बकरी ईद

तेरी हँसी के लिए गम कुर्बान
तेरी ख़ुशी के लिए आँसू कुर्बान
दोस्त
तेरी ख़ुशी के लिए जान भी कुर्बान
अगर…. Continue reading

Advertisements

खरे मित्र

friendship

friendship

आपण जन्माला आल्यापासून तिरडीवर चढेपर्यंत किती माणसं येतात आपल्या आयुष्यात. चढेपर्यंत म्हणण्यापेक्षा चढवले जाईपर्यंत म्हणू. चढवले जाईपर्यंत तरी कशाला म्हणायचं. तेव्हा कुणाला कसलाही विरोध करण्याचं त्राण तर नसतच आपल्यात पण काहीच उरलेलं नसतं आपल्या हाती.
पण ……….

Continue reading

तुझ्या चेहऱ्यामध्ये

तो आणि ती. दोन वेगवेगळ्या कुशीतून जन्मलेले दोन जीव. खरंतर काय नातं असता त्यांचं ! पण तारुण्याच्या वळणावर ते दोन जीव एकत्र येतात………….एका अदृश्य नात्यांना बांधले जातात……….कळत नकळत एकजीव होतात. तो तिचा सर्वस्व. तर तिचा चेहरा म्हणजे त्याचं आभाळ. हे आभाळ त्याला नेहमीच हवा असता स्वच्छ………मोकळं………निरभ्र. Continue reading

प्रेमाहुनी जगी या

स्टार प्रवाहवर नवी सिरीयल येतेय. ” स्वप्नांच्या पलीकडले.”

त्या सिरियलची जाहिरात सध्या जोरात चालू आहे. ती म्हणते, ” माझ्या बाबांना ना मक्याचं कणीस फार आवडतं. ते ना त्या कणसंवाल्याला त्याच्या गाडीसकट विकत घेतील आणि बंगल्याच्या आवारात नेऊन उभं करतील.”

तो म्हणतो, ” ती उंच इमारत दिसतेय ना. असं वाटतं, त्या इमारतीवर जाऊन उभं रहावं आणि खालून जाणाऱ्या माणसांकडे मुंग्यांसारख पहावं.”

यावर ती म्हणते, ” काय भन्नाट विचार आहेत रे तुझे ! ”

यात Continue reading

तुझ्यासाठी

ती रुसते रागावते आणि आपण आपला सगळा अहंकार बाजूला ठेवून तिला हसवू पहातो. तिच्यासाठी सर्कशीतला विदुषक होतो. गुलाबी गालावर सुकलेले अश्रू पुसत ती ओठांच्या कोनातून हळूवार हसते आणि आपण पसरलेल्या बाहूंच्या पंखात विसावते.

कधी कधी आपण रागावतो. आपल्याही नकळत तांडव करतो. ती भेदरते. आपल्या रागाला शरण जाते. आपल्याला हसवू पहाते. उषेचे रंग होते. फुलांचे गंध होते. आपण हरवून जातो त्यात. विसरतो आपला राग. पसरतो पंख आणि ती विसावते पुन्हा एकदा आपल्या कुशीत.

काय म्हणायचा याला ? प्रेम …… कि …… तडजोड ?

कारण या दोन्ही गोष्टी होत नाहीत तेव्हा दोघांच्या दोन दिशा ठरलेल्या. मध्ये एक अदृश्य भिंत. दोघांमध्ये विसंवाद निर्माण करणारी नव्हे. दोघांमधला संवाद दडपून टाकणारी. म्हणूनच खूप गरजेचा असतं अशी भिंत उभी रहाण्या आधीच जमीनदोस्त करण्याची. या आणि अशाच भावना व्यक्त करणारी हि कविता –

रुसवा, प्रेम, प्रेम कविता

रुसवा, प्रेम, प्रेम कविता

तू शराब होऊन चढलेली

प्रेम हि केवढी प्रचंड भावना आहे. आपल्या आयुष्यातली. तिच्याशिवाय आयुष्य म्हणजे सुरांशिवाय गाणं……..तिच्याशिवाय आयुष्य म्हणजे हरवलेलं चांदणं. ती असते आपल्या आयुष्याला कुठल्याशा एका वळणावर पडलेलं स्वप्नं.  आपल्याही नकळत ते स्वप्नं साक्षात उतरतं………आपल्याभोवती प्रेमाचं चांदणं भिरभिरतं. अळवाच्या पानावरचा थेंब जपावा इतक्या हळूवारपणे तिच्यासोबतच प्रत्येक क्षण जपावासा वाटतो…….. ती नसते सोबत तेव्हाही आपल्याला तिचा सहवास लाभतो.

ती दाही दिशात……..ती आपल्या प्रत्येक श्वासात.
पानाफुलात तिचं हसू……..तीच लागते स्वप्नात दिसू.
ती भुईमधुन उगवणारा अंकुर…….ती जखमेवरची फुंकर.
ती शराब होऊन नसानसात भिनलेली………ती पैंजण होऊन आपल्या आयुष्यात रुणझुणलेली.
ती जशी सखी असते आपली तशीच मूर्तीमंत देवताही असते आपल्या आयुष्यातली.

अशाच भावना मनात असणारा या कवितेतला तिचा सखा म्हणतोय, ” तू माझ्या आयुष्यात आल्यापासून प्रत्येक दिसेल मला तूच दिसतेस. तूच प्रत्येक पानाफुलातून हसतेस. भुईमधुन नुकत्याच अंकुरणाऱ्या कळीनं दवबिंदुना मिठीत घ्यावं एवढ्या निरागसतेनं तू मला कुशीत घेतेस.

तू नुसतीच सुखात सोबत करत नाहीस मला तर जेव्हा मी संकटात सापडतो तेव्हा तूच मला पैलतीराला नेणारी नौका होतेस. म्हणूनच तू नुसती सखी नसतेस माझी तू असतेस माझी मूर्तीमंत देवता. तू जगण्यातली गोडी….तू सुखाचे सर…….आणि तूच होय तूच माझ्या आयुष्यातल्या आनंदाच्या राशी.”

प्रेम, प्रेम कविता

प्रेम, प्रेम कविता

ती खरंच पावसासारखी.

ती म्हणजे खरंच पावसासारखी.

ती म्हणजे  खरंच पावसासारखी
थेंबा थेंबाने  येते आणि आपल्याला व्यापून टाकते.
वरून दिसतो आपण कोरडेच

पण ती आपलं मनही ओलेचिंब करून जाते.


आपण पहात रहातो खिडकीतून रिमझिमणारा पाऊस पाणी,
पण तो पाऊस नसतोच मुळी त्या असतात तिच्या आठवणी.
आपल्याही नकळत आपण खिडकीतून हात बाहेर काढतो
आणि तिला तळहातावर घेतो. पुन्हा पावसात हरवून जातो.

तळहातावर ती, बाहेरही ती, आपणही स्वतःला झोकून देतो 
आपल्याही नकळत खिडकीतून बाहेर जातो.
ती रिमझिमणारी सर, आपण मुसळधार पाऊस होतो.
तिच्यासह अवताल भवताल सारं सारं कवेत घेतो.

पाऊस

पाऊस

हिरवी राने, हिरवी पाने, हिरव्या वेली, हिरवी मने
हिरव्या हिरव्या हिरवाईतून टपटपणारी दोन जणे
कोणती ती आणि कोणता मी, ओळखत नाही आता कोणी
आई म्हणते, ” काय रे घरात आले कोठून पाणी ?”

दचकून तेव्हा मी माझ्या पायाशी पहातो 
पाणी नसतेच तिथे मग भांबावून जातो
माझ्या चेहऱ्यावर उमटलेल्या तिला आई पहात रहाते
कुठल्यातरी कौतुकानं माझ्या हाती चहा देते.

खिडकीमधून रिम झिमणाऱ्या पुन्हा तिला पहात रहातो
चहावरची वाफ होतो खुशाल तिच्या कवेत जातो.