मनपूर्वक शुभेच्छा

मी गेले दोन महिने लिहित नव्हतो. तरीही माझे अनेक वाचक नियमितपणे माझा ब्लॉग ओपन करत होते. त्यात देवेंद्र होता, सुजित होता, आकांक्षा होती, विशाल होता, आणखी कितीतरी नावं लिहिता येतील. पण कुणा कुणाची आणि किती नावं लिहिणार ? आणि इतरांची नावं लिहिली नाहीत म्हणून मला त्यांचा विसर पडलाय असही होत नाही. मित्रहो तुम्ही नुसताच माझा ब्लॉग वाचवा, छान म्हणावं, माझ्या लिखाणावरच्या तुमच्या  प्रतिक्रिया पहाव्यात म्हणून नाही लिहित काही मी ?

राष्ट्रकुल स्पर्धेची सांगता खूप छान झाली असं म्हणत तिला सुरवातीला लागलेलं भ्रष्टाचाराचं गालबोट पुसण्याचा प्रयत्न झाला खरा. पण आमच्या देशातला भ्रष्टाचार म्हणजे चंद्रावरचा डाग आहे. तो पुसून टाकायचा असेल तर आम्ही साऱ्यांनी जागं व्हायला हवं.

” क्रांती सामान्य माणसच करतात. पुढारी नव्हे हे. ” लक्षात घ्यायला हवं.

कदाचित आता आपल्याच लोकशाही विरुद्ध आपल्याला एखादं रामायण घडवावं लागेल………….. एखादं महाभारत रचावं  लागेल………….एखादं पानिपत लढावं लागेल…………..एखादा सत्याग्रह करावा लागेल; पण मित्रांनो आपल्या लोकशाहीतला कचरा आपल्याला कडून टाकायलाच हवा. म्हणून हा सारा लेखन प्रपंच.

असं असूनही इतके दिवस का लिहित नव्हतो मी ते कळेलच तुम्हाला लवकर. आज नाही सांगत. आज तुम्हा साऱ्यांना दसऱ्याचा मनपूर्वक शुभेच्छा.