व्ह्यालेनटाइन डे म्हंजे ???

खरंतर खूप आठवणीनं हे सारं १३ फेब्रुवारीलाच लिहिलं होतं. १३ सकाळी पोस्ट करणार होतो. गावी शेतावर जायची गडबड होती. तरीही पोस्ट करायला बसलो होतो………..माझ्या हिशोबान पोस्टही केला होतं. पण कुठे माशी शिंकली कुणास ठाऊक काल संध्याकाळी गावाहून परतलो……….पहातोय तर हि पोस्ट झालेलीच नाही. मग आज ऑफिसहून आल्यावर लगेच बसलोय.

त्या दोन दिवसात अनेकांनी खूप अपेक्षेन माझा ब्लॉग चाळला…….निराशा झाली असेल………..पण विश्वास आहे तुम्ही समजावून घ्याल याचा.

उद्या एक छानशी प्रेम कविताही पोस्ट करीन. तूर्तास माझं म्हणणं पटतंय का पहा –

***********************************************************************************

व्ह्यालेनटाइन डे !!!!!!!!!!

कुठून आली हि संकल्पना. खरंच आपल्यातलं जिव्हाळ्याच नातं जपायला अशा एखाद्या दिवसाची गरज असते ????????

मला नाही वाटत. पण तरीही आज मी आठवणीनं हा लेख लिहितोय. लेख नाही म्हणता येणार याला. तुमच्या माझ्यातलं हितगुज म्हणावं लागेल……….किंवा म्हणावं लागेल तुमच्या माझ्यातलं जिव्हाळ्याचा संवाद.

कोणत्या नात्याच्या बळावर गेल्या दहा एक महिन्यात रसिकांनी माझ्या ब्लॉगची जवळजवळ चौदा हजार पण चाळली. जवळ जवळ प्रत्येक दिवशी न चुकता माझी

मोर आणि लांडोर

हि चारोळी वाचली

तुमचा बाप तुमच्यावर अन्याय करतोय ?

किंवा

‘ फादर्स डे ‘ आणि माझा बाप

या लिखाणातली बाबा हि कविता वाचल्यानंतर अनेकांनी कविता खूप आवडल्याच आणि डोळे भरून आल्याचं कळवलं. का आले तुमचे डोळे भरून ????

निव्वळ त्या कवितेतले शब्द वाचून ????

नुसता शब्दांचा डोलारा कुणाच्या डोळ्यात पाणी आणू शकतो ???

नाही मित्रांनो मुळीच नाही. ती कविता वाचून तुमच्या डोळ्यात पाणी आलं तेव्हा तुमच्या माझ्यात साजरा होत होता……………. व्ह्यालेनटाइन डे.

आणि जी कविता वाचून तुमच्या डोळ्यात पाणी आलं ती कविता लिहिताना माझा काय झालं असेल ???
मला माझा बाबा केवढा छान होता हे जेव्हा कळाला मी तेव्हा लिहिलेली हि कविता. शब्द आपसूकच येत गेले ओठांवर …………उतरले कागदावर. हे असं खरंच आपसूक घडतं ??? मला नाही वाटत !!!………कारण ज्या क्षणी मी हि कविता लिहिली त्या क्षणी मला ‘बाबा’ म्हणजे काय असतं ते कळलं होतं. म्हणजेच त्या क्षणी मी साजरा करत होतो दूर गावी रानात असलेल्या माझ्या बाबांबरोबर व्ह्यालेनटाइन डे.

बैल आणि मी

हा लेख वाचल्यावरही अनेकांनी रडू आल्याचं लिहिलं. का ??? तो लेख तर माणसाच्या दावणीच्या बैला विषयी होता. माणसा माणसातल्या नात्यागोत्याचा कुठलाही लवलेश नव्हता त्या लेखात तरीही तुमच्या डोळ्यात पाणी यावं !! का ??? कारण तो लेख वाचतानाही तुमच्यात,  माझ्यात आणि माझ्या मनाला चटका लावून गेलेल्या त्या बैलात साजरा होत होता व्ह्यालेनटाइन डे.

व्ह्यालेनटाइन डेचा मला शब्द कोषात सापडलेला अर्थ…………..आपण आपल्या जिवलगाच्या सहवासात रमून जाण्याचा दिवस.

ती दिसल्यापासून खिडकीचे गज कुरवाळीत मी बसतो,
ती समोर नसते तरीही खुल्या दिलाने हसतो.

या माझ्याच एका कवितेतल्या ओळी.

आपण जेव्हा असे तिच्यावर खूप खूप प्रेम करत असतो, आणि ती समोर नसतानाही मनमोकळेपणाने हसतो. तेव्हा आपण ती सोबत नसतानाही, तिच्या सहवासात साजरा करत असतो………..व्ह्यालेनटाइन डे.

मग तो दिवस १४ फेब्रुवारीच कशाला हवा ? प्रत्येक दिवसही आपल्यासाठी व्ह्यालेनटाइन डेच असेल फक्त आपल्या प्रेमात तेवढी ताकद असायला हवी.

Leave a comment