माझा निर्णय झालाय पण ….

( कृपा करून तुमचं मत नोंदवायला विसरू नका. )

मित्रहो मी पुण्यात एका बहूदेशीय कंपनीत प्रोडक्शन म्यानेजर या पदावर कार्यरत आहे. अजून १५ – १६ वर्ष सर्व्हिस बाकी आहे पण. तरीही मी नौकरी सोडून गावी जाऊन शेती करायचा निर्णय घेतलाय. शेतीत स्वतः काम करायची तयारी आहे. पण हाताखाली एखादं चांगलं, गरीब, प्रामाणिक, कष्टकरी जोडपं असावं असं असं वाटतंय. खूप काही नवं करतानाच त्यांनाही नक्कीच चांगल्या मार्गान घेऊन जाईन असा विश्वास आहे. पण अशा गरीब, प्रामाणिक, कष्टकरी जोडप्याच्या शोधात आहे.

खरंतर माझा गेली पंचवीस एक वर्ष शेतीशी संबंध आला नाही. पण त्याआधी मी बऱ्यापैकी शेतीत राबलोय. शेतीची थोडी बहुत ओळख तेव्हापासून झालीय.

बैल आणि मी

हा माझा लेख तेव्हाच्याच आठवणींवर आधारित.

शेतकऱ्याची रया

हि कविताही त्या जाणिवेतूनच लिहिलेली.

चवल्या पावल्या

हा लेख तर अलीकडच्या माझ्या पाच श महिन्यातल्या वास्तव अनुभवातून आलेला.

शेती

आज मी माझ्या नौकरीत दिवसाचे बारा तास राबतोय. प्रचंड टेन्शन, मिटिंग, डिलिव्हरी प्रेशर, कामगारांच्या समस्या, वरीष्टांची आरेरावी, मनमानी, आणि या सगळ्याच्या बदल्यात हाती पडणारा मोजका पगार. आपण खूप काही करतो आहोत आपल्या कंपनीसाठी याचा सुख मिळत पण त्याचा मोबदला मिळत नाही यातली निराशा. वरिष्ठांच्या पुढे पुढे करून स्वतःच हित.साधणारी मंडळी…….साहेबांचं चांगभलं करणाऱ्यांचा होणारा उत्कर्ष……..हे खूप वर्ष पहात आलोय. आपल्या भारतात सगळीकडेच हि परिस्थिती. गुणवत्तेपेक्षा हुजरेगिरी महत्वाची. आणि म्हणूनच वाटतं आपण आपली वाट चालावी. आपल्याला हवं तसं काही निर्माण करावं. माणसांना एक नवा संस्कार द्यावा. खूप काही वेगळं करायची इच्छा आहे.

आणि मला खरं सुख वाटतंय ते नव्या निर्मितीत. शेती करताना मला रोज त्या अनुभवातून जायला मिळणार आहे.

माझा निर्णय झालाय पण ……….तरीही तुमचा मत हवाय.

रेटिंग मध्ये तुमचं मत नोंदवायला विसरू नका. तुमचे अभिप्राय हेच माझं पाठबळ.

8 Comments

    • विनायकजी,
      प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार. २९ डिसेंबर पासून नोकरीतून मोकळा झालोय. सर्व कुटंब इथच पुण्यात ठेवून एकटाच गावी जाणार आहे. हाताखाली एखादा गरीब कुटुंब असावं म्हणून गेली सहा महिने माणूस शोधतोय. पण द्याफी माणूस मिळेना. शेतात काम करायची कुणाची इच्छाच दिसत नाही. हे पाहिलं कि वाटतं एका बहु देशीय कंपनीतली प्रोडक्शन म्यानेजरची नोकरी सोडणारे आपण मूर्ख तर नाही ना. पण नाही माझा निर्णय चुकीचा नाही याची मला जाणीव आहे. कुणी सोबत असो अथवा नसो. मी माझं काम करीत राहीन.

  1. vijay jo kahi nirnayahe to nit ghe ani ho khas karun gharatil mansanche mat ekda nahi tar shabhar wela vechar karan ti khush tar tu khush ani tuza nirnya shevtala jail ani tuza swapna purna hoil, best luck

  2. आउटपुटपेक्षा इनपुट जास्त असू नये याची काळजी घेतल्यास परिश्रमाचे मोल मिळण्यात अडचण येणार नाही.

    • मनोहर जी मी माझ्या आयुष्यात आजवर इनपुट आणि आउटपुट असा हिशोब कधी केलाच नाही. चांगल्या आउटपुटसाठी अधिकाधिक इनपुट द्यायचा प्रयत्न केला. पण आजवर त्याचा खूप फायदा झालाय असं वाटलं नाही. आता कमीत कमी मी इनपुट आणि आउटपुटचा मेळ्तरी घालू शकेन. आजपर्यंत इनपुट देणं माझ्या हाती होतं आणि.आउट पुट मिळणं वारीष्टांच्या हाती.

  3. हम्म निर्णय चांगला आहे. दुसरी नोकरी/ स्वत:चा व्यवसाय/शेती यातून तुम्ही शेतीचा पर्याय निवडला आहे. या सर्व पर्यायांचे फायदे तोटे तुम्ही लक्षात घेतले असतीलच. जीवनात शांतता महत्त्वाची असतेच. पण शेतीतही अनेक अडचणी आपल्यापुढे उभ्या राहतील. त्रास काय सगळ्यांनाच आणि सगळीकडेच आहे हो. त्याची तीव्रता कमी करण्याकरता काही करता आले तर ते जरूर करावं. शुभेच्छा.

  4. शेंडगे साहेब,
    सर्व प्रथम आपले अभिनंदन…ह्या क्रांतिकारी निर्णया बद्दल.
    मुळात आपण हा निर्णय घेतांना “सर्व” गोष्टींचा विचार केला असणार असे गृहीत धरतो,म्हणजेच मुलांचे शिक्षण,त्यांच्या गरजा,सगळ्या घरच्या लोकांचे मत,त्यांच्या रहाणीमानाच्या आजवरच्या सवई,तुम्हाला नि तुमच्या कुटुंबाला भविष्यात गावी उपलब्ध होऊ शकणाऱ्या संध्या वगैरे वगैरे.
    सध्याचे जग हे अवाजवी स्पर्धेचे,मत्सराने भरलेले आहे ह्यात काही शंकाच नाही.”ठेविले अनंते तैसेची रहावे,चित्ती असो द्यावे समाधान “हि संतांची शिकवण सगळ्यांनी कधीच बासनात बांधून माळ्यावर टाकून दिलीये.त्या मुळेच स्वताची शेती असून हि आपल्या सारखे बरेच जण जेव्हा करियर म्हणून शहरात येतात नव्हे त्यांना येणे भाग पडते ,ते का पडते ह्याची कारण मीमांसा आम्हा शहरी लोकांपेक्षा आपल्या सारखा शेतकरी पिंडाचा माणूस जास्त जाणतो.माझ्या सारख्या शेतीतले ओ का ठो काळात नसणार्याला सुद्धा खरे तर ह्या शेती प्रधान देशात खास करून प्रगत महाराष्ट्रात,सुपीक जमीन, पाउस पाणी,सरकारी योजना हे सर्व काही असतांना सुद्धा शेतकऱ्यांची हि अवस्था का ह्याचे नवल वाटते.महाराष्ट्र निर्मिती नंतरच्या ५० वर्षा पैकी ४५ वर्षे सत्तारूढ असणाऱ्या राज्यकर्त्यांकडून जे सहकार्य,शहाणपण,शिकवण मिळणे अपेक्षित होते त्यांनीच त्यांचा म्हणजेच शेतकऱ्यांचा उपमर्द केला आहे,आणि ते त्याला अजून हि उमगत नाहीये हि खरं तर कमाल आहे. खरे तर समाजाचे पोशिंदे असणारा असा जो हाडाचा खरा शेतकरी आहे तो शिक्षणा अभावी अजून हि अडाणी नि अशिक्षित राहिला आहे …नव्हे मुद्दाम ठेवला गेला आहे ह्याची आपणा सारख्यांनी तेथे गेल्या वर त्यांच्यात जागृती करावी असे प्रेमाचे निवेदन आहे.खरे तर लिहिण्या सारखे अजून खूप काही आहे पण आज आपणांस ह्या प्रसंगी फक्त मनापासून शुभेच्छा देऊन येथेच थांबतो.

Leave a reply to विजय शेंडगे Cancel reply