ऑक्सिजनचा हिशोब

आयुष्यात आपण खूप हिशोब करतो. या महिन्यात पेट्रोलला किती पैसे गेले…….सिनेमे पाहण्यावर किती पैसे खर्च झाले…….बस खर्च किती झाला…….किराणा कितीचा झाला………वगैरे वगैरे. कारण या प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला पैसे मोजावे लागता. घरातल्या ग्यास सिलेंडरचे भाव वाढले तर आपल्याला लगेच कळतं. पण आमच्या ग्रामीण भागातील जनतेला त्याच्याशी काहीएक घेणंदेणं नसतं. कारण त्यांच्या चुली रानातून मिळणाऱ्या सरपणावर पेटत असतात. थोडक्यात काय Continue reading

Advertisements

माणसं अशी का वागत नाहीत ?

अलीकडे माणसांच्या चांगुलपणाचे अनुभव अभावानेच येतात. कुणाशीही प्रेमाने वागायचं म्हणलं कि आपला अहंकार, आपला स्वार्थ, आपला मोह, आपला लोभ आडवा येतो. खरंच आपल्या जगण्याचं प्रयोजन काय ? का नाही आपण माणूस म्हणून प्रत्येकावर निख्खळ प्रेम करू शकत ? अवतीभवती सारं जग असं वागताना, एकमेकांना पाण्यात पहात असताना आपली जगण्याची उमेद संपते. वाटत का जगतो आहोत आपण ? कशासाठी लिहितो ब्लॉग ?

ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीने, तुकारामच्या गाथेन जिथं या जगाची मानसिकता बदल नाही तिथ माझ्या सारख्या किडा – मुंगी सारख्या जीवनं लिहून काय फरक पडणार आहे ? का ह्या कानपिचक्या आणि उपदेश देत बसतो मी जगाला ? बस्स………..बस्स !!! थांबवावं सारं.

पण मग वाटतं नाही असं नाउमेद होऊन नाही चालणार. जग वागू दे कसंही. आपण मात्र साऱ्यांवर प्रेम करू या.

चालताना वाट सगळी अंधारात बुडालेली असते. संकटच संकटं असतात समोर. पण आपण सूर्याचा, झाडाचा आदर्श ठेवायचा समोर. काळोखान ग्रासलंय म्हणून सूर्य कधी उगवायचा थांबलाय का ? अंगाखांद्यावर लहानाची मोठ्ठी झालेली पानं गळून पडलीय म्हणू झाडाला कुणी रडताना पाहिलंय का ? अशा वेळी झाड कधी रडत बसत नाही. मग काय करतं झाड ? असं विचार मनात येतो तेव्हा मी लिहितो –

खोल खोल आतून आतून
झाड पुन्हा फुलत असतं
वसंत ऋतू येणार म्हणून
शिशिरसुद्धा झेलत असतं

आपण सुद्धा असाच उद्याच्या सुखाच्या आशेनं फुलात राहिलं पाहिजे. उद्याच्या सुखासाठी आजचं दुखंसुद्धा झेललं पाहिजे.

माणसांमधला पराकोटीचा स्वार्थ पहिला, फक्त फक्त स्वतःच्या सुखासाठी चाललेली धडपड पहिली कि अखंड उन सोसून दुसऱ्याला सावली देणारा झाड मला आठवतं. आणि मग वाटतं………..माणसं का अशी

झाडासारखी वागत नाहीत ? इतरांची दुख झेलून त्यांना सावली का देत नाहीत ? अशा अनेक विचारांच्या प्रभावाखाली लिहिलेली हि कविता –