अंगणवाडी सेविकेंच्या मागण्या

anganwadiनिवडणुका जवळ आल्यात. त्यामुळे आपल्या मागण्या शासन दरबारी मांडण्याची आणि त्यांचा पाठपुरावा करण्याची हीच योग्य वेळ आहे याची जाणीव सर्वच संघटनांना असते. सहाजिकच शासनाला नाक मुठीत धरायला लावण्यासाठी सगळ्याच संघटना कंबर कसतात. पण Continue reading

मिशी

( यातले हे मिश्यांचे फोटो पाहून तुम्हाला नक्की हसू येईल.)  मागे मी ‘ त्याची मिशी, त्याचा डाय ‘ हि विनोदी कविता ब्लॉगवर टाकली होती. मिशी हा लहानपणापासून प्रत्येकाच्याच कुतूहलाचा विषय असतो. ती जन्मताच का येत नाही ? Continue reading

रिझल्ट

काय मुलांनो, परवाची गोष्ट  वाचलीत ना ?

आवडली कि नाही ?
खूप खूप आवडली.
बहोत अच्छे !
हो पण तुमच्या निकालाचा काय ? Continue reading

झाडासाठी टोपी



मित्रांनो,
खूप दिवस झाले तुमची परीक्षा संपून पण मी तुम्हाला भेटलोच नाही. रागावलात ना माझ्यावर? सॉरी. काय हे, अजूनही राग जात नाही ? ठीक आहे शिक्षा करा मला.
काय करू ? कान धरू का ? उठाबशा काढू का ? कि कोंबडा होऊ ?

काय, म्हणालात कोंबडा होऊ ?

ठीक आहे कोंबडा होतो.

आवाजही काढू .

ठीक आहे.

कुकु s s s चुकू Continue reading

राजाची न्यायबुद्धी

राज्यस्थान मधलं अजलमेर. खूप खूप वर्षापूर्वी तिथ रणजितसिंग नावाचा एक राजा राज्य करीत होता. एक दिवस नेहमीप्रमाणे तो त्याचा सारा लवाजमा घेवून शिकारीला गेला. सकाळपासून जंगल पालथं घालून सगळे थकले होते. शिकार हाती लागली नव्हतीच पण दुपार झाली होती. दमून भागून सारे एका झाडाखाली विश्रांतीसाठी थांबले. दुपारचं भोजनही उरकून घ्यावं असा विचार केला. इतक्यात Continue reading

एक होता पाऊस

पाऊस कुणाला आवडत नाही. तरुणाईला तर तो  आवडतोच आवडतो…………….पण छोट्यांनाही आवडतो…………..संध्याकाळच्या सावल्या खुणावत असताना मोठ्यांना हि तो हवासा वाटतो. कारण पाऊस असतोच तसा हवा हवासा. पण या कवितेतला छोट्या मात्र त्या पावसाशी चक्क लपाछपी खेळतोय. मागे मी ‘ एक होतं वांग ‘ हि कविता लिहिली होती. या कवितेतला पाऊसही तसाच Continue reading

गणपती आणि बुजगावणं

सोसायटीत चित्रकलेची स्पर्धा होती. तीन गटात. परीक्षकाच काम माझ्या पत्नीकडे होतं.

राजकारणात स्त्रियांना एक तृतिआंश आरक्षण लाभल्यानंतर गावागावात महिला सरपंच होण्याचं पेव फुटलं. पण बाई सरपंच नावालाच. सगळा कारभार धन्याच्याच हातात.

आमच्याकडेही तसंच झालं. परीक्षकाच काम पत्नीकडे पण तिनं सगळी चित्रं माझ्यासमोर टाकली. झकासच होती चित्रं. मी पटापटा दोन्ही गटातली पहिल्या तीन क्रमांकाची चित्र वेगळी केली. तिच्याकडे दिली आणि म्हणालो, ” मला हि चित्र ठीक वाटताहेत. पण परीक्षक तू आहेस. तुला योग्य वाटेल ते कर.”

तिनंही सगळी चित्रं नजरेखालून घातली. आणि मला म्हणाली, ” हे श्रीहरीच चित्रही छान आहे ना ?”

ते चित्रं मलाही आवडलं होतं. पण इतर चित्रांमध्ये रेखीवपणा जास्त होता. आणि या चित्रात कल्पनेचा वेगळेपणा. हा बुजगावण्याच्या रूपातला गणपती आम्हाला सगळ्यांनाच खूप आवडला. आणि आम्ही बहुमतानं त्याला उत्तेजनार्थ पारितोषिक द्याचं ठरवलं. ते हे चित्रं –

गणपती, गणपती बाप्पा,

गणपती, गणपती बाप्पा,

राक्षसपुरचा राक्षस

मुलं राक्षसाला घाबरतात असं कुणी म्हणत असेल तर ते मला फारसं पटणार नाही. मुलं राक्षसाला घाबरली असती तर त्यांनी राक्षसाच्या गोष्टी कान देऊन ऐकल्या नसत्या आणि अभ्यासाची पुस्तकं डोळ्यासमोर धरायची टाळाटाळ करणारी मुलं अशा गोष्टींची पुस्तकं तासंतास डोळ्यासमोर धरून बसलीही नसती.

त्यातूनही थोडीफार भीती असतेच मुलांना राक्षसाची. पण त्या भितीलाही एक वय असतं. अशी राक्षसाची थोडीफार भीती बाळगणाऱ्या मुलांच्या मनातूनही राक्षसाची भीती दूर व्हावी म्हणून लिहिलेली हि कविता.

संपूर्ण ‘ देवबाप्पा ‘

खरंतर मला असं अर्धवट लिहायला आवडत नाही. पण काल काय झालं होतं माहित नाही. काही केल्या माझी कविता लोड होत नव्हती. आजही ऑफिसहून आल्यानंतर दोन तीन वेळा प्रयत्न केला. पण काही जमत नव्हतं. बहुधा स्पीडचा प्रोब्लेम असावा.  शेवटी आत्ता कविता लोड झालीय. हि संपूर्ण कविता तुम्हाला नक्कीच आवडेल असा विश्वास वाटतोय.

पण हे छोट्या मुलांसाठी जे लिहितोय ते केवळ त्यांच्यासाठीच. मोठ्यांनी हे सारं छोट्यांच्या कानावर घालावं. त्यातून त्यांच्यावर काही संस्कार व्हावेत. हीच मनापासून इच्छा.

*********************************************************************************

शाळा संपली कि सुट्टी लागते. मुलांना खूप आनंद होतो. नुसत्या उनाडक्या करत फिरतात ती. दोन महिने आई – बाबा, आज्जी – आजोबा, मामा – मामी साऱ्या साऱ्यांना नकोसे करून टाकतात. कधी एकदा ही कार्टी शाळेत जातील आणि घर शांत होईल असं वाटत असतं घरातल्या सगळ्यांना. पण त्यांचा मन कुठं कळतं आपल्याला ?

खरंतर मुलांनाही सुट्टीचा कंटाळाच आलेला असतो. कधी एकदा शाळा सुरु होते आणि कधी एकदा नवा गणवेष, नवी वह्या पुस्तक घेऊन शाळेत जातो आणि आपल्या मित्र – मैत्रिणींना सुटीतल्या गंमती जंमती सांगतो असं होऊन गेलेलं असतं त्यांनाही.

झालं!!!!!!!!!!!!!

सुट्टी संपते. शाळा सुरु होते. पण महिन्या दोन महिन्यातच मुलांना पुन्हा शाळेचा कंटाळा येऊ लागतो. वाटतं, काय हे ? रोज तेच तेच. शाळा, शिकवणी, अभ्यास, इतिहास, भूगोल अगदी चक्रावून जातात मुलं.

अशीच हि ह्या कवितेतली मुलगी. तिला शाळेचा खूप खूप कंटाळा आलाय. तिला वाटतंय आपल्यापेक्षा देवाचं आयुष्य खूप मजेचं आहे. शाळा नाही, पाटी नाही, अभ्यास नाही, शिकवणी नाही कि संध्याकाळी शुभंकरोतीही म्हणायची नाही. ही सगळी शोकांतिका देवालाच सांगताना ती म्हणते –

देवबाप्पा, देवबाप्पा
बरं आपलं तुझं आहे
अभ्यासाचं पाठीवरती,
तुझ्या कुठं ओझं आहे.

हि कविता तुम्ही तुमच्या मुलांना वाचून दाखवलं तेव्हा त्यांना –

पण ही कविता म्हणजे आपली गंमत बरं. शाळेत जायला हवंच खरं.

आणि नुसतं शाळेत जाऊनही नाही भागायचं. अभ्यासही करायला हवा.

हे सांगायला विसरू नका.