स्त्री भ्रुण हत्या आणि सुप्रिया सुळेंची पदयात्रा

मुलगी, सुप्रिया सुळेंची पदयात्रा , स्त्री भ्रुण हत्या

मुलगी, सुप्रिया सुळेंची पदयात्रा , स्त्री भ्रुण हत्या

मुलगी असेल तर जन्माला येण्या आधीच तिची हत्या करण्याची समाजाची मानसिकता अजूनही थांबत नाही. माझ्या घरात तसं घडतं………माझ्या शेजारी तसं घडतं………….माझ्या ऑफिसातही अशा घटना घडतात. मला घटना घडल्या नंतर कळतं. मी त्याविषयी काहीच बोलत नाही. मला दोन्ही मुलंच आहेत असं सांगितल्यानंतर, ” दोन्ही मुलंच का ? मजा आहे बुवा तुमची. ” असं म्हणणारी मंडळीही मला भेटतात. अशा वेळी काय करावं कळत नाही.

पण माझ्या धाकट्या बंधूंना दोन्ही मुलीच आहेत. एकाच मुलीवर थांबलेले माझे मित्रही आहेत. तीन मुलं असताना मुलगी हवीच म्हणून देवाला नवस करणारी आणि चौथं मुल होऊ देणारी माझी आई आहेच. मुलीची खूप आस बाळगली होती म्हणून माझ्या आईनं पाळण्यात न घालता तिचं नाव आशा ठेवलं. घरात मी थोरला. मला दोन्ही मुलंच झाली तेव्हा मला, ” एक मुलगी होऊ दे ना रे विजय.” अशी गळही मला माझ्या आईनं घातली. पण मी थांबलो कारण आजच्या महागाईच्या जमान्यात तिसरं मुल संभाळण म्हणजे तारेवरची कसरत.

हे सगळं सांगण्याला कारण घडलं. गेली दोन दिवस माझ्या ऑफिसच्या रस्त्यावरून सुरु असलेली सुप्रिया सुळेंची पदयात्रा मी पहातो आहे.

मुलगी, सुप्रिया सुळेंची पदयात्रा , स्त्री भ्रुण हत्या

मुलगी, सुप्रिया सुळेंची पदयात्रा , स्त्री भ्रुण हत्या

मागे पुढे पोलिसांचा भला मोठ्ठ ताफा…………रस्त्यावर ठिकठिकाणी झळकणारे ताडमाड फ्लेक्स पदयात्रेत सहभागी झालेल्या ( स्वखुशीने कि आदेशाने माहित नाही ) हजारभर शाळकरी मुली. मुंबई बेंगलोर सारख्या राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूला सहासात किलोमीटर पर्यंत रखडलेली वहाने. रस्त्यात ठिकठिकाणी चाललेले सत्कार………….हार तुरे ………..मुठभर पांढऱ्या शुभ्र मिशा ओठावर मिरवत सुप्रिया सुळेंच्या पायाशी वाकणारी मंडळी……….क्षणभराचा सत्कार झालाकी तुंबलेल्या वहानांच्या रांगेकडे पहात, ‘ आमची गाडी तेवढी काढून द्या. ” असं पोलीस अधिकार्याला फर्मावणारे पांढऱ्या खादितले पुढारी………..पुढारी पोलीस अधिकाऱ्याला साहेब म्हणत नाही. पण पोलीस अधिकारी मात्र ‘ होय साहेब ‘ म्हणत तुंबलेल्या वहानांच्या रांगेवर चवताळून जाणारे पोलीस अधिकारी. हे सारं स्त्री भ्रुण हत्या थांबविण्यासाठी कि केवळ एक स्टंट म्हणून. कारण चारसहा वर्षापूर्वी कोण ओळखत होतं या सुप्रियाला. पण आज तिच्या समोर चाललेली थोर मोठ्यांची आणि पोलीसखात्याची लगबग पहिली कि वाटतं सत्तेसमोर शहाणपणही चालत नाही आणि थोरपणही.

3 Comments

  1. नमस्ते शेंडगे सर, हे जे चालल आहे याने किती लोक शहाणे होतील हे माहित नाही पण एक गोष्ट नक्की सत्तेतील लोक खरोखर या गोष्टीचा खोलात जाऊन विचार करत असतील. खरोखर सांगा एव्हड वाईट काम करणारे किंवा करून देणारे लोक ज्यांना आपण डॉक्टर म्हणतो ते तर शिकलेले आहेत जर या लोकांची कीव करण्याजोगी बुद्धी त्यांना फक्त काही पैस्यासाठी हे काम करतात. फक्त सुशीस्क्षित म्हणवणारे डॉक्टरच हि गोष्ट थांबू शकतात. अशा लोकांना कधी लाज वाटणार आहे देव जाणे!
    सुप्रियाताई तुम्ही फक्त अश्या लोकांना शाहन करा आणि यासाठी वाहन कोंडी करून फेऱ्या काढण्याची गरज नाही, जर अश्या गोष्टी डॉक्टर करतच नाहीत अस जेव्हा लोकांना कळेल तेव्हा हि गोष्ट आपोआप बंद होणार आहे. म्हणून ताई अशा(डॉक्टर ) लोकांची फक्त सदसदविवेक बुद्धी जागृत करा! ते तुमची प्वोवर वापरून नक्की करू शकता!

Leave a comment