ती त्याला दिसते……डोळ्यांना डोळे भीडतात आणि एका अवचित क्षणी तो तिच्या आणि ती त्याच्या मनात भरते. पण हे कधी….कुठे……आणि कसं घडतं….. Continue reading
poem
असंही गीत
भक्ती गीतं लिहिणं हा माझा पिंड नाही. पण कधी कधी अचानक आभाळ दाटून यावं तसे काही विचार येतात.आणि ध्यानीमनी नसताना एखादं भक्तीगीत आकार घेतं. पांडुरंग हे काही माझं आराध्य दैवत नाही. पण Continue reading
झाडासाठी टोपी
मित्रांनो,
खूप दिवस झाले तुमची परीक्षा संपून पण मी तुम्हाला भेटलोच नाही. रागावलात ना माझ्यावर? सॉरी. काय हे, अजूनही राग जात नाही ? ठीक आहे शिक्षा करा मला.
काय करू ? कान धरू का ? उठाबशा काढू का ? कि कोंबडा होऊ ?
काय, म्हणालात कोंबडा होऊ ?
ठीक आहे कोंबडा होतो.
आवाजही काढू .
ठीक आहे.
कुकु s s s चुकू Continue reading
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
अनेकांना अनेकांकडून अशा ढिगभर शुभेच्छा आल्या असतील त्यात आणखी माझ्या शुभेच्छाची भर. कोण वाचणार हि पोस्ट ? पण वाचायला हवी. वाचायला हवी म्हणण्यापेक्षा पहायला हवी. आणि माझे रसिक वाचक ही पोस्ट आवर्जून वाचतील असा मला विश्वास आहे. कारण Continue reading
शपथ झाली पोरकी
प्रेम कुणामधलंही असो. आई मुलातलं असो…….नवरा बायकोतलं असो……..प्रियकर प्रेयसीतलं असो………वडील मुलातलं असो……मित्रा मित्रातलं असो किंवा मित्र मैत्रीणीतलं असो. प्रेमाच्या कोणत्याही पदराला बंधनाची झालर असतेच. का अशा बंधनाची गरज भासते माणसाला ? कारण Continue reading
आज सोनं लुटू नका
विजया दशमीच्या दिवशी सोनं ( आपट्याची पान ) लुटणं हि परंपरा आहे. पिढ्यानमागून पिढ्या अनुकरण झालं आणि आज ते आमच्या पर्यंत आलं. दसर्याला एकमेकांना आपट्याची पानं देणं हि प्रथा झाली. त्याला शास्त्र काही नाही. काही कथा आहेत.
त्यापैकी एक म्हणजे – Continue reading
मैत्री : तीही गाढवाशी.
सुदंर मुलीच्या प्रेमात कुणीही पडतो. पण रंगानं काळ्या , दात पुढं आलेल्या मुलीकडे कुणी वळूनही पहात नाही. तिलाही प्रेमाची गरज असतेच ना ? पण असा साधा विचारही कधी आपल्या मनात येत नाही. का असं ?
एखाद्या छानछोकी खिसा खुळखुळनाऱ्या मुलाकडे मुली सहज ओढल्या जातात. पण अंगावर साधेसुधे कपडे असणाऱ्या सरळ मार्गी मुलाला मात्र त्या मुर्खात काढतात. त्या मुलालाही मन आहे भावना आहेत याची जाणीवही नसते मुलींना. का असं ?
सुंदर मुलीच्या प्रेमात पडायला आणि श्रीमंत मुलांना भुरळ घालायला फार बुद्धी लागत नाही. त्यासाठी Continue reading
प्रेम म्हणजे नेमकं काय ?
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे
प्रेम असतं
तुमचं आमचं साऱ्यांच
सेम असतं.
एवढ्या दिलखुलास शब्दात मंगेश पाडगावकरांनी प्रेमाची व्याख्या सांगितली. प्रेम आधी आलं मग प्रेमाची व्याख्या आली. कोट्यावधी वर्षापूर्वी कोणते जीव अस्तित्वात होते हेही संशोधक सांगू शकतील पण माणसाच्या मनात प्रेम भावनेचा उगम नेमकं कधी झाला हे सांगणं मात्र कुणालाही शक्य होणार नाही. आणि तरीही आपल्याला प्रेम म्हणजे काय हे नक्की समजलंय असं वाटत नाही.
निस्वार्थ असतं ते प्रेम………प्रेमला कसलाही मोह नसतो…………प्रेमाला कसलीही अपेक्षा नसते. अशा रीतीनं प्रेमाला शब्दांनी व्यापण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही Continue reading
एक होता पाऊस
पाऊस कुणाला आवडत नाही. तरुणाईला तर तो आवडतोच आवडतो…………….पण छोट्यांनाही आवडतो…………..संध्याकाळच्या सावल्या खुणावत असताना मोठ्यांना हि तो हवासा वाटतो. कारण पाऊस असतोच तसा हवा हवासा. पण या कवितेतला छोट्या मात्र त्या पावसाशी चक्क लपाछपी खेळतोय. मागे मी ‘ एक होतं वांग ‘ हि कविता लिहिली होती. या कवितेतला पाऊसही तसाच Continue reading
तुमचा बाप तुमच्यावर अन्याय करतोय ?
मी लहान होतो तेव्हा माझा बाप माझ्यावर अन्याय करतोय असं मला वाटायचं. त्याचं वागणं चुकीचं नसेल. किंवा मी आज ज्या रीतीनं माझ्या पायावर उभा आहे ते पाहिलं कि वाटतं त्याचं वागणं चुकीचं नव्हताच. पण तरीही मी माझ्या मुलांशी फार कठोरपणे वागू शकत नाही. तरीही माझ्या मुलांना माझं वागणं कठोर वाटत असेल. पण मित्रांनो नाही. प्रत्येक बाप त्याच्या मुलांशी जे काही वागतो ते त्या मुलांच्या उज्ज्वल भावितव्यासाठीच. पण हे आज पटतंय.
त्या वयात कळतच नाही चुकतंय कोण ते. कळत नाही म्हणण्यापेक्षा आपण बरोबरच आहोत. कळत नाही ते आपल्या आई बाबांना. आपल्या वयात तेही असेच वागले असतील. आपल्यासारख्याच चुका केल्या असतील. आपण जसा आज मार खातो ना त्यांचा तसा त्यांनीही मार खाल्ला असेल आपल्या आजोबांचा. पण आज आपल्याला शहाणपण शिकवताहेत. असं ठाम मत असतं आपलं.