आभाळाचं डोळं, तिच्याकडं लागलं

ती त्याला दिसते……डोळ्यांना डोळे भीडतात आणि एका अवचित क्षणी तो तिच्या आणि ती त्याच्या मनात भरते. पण हे कधी….कुठे……आणि कसं घडतं….. Continue reading

Advertisements

शपथ झाली पोरकी

प्रेम कुणामधलंही असो. आई मुलातलं असो…….नवरा बायकोतलं असो……..प्रियकर प्रेयसीतलं असो………वडील मुलातलं असो……मित्रा मित्रातलं असो किंवा मित्र मैत्रीणीतलं असो. प्रेमाच्या कोणत्याही पदराला बंधनाची झालर असतेच. का अशा बंधनाची गरज भासते माणसाला ? कारण Continue reading

प्रेम म्हणजे नेमकं काय ?

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे
प्रेम असतं
तुमचं आमचं साऱ्यांच
सेम असतं.

एवढ्या दिलखुलास शब्दात मंगेश पाडगावकरांनी प्रेमाची व्याख्या सांगितली. प्रेम आधी आलं मग प्रेमाची व्याख्या आली. कोट्यावधी वर्षापूर्वी कोणते जीव अस्तित्वात होते हेही संशोधक सांगू शकतील पण माणसाच्या मनात प्रेम भावनेचा उगम नेमकं कधी झाला हे सांगणं मात्र कुणालाही शक्य होणार नाही. आणि तरीही आपल्याला प्रेम म्हणजे काय हे नक्की समजलंय असं वाटत नाही.

निस्वार्थ असतं ते प्रेम………प्रेमला कसलाही मोह नसतो…………प्रेमाला कसलीही अपेक्षा नसते. अशा रीतीनं प्रेमाला शब्दांनी व्यापण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही Continue reading

तुझ्या चेहऱ्यामध्ये

तो आणि ती. दोन वेगवेगळ्या कुशीतून जन्मलेले दोन जीव. खरंतर काय नातं असता त्यांचं ! पण तारुण्याच्या वळणावर ते दोन जीव एकत्र येतात………….एका अदृश्य नात्यांना बांधले जातात……….कळत नकळत एकजीव होतात. तो तिचा सर्वस्व. तर तिचा चेहरा म्हणजे त्याचं आभाळ. हे आभाळ त्याला नेहमीच हवा असता स्वच्छ………मोकळं………निरभ्र. Continue reading

प्रेमाहुनी जगी या

स्टार प्रवाहवर नवी सिरीयल येतेय. ” स्वप्नांच्या पलीकडले.”

त्या सिरियलची जाहिरात सध्या जोरात चालू आहे. ती म्हणते, ” माझ्या बाबांना ना मक्याचं कणीस फार आवडतं. ते ना त्या कणसंवाल्याला त्याच्या गाडीसकट विकत घेतील आणि बंगल्याच्या आवारात नेऊन उभं करतील.”

तो म्हणतो, ” ती उंच इमारत दिसतेय ना. असं वाटतं, त्या इमारतीवर जाऊन उभं रहावं आणि खालून जाणाऱ्या माणसांकडे मुंग्यांसारख पहावं.”

यावर ती म्हणते, ” काय भन्नाट विचार आहेत रे तुझे ! ”

यात Continue reading

तू नसतोस तेव्हा

खूप दिवस झालं मी माझ्या ब्लॉगवर प्रेम कविता पोस्ट केलीच नाही. प्रेम कविता पोस्ट करा अ तुम्ही म्हणाल तुमच्या कवितेत नेहमीच खूप खूप प्शी अनेकांनी विनंती केली. जवळ जवळ तीन महिने. माझ्या माहिती प्रमाणे मारच्या पहिल्या आठवड्यात मी प्रेम कविता पोस्ट केली होती. प्रेम कविता का पोस्ट करत नाही ? अशी विचारणाही अनेकांनी केली. मागील काही महिन्यात शेतीवर इतकं काही लक्ष केंद्रित केलंय कि कवितेवरचं लक्षच उडालय. गेल्या दोनचार दिवसात थोड्या थोड्या ओळी ओठांवर येऊ लागल्यात. रविवारी पुण्यात आलोय. उद्या पुन्हा शेतावर जाणार. आठ पंधरा दिवस तरी पुन्हा पुण्यात येणं होणार नाही. म्हणून म्हणलं आता एखादी प्रेम कविता पोस्ट करूनच जाऊ. आणि हो या पुढे प्रेम कविता आवर्जून टाकत जाईन.

हिही कविता अशीच. तो सोबत नसल्या नंतरच्या व्यापून टाकलेल्या दुखाची.रेम असतं किंवा विरह असतो. असं का ? कारण प्रेम आणि विरह या दोनच भावना खऱ्या. त्या दोन्ही भा

वनांच्या मध्ये असते ती तडजोड.

tu nstos tewha

Love poem, प्रेम कविता,

तिच्या विरहाची ही कविता तुम्हाला आवडेल अशी मला आशा आहे.

तुझ्यासाठी

ती रुसते रागावते आणि आपण आपला सगळा अहंकार बाजूला ठेवून तिला हसवू पहातो. तिच्यासाठी सर्कशीतला विदुषक होतो. गुलाबी गालावर सुकलेले अश्रू पुसत ती ओठांच्या कोनातून हळूवार हसते आणि आपण पसरलेल्या बाहूंच्या पंखात विसावते.

कधी कधी आपण रागावतो. आपल्याही नकळत तांडव करतो. ती भेदरते. आपल्या रागाला शरण जाते. आपल्याला हसवू पहाते. उषेचे रंग होते. फुलांचे गंध होते. आपण हरवून जातो त्यात. विसरतो आपला राग. पसरतो पंख आणि ती विसावते पुन्हा एकदा आपल्या कुशीत.

काय म्हणायचा याला ? प्रेम …… कि …… तडजोड ?

कारण या दोन्ही गोष्टी होत नाहीत तेव्हा दोघांच्या दोन दिशा ठरलेल्या. मध्ये एक अदृश्य भिंत. दोघांमध्ये विसंवाद निर्माण करणारी नव्हे. दोघांमधला संवाद दडपून टाकणारी. म्हणूनच खूप गरजेचा असतं अशी भिंत उभी रहाण्या आधीच जमीनदोस्त करण्याची. या आणि अशाच भावना व्यक्त करणारी हि कविता –

रुसवा, प्रेम, प्रेम कविता

रुसवा, प्रेम, प्रेम कविता