वारीचे वारकरी

आजच्या दैनिक प्रभातमधील माझा लेख. फोटोत मी, माझे बंधू आणि ज्ञानराज विद्याप्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संजय शेंडगे, उद्योजक आणि वारकरी राजेंद्र वाघ, माझी बहीण नगरसेविका आशा धायगुडे शेंडगे, आणि माझे धाकटे बंधू अविनाश शेंडगे.

अमर्त्यसेन हे भारतरत्न कसे?

मी सचिन आणि रोहितची तुलना करणारी एक तिरकस पोस्ट लिहिली आणि सचिनप्रेमी मंडळींना बरेच वाईट वाटले. म्हणून हे स्पष्टीकरण. खरेतर मी लेखक कवी. मोदी सत्तेत आले काय आणि राहुल गांधी पंतप्रधान झाले काय मला काहीच फरक पडायला नको. त्याच प्रमाणे सचिनला भारतरत्न दिले म्हणून मला काहीही फरक पडायचं कारण नाही. परंतु एखादी गोष्ट चुकीची घडत असेल तर त्याविषयी लिहायला हवेच ना.

खरेतर मला स्वतःला सचिनविषयी जेवढे प्रेम आहे तेवढेच प्रेम धोनीविषयी आहे. याउपर नेतृत्व गुण यासह इतर अनेक कसोट्यांवर मला सचिनपेक्षाही धोनी थोर वाटतो. पण खेळात सर्वक्षेष्ठ कामगिरी असणाऱ्या खेळाडूसाठी खेलरत्न हा पुरस्कार आहे. आणि Continue reading

खळाळत्या आयुष्याची धरण गाणी.

जे चांगलं त्यावर चांगलं लिहिताना मला शब्द कमी पडत नाहीत. परंतु आमच्या कवितेची स्तुतीच करा असा कुणाचा आग्रह असेल तर ते शक्य नाही. अलीकडे माझ्याहून थोर मीच अशीच प्रत्येक कवीची भावना असते त्यामुळे कुणावर टीका केली तर ती त्याला रुचत नाही. त्यामुळे अलीकडे लोकांना काय आवडेल खूप भान बाळगावे लागते. मीच नव्हे श्रीपाल सबनीस यांच्या सारखे जेष्ठ साहित्यिक, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुद्धा आपल्या अध्यक्षिय भाषणात कसल्याही सुमार पुस्तकावर अतिशय भरभरून बोलतात.

पण कवी गोविंद काळे हे जसे वयाने थोर तसेच अनुभवाने. त्यांचा सखी सांगाती हा काव्यसंग्रह तीन महिन्यापूर्वी माझ्याकडे आला. तो वाचून मी त्यावर लिहिले. त्यातली एखादी दुसरी उणीव मी त्यांना दाखवली. ती त्यांनी स्वीकारली. परवा सोलापूरला गेलो होतो. त्यांना फोन केला होता. मी जिथे मुक्कामी होतो तिथे ते आले. भेट झाली आदराने त्यांच्या घरी घेऊन गेले. चहापाणी झालं. आपलं मोठेपण विसरून इतरांचा आदरसत्कार करणारी Continue reading

दुहेरी समाधान

खरंतर वारीचा वारकरी व्हावं. पंढरीला एकदातरी चालत जावं अशी फार मोठी मनीषा होतं. पण देवाच्या भुकेपेक्षा पोटाची भूक मोठी असावी. नौकरी, घर, संसार, मुलांचं Continue reading

काय करावं या मीडियाचं ?

लोकसभा निवडणुकीदरम्यान मीडिया अत्यंत पक्षपाती काम करत होती. आपण सगळ्यांनी ते अनुभवलं आहे. मोदींची बदनामी करणं आणि राहुल गांधीला लोकशाहीचा तारणहार ठरवणं सुरु होतं. मुद्रित माध्यमं असोत वा दृश्य, एक दोन अपवाद वगळता मोदींना दोष देण्यात सगळ्यांना धन्यता वाटत होती. त्यासाठीच निवडणुका पार पडल्यानंतर Anti Media Forum असा फेसबुक ग्रुप सुरु करावा. आणि त्या माध्यमातून एकाचवेळी निर्णय घेऊन मीडियाला बहिष्कृत करावं असा माझा विचार होता. परंतु Continue reading

अभिराज : एक अभिजात संगीतकार

कवी म्हटलं कि कुसुमाग्रज, मंगेश पाडगांवकर यांच्या पलीकडे फारशी नावं माहित नसतातआम्हाला. अपवाद असतील याला. पण माझं विधान सर्वसाधारण आहे. माझ्या सोसायटीतल्या ग्रँज्युएट झालेल्या एका मुलीला मी शिवाजी सावंत माहित आहे का विचारलं, तर Continue reading

मी असाच आहे

बबन धुमाळ यांची गझल मी फेसबुकवर वाचली. संपर्क झाला. बघता बघता ते माझे मित्र झाले. पण मित्र म्हणून स्तुती करायची हा स्वभाव नाही माझा. माझ्या मित्र यादीत असणाऱ्या ५० एक मित्रांनी मला नारळ दिला. कारण एकच मी त्यांच्या पोस्टवर फारसा जात नाही. त्यांच्या फुटकळ ओळींवर स्तुतीसुमने उधळत नाही. उगाच स्तुती करायची हा स्वभाव नाही माझा. पण अनेकांना ते रुचत नाही. मग अशी मंडळी मला त्यांच्या मित्र यादीतून बाहेरचा रस्ता दाखवतात. ते तसे बरेच म्हणायचे. कारण आता त्यांच्या सुमार ओळी समोर येत नाही.

बबन धुमाळांचा आणि माझा परिचय झाला. या म्हणालो भेटायला. कुठला अनमान न करता आले. भेटले. आमची मैत्री अधिक घट्ट झाली. त्यांचा ‘हे बंध वेदनेचे ‘ हा गझलसंग्रह प्रकाशित झाला. कोणतीही अपेक्षा न करता मी त्यांना माझ्यापरीने सर्वोतोपरी मदत केली. योग्य तोच रस्ता दाखविण्याचा प्रयत्न केला. कुठल्याच Continue reading