोत हे साऱ्या जगाला दाखवून दिल्याचं तुम्हाला दिसलं नसतं का ? ”

महात्मा गांधींनी झटकन सोनिया गांधींच्या स्वप्नातून पळ काढला आणि तडक स्वर्गात पोहचले. स्वर्गातून रामलीला मैदानावर एक नजर टाकली आणि तिथला सोहळा पाहून –

” रघुपती राघवा राजाराम पतित पावन सीताराम ”

हे त्यांचं प्रिय भजन गुणगुणू लागले. हेतू एवढाच कि काँग्रेसला सद्गती मिळावी. अण्णा हजारेंना उपोषण करायला लावलेला पापातून मुक्ती मिळावी. पण कॉंग्रेसचा झालाय कंसा सारखं. त्यांच्या पापाचा घडा भरलाय. नुसता भरलाय असा नव्हे तर भरून उतू चाललाय. आता त्यांचं पतन हे नक्कीच.

दिवा नसला तरी आग दिसते

उद्यापासून गावी जाणार आहे. भुईमुग काढायचा आहे. आणखी बरीच कामं आहेत.

स्वातंत्र्या दिन साजरा झाला खरं पण स्वातंत्र्याला काही अर्थ उरला नाही म्हणा. कधी कधी वाटत न्यायदेवतेपेक्षाही आमची लोकशाही अधिक हतबल आहे आणि आंधळी. फक्त बघ्याची भूमिका घेतो आहोत आम्ही. मनगट पिचल्यासारखे.निराश हताश. बसून रहातो.
ज्याला आम्ही आमचं सरकार म्हणतो त्या आमच्या मायबाप सरकारनं सध्या आम्हाला चिरडून टाकायचंच ठरवलंय. रामदेवबाबांसारख्या माणसाची जिथे डाळ शिजत नाही तिथ पवनेच्या पाण्यासाठी लढणाऱ्यानची काय कथा.

स्वातंत्र्यानंतर आणीबाणीचा एक काळ सोडला तर कधी कुणाचा आवाज फारसा उठलाच नाही. रामदेवबाबांनी आवाज टाकला. पण तो आवाज दाबून टाकण्यात आमचं सरकार यशस्वी झालं आहे. आता आण्णांही अटक केली. काय साधणार कॉंग्रेस यातून ? चारसहा दिवसांपूर्वी मायावतीच्या राज्यात आंदोलकांवर अमानुष लाठीमार करणारे पोलीस पहिले. परवा आमच्या महाराष्ट्रात पवनेच्या पाण्यासाठी अडून बसलेल्या शेतकर्यांवर गोळीबार करण्यात आला. आणखी काही ठिकाणी असा गोळीबार केला कि कशाला सामान्य माणूस उठाव करतोय.

पण नाही मित्रांनो. प्रेम विसरायला हवं. नाती नजरेआड करायला हवीत. स्वराज्य आहेच……….सुराज्याचा ध्यास धरायला हवा. त्यासाठी सुराज्याच्या यज्ञात स्वतःची आहुती द्यायला हवी. त्यासाठी आण्णाच्या आंदोलनाला पाठींबा द्यायला हवा.

आण्णा म्हणजे एक ठिणगी आहे. मंगल पांडे सारखी. ती धुमसणार. अखंड हिंदुस्तान पेटवणार. आणि त्या आगीत कॉंग्रेस जाळून राख होणार.

पाणीसुद्धा पेट घेतं

रॉकेल, डीझेल, पेट्रोल हे ज्वालाग्रही पदार्थ आहेत. लिक्विड पेट्रोलियम ग्यास ( LPG ) सुद्धा पेट घेतो. आणि असा धगधगता निखारा आमच्यापासून काही हातांवर असतो. कापरासारखा घन पदार्थसुद्धा पेट घेतो. असे आणखी कितीतरी पदार्थ सांगता येतील कि जे निर्जीव असूनही पेट घेतात. स्वतः जळताना अवतीभोवती जे काही असेल ते स्वः करतात. अगदी पवनेचं पाणीही पेट घेतं. पण आम्ही सजीव असूनही पेट घेत नाही. एखाद्या वाटेवरच्या दगडासारखे निमुटपणे सारं पहात रहातो.

असो.

पवनेचं पाणी नुसतं पेटलंच नाही तर त्या पाण्यानं सगळ्या मावळला कवेत घेतलं आणि शिवकालानंतर कितीतरी वर्षांनतर पुन्हा शिवाजी महाराजांचा मावळा पेटून उठला. पण स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्याच राजाचं च्त्राटती संभाजी महाराजांचं शीर औरंगजेबाला पेश करणारे मानाजी मानेसारखे कटकारंस्थानी आमच्यात काय कमी आहेत ? आणि हे मानाजी माने वेगळे असत नाहीत. ते आमच्यातच असतात. पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आमचा जीव घेतात. नाव जनकल्याणाचं पण साधायचा असतो स्वतःचा स्वार्थ. आर. आर. काय, अजित पवार काय. हे केवळ शेतकर्यांच्या मना मोडायला बसले आहेत. कारण यांना जाणीव नाही कि यांच्या मुखात पडणारा घास गावाकडच्या मातीतून येतो आणि त्यात शेतकर्यांचा घाम मिसळलेला असतो.