आम्ही साहित्यिक आम्ही कलावंत

मित्रहो,
नमस्कार.

मी विजय शेंडगे. आजवर ब्लॉगरवर रिमझिम पाऊस अर्थात लोकशाहीचा पहारेकरी, वर्डप्रेसवर रे घना या नावाने ब्लॉग लिहीत होतो. जवळ जवळ आठ दहा वर्ष मी अशा रितीने ब्लॉग लिहितो आहे. अनेकदा नियमित लिहिणे होत नाही. त्यामुळे ब्लॉगवरचा ऑडियन्स कमी होतो. परंतु आपण पब्लिक प्लॅटफॉर्मवर लिहिले तर नियमित लिहिलेच पाहिजे अशी गरज पडत नाही. तुम्ही कधीही पोस्ट लिहिली तरी तुमचा ऑडियन्स पोस्टवर येऊ शकतो. त्यामुळे मी आम्ही साहित्यिक आम्ही कलावंत या पब्लिक पोर्टलवर लिहिण्याचे ठरविले आहे.

आपणही या पब्लिक पोर्टलवर लिहावे असे मी आपणास सुचवेन.

सर्वात महत्वाचे म्हणजे हे पब्लिक पोर्टलवर भारतीय बनावटीचे आहे. webster developers या भारतीय कंपनीने हि वेबसाईट डेव्हलप केली आहे. लेखक, चित्रकार, शिल्पकार, वादक, गायक अशा सर्व कलावंतांसाठी हे मुक्त व्यासपीठ आहे. प्रत्येकजण आपल्या कविता, कथा, इतर लेखन, अनुभव इथे लिहू शकतील. आपले फोटो, व्हिडीओ पोस्ट करू शकतील.

सर्वात महत्वाचे म्हणजे यातील आर्ट मॉल या विभागात लेखकांची प्रकाशित पुस्तके, चित्रकारांची चित्रे, शिल्पकारांचं शिल्पकृती वा अन्य इतर प्रकारच्या कलाकृती इथे सेल साठी उपलब्ध करून देता येणार आहेत. त्याचप्रमाणे साईट व्हिजिट करणारे रसिक इथून त्यांना आवडणाऱ्या कलाकृती खरेदी करू शकणार आहे.

एबीपी माझा : ब्लॉग माझा स्पर्धा

एबीपी माझाच्या ब्लॉग माझा स्पर्धेचं हे चौथं वर्ष.  एबीपी माझा सलग चार वर्ष हि स्पर्धा आयोजित करते आहे. 30 सप्टेंबर ही स्पर्ध्येसाठी ब्लॉग पाठविण्याची  शेवटची तारीख होती तर नुकताच ब्लॉग माझा स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. पण हे सारं आज माहिती झालंय. वेळ गेल्यानंतर. मी त्याविषयी लिहितोय तेही वेळ गेल्यानंतर. वेळ गेल्यानंतर का असेना पण मी त्या विषयी लिहितोय कारण Continue reading

मी सुरी कसा फिरवू ?

जवळ जवळ वर्ष झालं मी ब्लॉग लिहितोय. रसिकांनी पाहिलेल्या पंचवीस हजाराहून अधिक पोस्ट आणि अठराहून अधिक देशांचे माझ्या ब्लॉगवर फडकणारे झेंडे हि गोष्ट माझ्यासाठी नक्कीच अभिमानाची आहे. आणि सहाजिकच आहे ते. कारण वर्षभरापुर्वी ब्लॉग कशाशी खातात हे अस्मादिकांना मुळीसुद्धा ज्ञात नव्हतं.

आता मी तुमच्याशी नियमित संवाद साधू शकतो याचा आनंद वाटतो. पण हा संवाद एकतर्फी आहे असं मात्र सारखं वाटत. कारण मी माझं मन कोणताही आडपडदा न ठेवता तुमच्याजवळ मोकळं करतोय पण तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं हे मला नेमकं कळत नाही. एक तर तुमच्या प्रतिक्रिया फारशा मिळत नाहीत आणि

rate this

या ठिकाणी तुम्ही तुमचं मतही नोंदवत नाहीत.

वाचणारेही कवी आणि ऐकणारेही कवी अशी जशी मराठी कविसंमेलनाची स्थिती झालीय तशी आपल्या ब्लॉगिंगच्या व्यासपीठाची होऊ नये असं माझं प्रामाणिक मत आहे.

मी हा सारा डोलारा उभा केला ते आपलं लेखन रसिकांपर्यंत पोहचवाव, त्याला कुणीतरी त्याला ‘ व्वा ! व्वा !’ म्हणावं यासाठी नाही काही. तर मी माझ्या ‘ पालवी ‘ या संस्थेच्या माध्यमातून वृक्ष रोपणाचं आणि संवर्धनाचं जे काम हाती घेतलंय, त्याला या माध्यमातून आर्थिक पाठबळ मिळावं असं वाटत होतं म्हणून हि सारी धडपड. अजून ते जमलेलं नाही. कसं जमेल माहित नाही. जमण्यासारख असलं तरी माझ्या एखाद्या ब्लॉगर मित्रानं माझ्या घरी येवून त्याबाबत मार्गदर्शन केल्याशिवाय ते साध्य होईल असं वाट नाही. मागे एकदोन ब्लॉगर मित्रांनी माझ्या घरी येवून तशी प्रत्यक्ष मदत करण्याची तयारीही दाखवली होती. पण त्याची फल निष्पत्ती झाली नाही.

कुणी म्हणेल तुम्ही तुमच्या या सामाजिक कामासाठी समाजातूनच निधी का उभा करत नाही ? मित्रहो इथ आमचं सरकार रोज आमच्या माना कापतंय, तिथं तुमच्या मानेवर मीही सुरी कसा फिरवू ? 

आमचं झाडं लावण्याचा हेतू किती साधा आणि सरळ होता हे मी माझ्या –

मला झाड व्हायचं

या कवितेतून व्यक्त केलीय.

पण त्याच बरोबर . झाडं जशी ऊन सोसून दुसऱ्याला सावली देतात तसंच माणसानं ही दुसऱ्याच दुख घेवून त्याला सुख द्यावं अशी अपेक्षा मी माझ्या –

माणसं अशी का वागत नाहीत ?

या कवितेतून व्यक्त केलीय.
म्हणूनच मित्रांनो, अपेक्षा करतोय तुमच्या मनमोकळ्या प्रतिसादाची आणि मदतीची.